Gen-Z
आज सुट्टी आहे.
स्टेटस लावायचा दिवस.
DP बदलायची संधी.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती.
फोटो. पुष्पहार. भाषण.
आणि मग… Netflix.
आपण “जय भीम” म्हणतो .
छान.
पण भीमाचे अत्युंग साहित्य वाचतो का?
ते 22व्या वर्षी Columbia University मध्ये.
25व्या वर्षी संशोधन.
27व्या वर्षी प्राध्यापक.
29व्या वर्षी वृत्तपत्र.
आपण ?
22व्या वर्षी… reels.
25व्या वर्षी… confusion.
27व्या वर्षी… “settle होतोय”.
प्रगती? नक्की.
देशात समस्या नाहीत.
सगळं ठीक.
बेरोजगारी?
“Skill issue”.
असमानता?
“Mindset problem”.
लोकशाही?
“Election झालं ना!”
खाजगीपणा?
“Nothing to hide”.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले—
“शिका. संघटित व्हा. संघर्ष करा.”
आपण काय केलं?
शिका → Google search.
संघटित व्हा → WhatsApp group.
संघर्ष करा → Twitter rant.
क्रांती पूर्ण.
महामानव
जातिव्यवस्थेवर संशोधन करतात.
कायद्याचं शिक्षण घेतात .
संविधान घडवतात.
आपण
comment section मध्ये भांडतो .
meme बनवता.
आणि स्वतःला “जागृत ” समजतो.
छान चाललंय.
त्यांनी विचारले —“Why inequality?”
आपण विचारतो —“Which filter looks better?”
ते लिहितात —
Annihilation of Caste
Castes in India: Their Mechanism, Genesis and Development
Who Were the Shudras?
The Untouchables: Who Were They and Why They Became Untouchables
The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution
States and Minorities
Pakistan or the Partition of India
The Buddha and His Dhamma
Riddles in Hinduism
Philosophy of Hinduism
The Rise and Fall of Hindu Women
Waiting for a Visa
तुम्ही लिहिता—
“Feeling cute. Might delete later.”
प्रश्न असा नाही की
तुम्हाला माहिती नाही.
प्रश्न असा आहे की
तुम्हाला फरक पडत नाही.
देश बदलतोय.
तंत्रज्ञान वेगात.
समाज ताणात.
राजकारण तापात.
तुम्ही?
notification मध्ये.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी
पुस्तकं वाचली.
पुस्तकं लिहिली
प्रश्न विचारले.
व्यवस्थेला आव्हान दिली.
तुम्ही
forward वाचता.
प्रश्न टाळता.
व्यवस्थेला like करता.
जयंती साजरी करणे सोपं आहे.
विचार जगवणे कठीण.
फोटो लावणे सोपं.
विचार स्वीकारणे कठीण.
घोषणा देणे सोपं.
संघर्ष करणे कठीण.
Gen Z,
थोडं थांबा.
स्क्रोल थांबवा.
डोळे वर करा.
देश बघा.
जग बघा.
स्वतःला बघा.
तुम्ही इतिहासातील
सर्वात connected पिढी.
पण सर्वात disconnected मन.
सगळं माहिती.
काहीही समजत नाही.
जर खरंच आदर असेल—
DP लावाच.
पण पुस्तक उघडा.
पोस्ट करा, पण कृतिशीलसुद्धा व्हा .
प्रश्न विचारा.
“जय भीम” म्हणा.
पण “भीम” जास्त जगा.
कारण
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
त्यांना केवळ followers नको होते.
त्यांना विचार करणारे लोक हवे होते.
कृती करणारे followers हवे होते.
आपण तयार आहोत का?
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
-महेश झगडे
@instagram@Meta The fraudulent Instagram ID “Rai Bhatii Rajput” is repeatedly posting content that shamelessly insults B. R. Ambedkar—please take action or remove this account.
@5hrSwg4IGrVmyaJ@NMMConline@NMMCCommr नेरुळ येथे सेक्टर 6 कुकशेत गाव काडे 2 ठिकणी कचरा कुंडी नाही आहे लोक नुस्ता रस्त्यवर कचरा तकत चालाय आनी घाण पसर्ली आहे. कृपया दाखल घेउन लवकरच या परिसार ला कचरा कुंडी द्यावी.
@5hrSwg4IGrVmyaJ@NMMConline@NMMCCommr नेरुळ येथे सेक्टर 6 कुकशेत गाव काडे 2 ठिकणी कचरा कुंडी नाही आहे लोक नुस्ता रस्त्यवर कचरा तकत चालाय आनी घाण पसर्ली आहे. कृपया दाखल घेउन लवकरच या परिसार ला कचरा कुंडी द्यावी.
@NMMConline@Navimumpolice नेरुळ सेक्टर ४ मधील Samadhan Restaurantच्या बाजूला, कट्टा रेस्टॉरंटजवळ टर्निंगवर नेहमी 2/4 व्हीलर पार्क असतात, त्यामुळे बसला वळण घेण्यास अडचण होते. कृपया येथे **No Parking** बोर्ड लावावा.
Dear @TheOfficialSBI@MahaCyber1 I faced an OLX fraud. As per the attached screenshot, the mentioned UPI ID and contact details belong to the fraudster. Please block the UPI ID and deactivate the associated bank account
Dear @NMMConline@NMMCCommr@MhatreManda@ganeshnaikjd नेरुळ LP ब्रिज सबवे बाजूला भिकारी घाण करत असून सेक्टर६ (सरसोळे–पामबीच रोड, झुलेलाल मंदिराजवळ) कचरा मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. कृपया सेक्टर ६ मध्ये फिरते कचरापेटी (डस्टबिन व्हॅन) सुरू करावी व नेरुळLP बाजूचे भिकारी हटवावेत.