आज महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी महिलांच्या सक्षमीकरणासंदर्भातील शासकीय विधेयक (विधानसभा विधेयक २००६ - क्र. ४८) च्या चर्चेदरम्यान सहभागी होत या महत्त्वपूर्ण विधेयकाबद्दल मा.मंत्री महोदयांचे अभिनंदन केले.
या विधेयकाच्या माध्यमातून शासन व्यवस्थेत शेतकरी महिलांना "शेतकरी" म्हणून अधिकृत प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना, या प्रमाणपत्राच्या आधारे स्वतंत्र कर्जपुरवठा योजना, पिक विमा निश्चितीच्या पद्धतीत मूलभूत आवश्यक सुधारणा, शेतमाल विक्रीसाठी सुरक्षित व सक्षम व्यवस्था तसेच व्यापाऱ्यांकडून होणारी संभाव्य फसवणूक रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याबाबत सभागृहात महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले.
शेतकरी महिलांचे नेतृत्व अधिक सक्षम करण्यासाठी या सर्व बाबींचा शासनाने संवेदनशीलतेने व वास्तववादी दृष्टीकोनातून विचार करावा, अशी मागणी करत विधेयकास समर्थन दिले.
#SumitWankhede #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #all #trending #MonsoonSession
आज महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मा.महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांनी शेतीची पोत सुधारण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णयावर निवेदन केले. जलसंपदा विभाग तसेच मृद व जलसंधारण विभागांच्या अखत्यारीतील जलकुंभ, गावतळी, शेततळी, विहिरी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे आणि लघु सिंचन तलावांमधील गाळ, माती व मुरूम शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.
ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करून मांडत होतो. अखेर या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने निर्णय जाहीर केल्याबद्दल मा. महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे मनःपूर्वक आभार आणि हार्दिक अभिनंदन.
हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असून शेतीची पोत सुधारण्यास, उत्पादनक्षमता वाढविण्यास आणि ग्रामीण भागातील जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यास निश्चितच मोठी मदत करेल.
#SumitWankhede #ChandrashekharBawankule #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #all #trending #MonsoonSession
आर्वी विधानसभा मतदारसंघातील कारंजा येथे भारत फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत आज महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून हा गंभीर विषय सभागृहासमोर मांडला.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पीडित महिलांना तातडीने न्याय मिळावा, यासाठी वर्धा पोलीस अधीक्षक यांना चौकशीचे आदेश देण्याची मागणी शासनाकडे केली.
#SumitWankhede #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #MonsoonSession #all #trending
आज महाराष्ट्र विधानसभेत वित्तीय संस्थांमधील ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करणाऱ्या महत्त्वपूर्ण विधेयकाला पाठिंबा देत शासनाचे अभिनंदन केले.
वित्तीय संस्थांच्या गैरकारभारामुळे ठेवीदारांना त्यांच्या कष्टाच्या पैशासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी हे विधेयक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी काही महत्त्वपूर्ण सूचना ज्यामध्ये MPID अंतर्गत अधिक जलद कार्यवाही , संबंधित प्रकरणांची सुनावणी कालबद्ध पद्धतीने फास्ट ट्रॅक न्यायालयात व्हावी, ठेवीदारांना त्यांची गुंतवणूक शक्य तितक्या लवकर परत मिळावी तसेच फसवणुकीच्या बाबत जनजागृती अभियान राबवण्यात यावे अशा सूचना मांडल्या.
सर्वसामान्य ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दिशेने हे विधेयक प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त करत या विधेयकाला माझा पाठिंबा दर्शविला.
#SumitWankhede #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #all #trending #MonsoonSession
आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये होत असलेल्या कथित गैरव्यवहार व अनियमिततेचा गंभीर मुद्दा सभागृहात उपस्थित केला.
योजनेअंतर्गत संशयास्पद दावे, बनावट शस्त्रक्रियांच्या नोंदी तसेच इतर आर्थिक अनियमितता लक्षात घेता संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, ज्या रुग्णालयांमध्ये अशा प्रकारचे संशयित दावे व शस्त्रक्रियांची नोंद आढळून आली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, संबंधित डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी तसेच संबंधित रुग्णालयांचे मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली.
#SumitWankhede #BJP4Maharashtra #MonsoonSession #all #trending
आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे मतदारसंघातील मौजा हेटीकुंडी, ता.कारंजा येथील गवळाऊ गाईंच्या शासकीय पशुपैदास केंद्रातील नागपूर विभागाच्या भ्रूण प्रत्यारोपण केंद्राच्या बांधकामास महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेली स्थगिती तात्काळ उठविण्याबाबत सभागृहासह शासनाचे लक्ष वेधले.
यावेळी सदर बांधकामावरील स्थगिती तात्काळ उठवून काम सुरू करण्याबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
#SumitWankhede #BJP4Maharashtra #MonsoonSession #all #trending
हरित क्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
महाराष्ट्र कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#VasantraoNaik#SumitWankhede#BJP4Maharashtra
आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे विविध प्रश्नांकडे सभागृहासह शासनाचे लक्ष वेधले. मुख्यत्वे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत विहिरी व फळबागांच्या अकुशल कामांसाठीचा मिळणारा निधी सन २०२३ पासून प्रलंबित असून, तो नेमका कधीपर्यंत उपलब्ध होणार याबाबत प्रश्न उपस्थित केला.
तसेच, नव्याने सुरू झालेल्या विकसित भारत – रोजगार आणि आजीविका हमी अभियान (ग्रामीण) (VB-G RAM G) अंतर्गत फळबाग लागवड व विहीर यासारख्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ सर्व लाभार्थ्यांसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी करून शासनाची भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली.
सोबतच, पांदण रस्ते योजनेंतर्गत मंजूर कामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईचा मुद्दाही उपस्थित केला. वेळोवेळी पाठपुरावा करूनही अनेक कामे रखडलेली असल्याने संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कामांना गती देण्याची मागणी करण्यात आली.
या सर्व मुद्द्यांवर मंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका व्यक्त करत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही सभागृहात दिली.
#SumitWankhede #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #MonsoonSession #GraminRojgarYojana #all #trending
महाराष्ट्र शासनामार्फत "डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत सौर कुंपण योजना" सुरू करण्यात आली असून, सदर योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आर्वी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी बांधवांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास किंवा अर्जासंदर्भात काही शंका असल्यास माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा...
कार्यालय संपर्क पत्ता :
मा.श्री. सुमित वानखेडे
आमदार, आर्वी विधानसभा मतदारसंघ.
पद्मावती चौक, आर्वी, जि. वर्धा
#DrShyamaPrasadMukherjee #SumitWankhede #BJP4Maharashtra #ViksitBharat #all #trending
महाराष्ट्र शासनामार्फत "डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत सौर कुंपण योजना" सुरू करण्यात आली असून, सदर योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आर्वी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी बांधवांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास किंवा अर्जासंदर्भात काही शंका असल्यास माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
कार्यालय संपर्क पत्ता :
मा. श्री. सुमित वानखेडे
आमदार, आर्वी विधानसभा मतदारसंघ.
पद्मावती चौक, आर्वी, जि. वर्धा
१३५ वा ‘मन की बात’ कार्यक्रमाचे बूथस्तरावर सर्वोत्कृष्ट आयोजन करून आर्वी विधानसभा राज्यात प्रथम क्रमांकावर..!!
आर्वी विधानसभेतील प्रत्येक बूथवर ‘मन की बात’ कार्यक्रमाचे १००% यशस्वी आयोजन करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#SumitWankhede #BJP4Maharashtra #ViksitBharat #ManKiBaat #MannKiBaat135
आज पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात च्या भाग १३५ या कार्यक्रमाचे आर्वी शहरातील बूथ क्र. १६९ येथे कार्यकर्ते व नागरिकांसमवेत श्रवण केला.
यावेळी आर्वी शहर अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष जाकीर अहमद, बुरहाणी बोहरा, वसीम फारुकी, अब्बास बोहरा,मोसिन शेख, इमरान रिजवी, परवेज शेख, प्रफुल काटकर, हिरासिंग बावरी, अकील शेख, नाझीम फारुकी, ज्योतीताई काळे,रोशनीताई सूर्यवंशी, सहजाद शेख, जमिला शेख, रुबीना शेख, नजीम अंसारी, रहिमा बी, श्याम सूर्यवंशी, गोपाल राय यांची उपस्थिती होती.
मन की बात – भाग १३५ मधून देशाच्या विकासासाठी जनसहभाग, नवकल्पना, स्वावलंबन, पर्यावरण संवर्धन आणि विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणारे विचार मांडण्यात आले. अशा प्रेरणादायी संदेशांमधून समाजहितासाठी कार्य करण्याची नवी ऊर्जा मिळते.
संपूर्ण देशाला प्रेरणा, सकारात्मक ऊर्जा आणि विकासाचा नवा दृष्टिकोन देणारा हा संवाद निश्चितच मार्गदर्शक ठरतो.
#MannKiBaat135 #MannKiBaat #NarendraModi #DigitalIndia #ViksitBharat #BJP #SumitWankhede #BJP4Maharashtra