जे सांगतात उद्धव ठाकरे आमदार खासदारांना वाईट वागणूक देतात..त्यांनी भाजप निवडणुकीसाठी शिंदे गटातील कॅबिनेट मंत्र्यांना कशी मारहाण करतात हे पण सांगावे! सत्तेसाठी भाजप कुणालाही संपवू शकते... ज्यांना जायचे त्यांनी जावे पण तुमचे हाल काय होतील ते शंभूराजे देसाई यांना एकदा विचारा..
जे कोणी किस्से लिहित आहे ना..
बायको आजारी होती, घरी कोणी वारले म्हणून फोन केले...हे फक्त तो आमदार,खासदार पक्षात येईपर्यंत नखरे उचलले जातात!
एकदा भाजप पक्षात गेल्यावर काय वागणूक देतात हे सुजय विखे पाटील,अशोक चव्हाण,उदयनराजे भोसले यांच्याकडे बघा..
इतरांच सोडा राजनाथ सिंह यांना काय वागणूक मिळते? हार शेअर करता येतो का? #उगीच
मला अभिमान वाटतो की मी एका अशा नेत्यासाठी काम करतो. ज्याने २०१९ लाच यातून बाहेर पडायचा मार्ग दाखवला होता
२०१९ पासून राज ठाकरेंना निवडणुका लढवायच्या नव्हत्या पण कार्यकर्त्यांचे खच्चीकरण नको म्हणून निवडणुका लढले
EVM / फोडाफोडी
म्हणजे छापा काटा त्यांचाच
उत्तर - निवडणूक बहिष्कार
सगळ्यांना निवडून येऊन सत्तेतच बसायचं आहे, तर हा निवडणुकांचा झोल कश्यासाठी? मोदींना या देशाचा राजा घोषित करून लोकशाहीला एकदाची फाशी देऊन टाका.
कुठले संस्कार पेरतोय काय माहिती?
राजकारणाची ऐशीतैशी 🙏🫡
#राजकारण
भारतात किमान महाराष्ट्रामध्ये तरी निवडणुका कार्यक्रम बंद करा आणि खासदार-आमदार पदासाठी 'लिलाव पद्धती' चालू करा...!
जो जास्त बोली लावेल त्याला ते पद देऊन टाका.🤌🏻
एका दगडात दोन पक्ष मारणे....
ज्येष्ठ पवारांची आत्ता सकाळची मुलाखत पहा. पुढच्या पिढीच्या
राजकारण्यांनी शिकण्यासारखं खूप काही आहे.
1. शपथविधी होणार हे मला माहित नाही असं म्हणून या सगळ्या
खेळात आम्ही नाही हे स्पष्ट केलं.
2. पटेल, तटकरेंनीच हे केलं असं सूचित करून दोघांना एक्सपोज करून टाकलं.
3. एवढ्या घाईत हा निर्णय का झाला ते माहीत नाही असं सांगून
राष्ट्रवादीचं विलिनीकरण भाजपा + प्रफुल्ल पटेल + तटकरेंना नको
आहे, ते विलिनीकरणाला घाबरत आहेत हे पोचवलं.
4. बारा तारखेला विलीनीकरण होणार होतं हे सांगून आत्ता दादांचा पक्ष
जे वागत आहे ते दादांच्या अंतिम इच्छेविरूद्ध वागत आहे हा संदेश
तिकडच्या सामान्य कार्यकर्त्यांना देऊन टाकला. दादा म्हणजे आम्हीच;
पटेल तटकरे नव्हेत हे हायलाईट करून टाकलं.
5. अस्थी विसर्जनानंतर सुनेत्रावहिनींचा कुटूंबाशी संवाद झालेला नाही
हे सांगून उर्वरित पवार कुटूंब या निर्णयात नाही हे सांगून टाकलं.
या पत्रकार परिषदेच्या आधी म्हणजे काल बारामतीत नीरा नदीची
पाहणी करून मोठा मेसेज दिला. बारामतीचा सातबारा मी
अजितदादाच्या नावे केला होता, आता अजितदादा गेल्यावर मी म्हणजे
मूळ मालकानं सातबारा स्वतःच्या नावावर परत घेतला आहे हा तो
मेसेज.
किमान शब्दात कमाल अर्थ पोचवणे याला म्हणतात.किंवा एका
दगडात दोन पक्ष मारणे.
Credit- @DrVishwam FB Post
जाता जाता ही आज दादांनी महाराष्ट्र एक करून दाखवला,आणि आमच्या महाराष्ट्र राज्यात राजकारणा पलीकडेही नाती कशी जपली जातात हे पण दाखवून गेले,डावे,उजवे,पक्ष,जात,धर्म सोडून सगळे एक झाले.....
#AjitPawar
अजातशत्रू कोणी नसतो, पण मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या शत्रूलाही मानाचा मुजरा करावा, ही या महाराष्ट्राच्या मातीची रीत आहे!
काल महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान पुत्र गमावला. अजितदादांच्या जाण्याने केवळ राजकारणातील एक पद रिकामे झाले नाही, तर प्रशासकीय शिस्तीचा एक धगधगता ज्वालामुखी शांत झाला. उभ्या महाराष्ट्राचे डोळे पाणावले आहेत मग तो चाहता असो वा कट्टर विरोधक. कारण, इथली माती सुडाचे राजकारण शिकवत नाही, तर माणुसकीचे मूल्य जपायला शिकवते.
आज जो एकोपा महाराष्ट्र दाखवत आहे, तेच आपल्या सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. इथे आखाड्यात कुस्त्या खेळल्या जातात, विचारांची शिंगे फसवली जातात, पण नियतीने घाला घातला की आम्ही सर्व मराठी म्हणून सह्याद्रीसारखे एकत्र उभे राहतो. हीच ती छत्रपतींची शिकवण आहे.
दुसरीकडे, काही राज्यांतून (BIMARU ) व्यक्त होणारा आनंद हा त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचे प्रदर्शन आहे. ज्यांना मृत्यूचा उत्सव साजरा करावासा वाटतो, त्यांनी समजून घ्यावे की, आमचा महाराष्ट्र विचारांनी लढतो, विकृतीने नाही! संकटात हसणे हे नामर्दाचे लक्षण आहे, तर दुःखाच्या प्रसंगी खांदा देणे ही मर्दाची ओळख आहे. ही बिमारू मानसिकता म्हणजे मानवी मूल्यांचा अपमान आहे, ज्याचा निषेध करावा तितका थोडाच!
अजितदादा,
तुमचा तो स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावर असलेली पकड आणि पहाटेपासून कामाला लागण्याची ती जिद्द... महाराष्ट्राच्या स्मरणात सदैव तेवत राहील. एका पर्वाचा असा अकाली अंत चटका लावून जाणारा आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏
#अजितपवार
Nilesh Zalte लिहितात -
किती धावपळ होती तुमच्या आयुष्यात दादा. बरं तुमच्यासोबत सगळ्यांना धावायला लावायचे ते ही एकदम पट्टीत. आम्ही बातम्या करायचो दादा पहाटेच अमक्या ठिकाणी पोहोचले, तमक्या अधिकाऱ्याला झापलं. काम पुन्हा करायला सांगितलं. काम म्हणलं की तुम्हाला जोम असायचा.
दादांना भेटलं की काम होतंय हा मंत्रालयातला एक अलिखित नियम. म्हणूनच मुख्यमंत्र्यांइतकाच गजबजाट दादांच्या ऑफिसला असायचा. कागद हातात आलाय आणि त्याचं उत्तर दादांकडे नाही असं कधी झालं नाही. कामाची त्यांची स्टाईल आणि किस्से त्यांच्यासोबत काम करणारे अधिकारी आणि मित्र सांगत असतात.
दादा एखाद्या दौऱ्याला गेलेत आणि त्यांना एखादं मजेशीर कॅरेक्टर भेटलं नाही असं झालं नाही. 'मला सगळ्यांनी साथ द्या' असं म्हणतात कुणीतरी संबळ वाजवावा आणि दादांनी म्हणावं 'तू गबस तू नको साथ देऊ' आणि सगळ्यांसोबत स्वतःही हसावं. 'वो छोडके गये कैसा लगा' दादा म्हणतात 'अच्छा नहीं लगा' आणि जोक व्हावा सगळे फुटावे. कुणीतरी खालून भाषण सुरू असताना आय लव्ह यु दादा म्हणावं आणि दादांनी म्हणावं अरे बायकोला म्हण लव्ह यु लव्ह यु. कार्यक्रमात कुणीतरी चिठ्ठी द्यावी आणि त्यात मोकाट जनावरांचा विषय द्यावा दादांनी त्यावरून विनोद करावा. फडणवीस-शिंदे आणि दादा सोबत असताना शिंदेंनी काहीतरी बोलावं आणि दादांनी 'हमारा फिक्स है हम जा रहे है' 'अजून विसरले नाहीत' असे पंच टाकावेत. सगळे लोटपोट व्हावेत. कुठेतरी गाडी थांबवावी मिसळ खावी, चहा घ्यावा, म्हाताऱ्या कोताऱ्यांना भेटावं काम जाणून घ्यावं, थोडीशी मस्ती करावी. दादांच्या अशा किस्यांचाच एखादा खंड होईल.
राजकारणात काही तडजोडी झाल्या तरी कुटुंब म्हणून त्यांची आपुलकी कायम राहिली. बाहेरच्यांना कुटुंबात जास्त घुसून दिलं नाही. राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं हे तंत्र त्यांनी कसोशीने पाळलं. त्यामुळं फुटीनंतर सुद्धा अनेक जिव्हाळ्याचे क्षण आपण पाहिले.
राजकीय भूमिकांमुळे काही आरोपांमुळे टीकाही झाल्या मात्र त्याला दादांनी फार किंमत दिली नाही. त्यांचं व्हिजन क्लिअर होतं, तसे ठामपणे निर्णय त्यांनी घेतले. त्यांनी वेगळ्या राजकीय भूमिका घेतल्या असल्या तरी समोरच्यांना देखील वेळोवेळी उघडं पाडलं.
व्हिजन पाहिजे तर दादांसारखा नेता पाहिजे, दादांनी केलेली अनेक कामं सांगता येतील, शिवाय कुणाचंही काम असो ते बेष्ट झालं पाहिजे यासाठी आग्रही असणारा हा व्हिजनरी नेता. जमिनीशी घट्ट नाळ जुळलेला नेता.. ग्रामपंचायत ते केंद्रीय मंत्रालय सगळ्या स्तरातील प्रश्नांची उत्तम जाण असलेला नेता.
असे नेते फार कमी घडतात, अर्थात दादा घडण्यामागे शरद पवार आहेत मात्र यात त्यांची मेहनत, अभ्यास, सातत्य आणि लोकांची जुळलेली नाळ या गोष्टी दादांना 'दादा' बनवून जातात. दादांची तुलना शरद पवारांशी व्हायची मात्र त्यांनी स्वतःला तिकडं नेलं नाही, ते स्वतः भन्नाट होते.
आता हे ट्रेनमध्ये लिहीत असताना दादांच्या बातम्या बघणारी कित्येक लोकं भावुक झालीत, माझ्या डोळ्यातलं पाणी मी रोखू नाही शकलोय.
अवघड होऊन बसलंय, पवार फॅमिली आणि दादांवर प्रेम करणारी माणसं यातून कशी सावरतील हा बिकट प्रश्न आहे.
धक्के देण्यात दादा माहीर होते, मात्र एवढा मोठा धक्का द्याल असं वाटलं नव्हतं दादा.
आता अर्थसंकल्पीय अधिवेशन येतंय, दादा बजेट मांडताना दिसले असते, काही शेर आले असते काही टोलेबाजी झाली असती, मजा आली असती.
अजातशत्रू नेता गेला... दादांची धावपळ थांबली. महाराष्ट्र सुन्न झालाय.
दादा, लव्ह यु... 🙏🏽
#अजितपवार #निलेश्राव #अजितदादा_पवार
आता मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ह्या महानगरात पाणी नाही आले, गटारे तुंबलीत , हॉस्पिटल ओसाड पडलीत, रस्ते खड्डेमय आहेत, पावसात पाणी साठले की त्यास " पूर्णतः भाजप पक्ष जबाबदार " असणार ह्याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
कारण आता गल्ली ते दिल्ली भाजप आहे, आता पळवाट काढून जमणार नाही.
३१४ कोटी खर्च करून फडणवीस ३० मजली बिहार भवन बांधणार आहेत.
का तर तिकडून येणाऱ्या बिहारी लोंढ्यांची इथे सोय करायला. तिथे बिहार मध्ये डबल इंजिन सरकार असताना तिथे का हॉस्पिटल, कॉलेजेस आणि संस्था नाही उभारत? बस झालं आता. महाराष्ट्र राज्याची क्षमता आणि सहनशीलता संपलेली आहे.
बदलापुर मध्ये शिंदेंच्या 3 नगरसेवकाचे भाजपा मध्ये प्रवेश करून घेतले गेले...
शिंदे मात्र बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यातच मग्न आहेत 🔥
असा शिवसैनिक होणे नाही बाबा 🤭
सर्वात मोठ उदाहरण मुंबईच असेल,
बाळासाहेबांचे विचार/पक्ष पुढे घेऊन जात आहोत म्हणून महापौर भाजपचा होणार💪
मुंबई गेली मुंबई गेली असं रडतं बसु नका, हा विचार करा की मुंबई आणि मराठी साठी आपला मराठी माणुस एक झाला, आत्ता पुढे ही लढाई अजुन तिव्र होणार आहे त्यामुळे भविष्यात ही मराठी माणसीची एकजुट अशीच ठेवा, पक्ष फुटलेला असताना एवढे नगरसेवक निवडुन आणनं सोपी गोष्ट नाही आहे.
जय महाराष्ट्र 🚩🙏🏻
सत्ता ही गाजवण्यासाठी नव्हे, तर ती लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वापरली पाहिजे. सामान्य जनतेचे प्रश्न ऐकून घेणे आणि त्यावर त्वरित उपाय योजना करणे, हेच "लोकप्रिय लोकप्रतिनिधी" म्हणून नावलौकिक मिळण्याचे आणि पैसे न वाटताही निवडून येण्याचे गुपित आहे...!
मनसेचे ६ आहेत पण तुमच्या ११८ ला सळो की पळो करतील. बाकी जे टीका करत आहेत त्यांनी लक्षात ठेवाव मुंबई महाराष्ट्राची, मराठी माणसाची आहे. वाकडी नजर केली तर ठाकरे आहेतच तुमचा समाचार घ्यायला. तुमची संख्या सभागृहात असेल आमची रस्त्यावर आहे.
सगळ्यात जास्त माती कुणी खाल्ली असेल ह्या निवडणुकीत तर ती माझ्या नाशिक ने.!
पंचवटी तपोवन वृक्षतोड मुद्दा इतका गाजला, काही झाडं तोडले गेले पण आम्ही काही सुधारलो नाही.
आम्ही परत त्यांनाच बोकांडी बसवले जे झाडांची मुंडी छाटणार आहेत! 🤦♂️
#नाशिक
मनसेने अनेक महानगरपालिकेत पक्षांच्या निष्ठावंतांनी मनसेसाठी खात उघडलं आहे. भलेही त्यांची संख्या कमी असेल पण निष्ठावंत निवडून येण्याचं सुख सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांना नाही. अमाप पैशाच्या विरोधात निवडून येणारी लोकं ♥️🌻