कोणत्याही नात्यामध्ये सर्वात जास्त महत्वाचा काय असेल तर एकमेकांबद्दलचा आदर. तो आदर जर नसेल तर ते नातं कमकुवत असतं. कितीही जोडायचा प्रयत्न केला तरी ते जोडलं जात नाही.
#Siyawrites
@TimelessSpaces3 प्रत्येकाच्या मनात गुरुची एक प्रतिमा असते, श्रद्धा असते. मी माझ्या गुरूंच्या आणि माझ्या नात्याबद्दल लिहिलं आहे. बाकी तुम्ही लिहिलेलं पण खरंच आहे🙏
कधी कधी आपल्यापेक्षा वेगळा विचार करणारी माणसे आपल्याला आयुष्याची दुसरी बाजू दाखवतात. त्यांच्यामुळे आपला जगाकडे बघायचा दृष्टिकोन एकांगी न होता जास्त डोळस होतो.
#Siyawrites
माणसाच्या आयुष्यात गुरूंचे स्थान अढळ असते. व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी गुरूंची मदत असतेच. आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणी आणि दुःखाचा भार ज्यांच्या चरणी ठेवला की पुन्हा लढण्याचे बळ मिळते, असे गुरू मिळणे दुर्मिळच.
#गुरुपौर्णिमा 🙏
#Siyawrites
ज्या गोष्टी मनाला पटतील त्या बुद्धीला पटतीलच अस नाही. बऱ्याचदा यात विरोधाभास असतो. जेव्हा मन आणि बुद्धी यांचं एकमत होत तेव्हां माणूस कोणत्याही संकटातून, दुःखातून बाहेर येऊ शकतो.
#Siyawrites
सत्ता कायमची नसते. अहंकाराने फुगलेले सिंहासनही एक दिवस कोसळते.
सत्तेचा गर्व जितका मोठा, तितका त्याचा पडावही मोठा.
हुकूमशाही कितीही बलवान असली तरी काळापुढे तीही टिकत नाही.
कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाही. इतिहास प्रत्येकाला त्याची जागा दाखवतोच.
#Siyawrites