काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस आदरणीय के.सी. वेणुगोपाल साहेबांची प्रेरणादायी भेट!
काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांना सतत प्रेरणा देऊन त्यांना प्रोत्साहित करणारे , राष्ट्रीय संघटन सरचिटणीस आदरणीय के.सी. वेणुगोपाल साहेबांची आज 'इदिरा भवन', नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजेंद्रपाल गौतम यांची उत्तर प्रदेशच्या काँग्रेस प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे दिल्ली येथे काँग्रेस कार्यालयात भेटून मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या
केंद्र सरकारच्या शिक्षण, महिला व बाल विकास, युवा आणि क्रीडा विषयक संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल ज्येष्ठ नेते माझे मार्गदर्शक मा मुकुलजी वासनिक साहेब यांचे दिल्ली येथे भेटून अभिनंदन केले व पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या…
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय खासदार मल्लिकार्जुन खरगे साहेबांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा..!
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय खा.मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी पुन्हा एकदा राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक, आमचे सहकारी श्री. सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! @SiddharthMpyc5
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या राष्ट्रीय समन्वयकपदी माझी नियुक्ती केल्या बदल पक्ष नेतृत्वाचा मी ऋणी आहे. अनिरुद्ध वणकर यांची प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभाग प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.
मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने आज कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजेंद्र पाल गौतम यांची प्रमुख उपस्थिती होती.
संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आणि गौतम बुद्ध यांची अनुयायी मी आहे. इतकी वर्ष संसदीय लोकशाहीच्या कामकाजात मी भाग घेतला. त्यामुळे कसे काम करतात, आंदोलन करतात याची कल्पना आम्हाला आहे. शांतपूर्ण आंदोलन आम्ही करत होतो, हातात बॅनर होते अशा वेळी कशाची भीती वाटली?
भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक, आणि सर्वसमावेशक कारभार करून, गंगाखेड शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजय करावे असे आवाहन, आज सकाळी गंगाखेड येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना केले.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नगरपरिषद निवडणुकीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारा आज सकाळी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आयोजित केलेल्या प्रचार सभेत उपस्थित राहून जनतेशी संवाद साधला. दक्षिणेतील काशी आणि संत जनाबाईंचे जन्मस्थळ म्हणून ओळख असलेल्या परभणी जिल्ह्यातील गोदाकाठचे गंगाखेड हे सामाजिक एकोपा जपणारे शहर आहे, असून या शहराने कायम काँग्रेस पक्षाला साथ दिली असल्याचे यावेळी बोलताना नमूद केले.
राज्यात आणि देशात सध्या सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवणाऱ्या मंडळींनी एकाधिकारशाही चालवली आहे, गंगाखेड मध्येही हे लोन आता येऊन पोहोचले आहे, लोकांचा कितीही विरोध असला तरी दडपशाही आणि पैशाचा जोरावर आपण निवडणुका जिंकू शकतो असे सत्ताधारणा वाटू लागले आहे, त्यांचा हा अहंकार मोडीत काढण्याची संधी नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आपणाला मिळालेली आहे. सर्वधर्मसमभाव मांडणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) आघाडीने येथे नगराध्यक्ष पदासाठी उजमामाई युनुस शेख या सुशिक्षित युवतीला उमेदवारी दिली असून नगरसेवक पदासाठीही कार्यक्षम उमेदवार दिले आहेत असे यावेळी सांगितले.
शहरात राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी मंजूर निधी त्याच ठिकाणी खर्च करून दर्जेदार कामे करण्याची हमी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने देण्यात येत आहे, त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता, निर्भयपणे हाताचा पंजा आणि आणि तुतारी या चिन्हा समोरील बटन दाबून काँग्रेस उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन शेवटी केले,
या प्रचार सभेस माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, काँग्रेस पक्षाच्या एससी सेलचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे, श्री इनामदार, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष युनुस शेख त्यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते, सभेला गंगाखेडच्या जनतेकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
@INCHarshsapkal@INCIndia@INCMaharashtra@INCMumbai@IYC@IYCMaha@nsui
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री व अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरात काँग्रेसचे प्रभारी,आदरणीय खासदार मा.श्री.मुकुलजी वासनिक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
शहीद सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे यासाठी सरकारला जाब विचारण्यासाठी मुंबई मंत्रालयावर सर्व संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने 3 मार्च रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील भीमसैनिकांनी या न्यायाच्या लढाईमध्ये हजारोंच्या संख्येने सामील व्हावे विनंती.
महाराष्ट्राचे माजी शालेय शिक्षण मंत्री तसेच लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ मा. राजेंद्र बाबू दर्डा साहेब आज परभणीच्या दौऱ्यावर आले आहेत. कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.या वेळी शहर जिल्हा काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
त्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या समाज कंठकावर कठोर कारवाई करावी.
परभणी येथे महामानव, भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्याची घटना अत्यंत संतापजनक आणि निंदनीय आहे. बाबासाहेबांचा आणि संविधानाचा अपमान करण्याची हिंमत होतेच कशी? पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची कसून चौकशी करावी आणि यामागे कोण मास्टरमाईंड आहे का? हे देखील तपासावं. निषेध!!