सुख दुःख वाटून घ्यायला, गप्पागोष्टी शेयर कारायला जीवनात मोजकेच मित्र असावेत पण मित्र असावेत. आणि या सगळ्यात तुमच्या आत स्वतःचाच तुमचा एक मित्र असला पाहिजे.
फ्रेंड शिप डे वगैरे.
#Happyfrienshipday2026
मराठाहृदयसम्राट आदरणीय श्री मनोज जरांगे पाटील यांचे संपूर्ण समाजातर्फे हार्दिक अभिनंदन व आभार , आपली तब्येत लवकरच बरी होवो ही आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना..
#मनोज_जरांगे_पाटील
तत्कालीन व्यवस्थेला आव्हान देत, शिक्षणाचा प्रकाश प्रत्येक मुलीच्या जीवनात आणणारे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना जयंतीनिमित विनम्र अभिवादन....🙏
#महात्मा_ज्योतिबा_फुले
वेळ - रात्री साडेआठ
ठिकाण - एबीपी माझाचे ऑफिस. @abpmajhatv
रात्री नऊ वाजता एक मोठी आणि अतिशय संवेदनशील बातमी आपण दाखवत आहोत आणि त्याचं तुला अँकरिंग करायचं आहे, असं मला सांगण्यात आलं.
मी फोटो काय आहेत, ते पाहिलं आणि काळजात चर्र झालं.
लाईव्ह बुलेटिनमध्ये एकेक फोटो समोर आणताना, क्रौर्याची ही परिसीमा वर्णन करण्यासाठी शब्दही सुचत नव्हते.
सलग तासभर हा विषय लावून धरला.
धनंजय देशमुख, सुप्रिया सुळे,@supriya_sule खासदार बजरंग सोनवणे, @bajrangsonwane_ मनोज जरांगे, #manojjarange जितेंद्र आव्हाड, @Awhadspeaks अंजली दमानिया @anjali_damania असे हा विषय लावून धरलेले सगळे आवेगाने, संतापाने बोलत होते. व्यक्त होत होते.
हे फोटो तुम्हाला विचलित करू शकतात, असं वारंवार सांगत राहिलो.
पण हे सांगणं जितकं प्रेक्षकांना होतं तितकंच स्वतःलाही होतं.
आता रात्रीचे साडेबारा वाजून गेलेत.
झोपण्याचा प्रयत्न करतो आहे.
पण फोटो अजून डोळ्यासमोरून जात नाहीत.
पक्ष, जात, पैसा, राजकारण, वर्चस्वाची लढाई या सर्व गोष्टींचा विळखा एका घटनेभोवती कसा आवळला जातो, ते गेल्या ८० दिवसांपासून आपण पहातच आहोत..
पण 'माणूस' अशीही आपली एक ओळख आहे (की होती?) त्याचं काय करायचं?
https://t.co/yN7WK9zL8W
मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक 'विष्णु वामन शिरवाडकर' तथा #कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस.
मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते.
#मराठीराजभाषादिन#मराठीभाषागौरवदीन