"नाशिकला १५ आमदार असताना पालकमंत्री मात्र बाहेरचा!"
नाशिक जिल्ह्यात १५ आमदार, अनेक अनुभवी नेते आणि स्थानिक नेतृत्व असताना नाशिकचा पालकमंत्री करण्यासाठी भाजपला दुसऱ्या जिल्ह्यातील गिरीश महाजन यांचीच निवड करावी लागते, हा नाशिकच्या जनतेचा अपमान नाही का?
सत्ताधाऱ्यांना नाशिकच्या स्थानिक नेतृत्वावर विश्वास नाही की कुंभमेळ्याच्या नावाखाली राजकीय सोयीचे गणित साधायचे आहे?
सरकारच्या या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. सलीम मामा शेख यांनी खरपूस समाचार घेतला आहे. #nashik #नाशिक
Gen Z ही केवळ शहरांपुरती मर्यादित नाही, तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही तितकीच जागरूक आणि व्यक्त होणारी पिढी आहे.
याच ग्रामीण Gen Z चे उदाहरण म्हणजे कोंडिवडे, कर्जत येथील शाळकरी विद्यार्थिनी, ज्यांनी आपल्या गावातील रस्त्यांच्या समस्येवर पत्रकारांच्या शैलीत व्हिडिओ तयार करून ती समस्या प्रभावीपणे मांडली.
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांनी या विद्यार्थिनींची भेट घेऊन त्यांच्या धाडसाचे व सामाजिक जाणीवेचे कौतुक केले. यावेळी सर्व विद्यार्थिनींचा सत्कार करून त्यांना तसेच त्यांच्या पालकांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#MNSAdhikrut
#SalmanKhan as JIVA MAHAL in #RajaShivaji 🔥🗡️
Ritesh Deshmukh really brings out Salman Khan's INTENSE SCREEN PRESENCE in this one..💥💥⚡
What a FIERY CAMEO..!!! 👏🏼👏🏼🔥🔥🔥
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्या १०५ हुतात्म्यांना आणि थोर नेत्यांना मानाचा मुजरा!
ज्यांच्या त्यागातून, श्रमातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला त्या मुंबईचं, आपल्या महाराष्ट्राचं महत्व उमजलं का ?
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#महाराष्ट्रदिन #कामगारदिन
महाराष्ट्रात 'मराठी' अनिवार्यच, हे आता रेल्वे प्रशासनाने कायमचं लक्षात ठेवावं! 🚩
मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेत (GDCE) अखेर 'मराठी' भाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा केवळ आमचा विजय नाही, तर इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्काचा आणि मराठी अस्मितेचा विजय आहे.
गेल्या काही दिवसांपासून आम्ही या विषयावर रेल्वे प्रशासनाला ठणकावून सांगितलं होतं की, महाराष्ट्रात होणाऱ्या परीक्षांतून मराठीला डावलणं सहन केलं जाणार नाही. उशिरा का होईना, प्रशासनाला जाग आली आहे.
पण रेल्वे प्रशासनाने एक गोष्ट नीट समजून घ्यावी, महाराष्ट्रात 'मराठी' ही अपरिहार्य (Unavoidable) आहे. मग अशा प्रकारच्या ‘चुका’ वारंवार होतातच कशा? प्रत्येक वेळी आम्ही पत्रव्यवहार करावा किंवा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल याची वाट पाहू नका. प्रशासनाने स्वतःची जबाबदारी ओळखून मराठीचा समावेश आधीच करणं अपेक्षित आहे.
आपल्या राज्यात आपल्या भाषेला योग्य तो सन्मान मिळायलाच हवा. त्यामुळे पुन्हा अशा प्रकारची चूक झाली, तर ती खपवून घेतली जाणार नाही. इथल्या मराठी तरुणांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा करू नका!
जय हिंद, जय महाराष्ट्र!
अमित राज ठाकरे
नेता,महाराष्ट्र नवनिर्माण सेना
येवढी लोक बोलताहेत की रितेश महाराजांच्या भूमिकेत शोभत नाही…
त्यावरून मला तर एवढं नाही वाटत….
व्यवस्थित तर दिसतोय रितेश….
समाजातील विशिष्ट घटकांच्या आयटीसेल ने त्या टीजर खाली बल्क quantity मधे रितेश शोभत नाही अशा निगेटिव्ह कमेंट टाकून लोकांच्या तेच डोक्यात घालत आहेत…