💔MISS YOU DADA💔
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार @amolmitkari22. यांचा आज आमदार पदाचा कार्यकाल संपला दादांनी त्यांचे मोठा विश्वास टाकून त्यांना संधी दिली होती. आज @AjitPawarSpeaks बद्दल बोलताना दादांच्या आठवणीत मिटकरी साहेब कमालीचे भावूक होते, त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.😥
बरेच मंत्री,आमदार, उद्योजक हे भोंदूबाबा अशोक खरातांच्या घरी गेले त्यांच्या पाया पडले सोबत फोटो काढले पण तरी रुपालीताईंनाच बदनाम केले गेले.कारण त्यांनी महिलाभगिनींमध्ये केलेली जनजागृती हेच मूळ कारण आहे. हे कोणाला रुचलं नाही हे संशोधनाचा भाग आहे.
@ChakankarSpeaks@SunetraA_Pawar
पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा बारामती या ठिकाणी उपस्थित जनसमुदयास मार्गदर्शन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब......
@AjitPawarSpeaks
*🎉आपणा सर्वांच्या जीवनात हे वर्ष सुख-समाधानाचे, इच्छा-आकांक्षा घेऊन येवो व उत्तम आरोग्य लाभो याच सदिच्छा..!*
*✨💐सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!✨💐*
💥*#HappyNewYear2026🔖*
आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्यसभा खासदार सौ. सुनेत्रावहिनी पवार यांचे विशेष आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारला निवेदन!
@SunetraA_Pawar
राष्ट्रवादी चिंतन शिबिराच्या विचारमंथनातून सुरू होणार; नवा अध्याय सर्व समाजघटकाच्या प्रगतीचा, महाराष्ट्राच्या गतिमान विकासाचा..!
#राष्ट्रवादी_चिंतन_शिबिर
📍मुंबई
शिक्षण, महिला, बालक, युवक आणि क्रीडा विषयक संसदीय स्थायी समितीच्या अभ्यासभेटीत सहभागी झाले.या बैठकीत देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या अनेक विषयांवर व्यापक व रचनात्मक चर्चा झाली.
यावेळी महिलांचा “कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियम, २०१३ (POSH)" च्या अंमलबजावणीवर विशेष चर्चा करण्यात आली.
शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तावाढ, महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, तरुणांसाठी कौशल्यविकास व रोजगाराच्या नव्या संधी, तसेच क्रीडाक्षेत्रात जागतिक स्तरावर आपला ठसा उमटविण्यासाठी आखण्यात येणाऱ्या धोरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
समितीच्या या चर्चेमध्ये केवळ सध्याच्या गरजांचा विचारच नव्हे, तर भविष्यातील आव्हाने व संधी लक्षात घेऊन धोरणे अधिक सक्षम आणि परिणामकारक कशी होतील, यावरही भर देण्यात आला.
ही बैठक खरोखरच प्रेरणादायी ठरली असून, आगामी काळात या क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी नक्कीच दिशा देणारी ठरेल.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. काही ठिकाणी या पूरपरिस्थितीमुळं नागरिकांची दुःखद जीवित हानी झाली आहे. त्याचबरोबर अनेक घरे, गृह उपयोगी वस्तू, आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे.
या परिस्थितीत पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथे २४-२५ सप्टेंबरला होणारा माझा ‘जनसंवाद’ कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
मी स्वतः लवकरच पूरग्रस्त भागांना भेट देणार आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या सर्व पालकमंत्र्यांनी आपल्या नेमून दिलेल्या जिल्ह्यात आणि आमदारांनी आपल्या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या बांधावर, गावोगावी नुकसानग्रस्त भागात जाऊन बाधित नागरिकांना त्वरित दिलासा व मदत द्यावी, तसेच प्रशासनाने त्वरित पंचनामे करण्यास सुरुवात करावी असे निर्देश दिले आहेत.
आज सोलापूरच्या पूरपरिस्थितीचा पाहणी दौरा करमाळा तालुक्यातील कोर्टी इथून सुरू केला. सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसंच झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनानं काटेकोर नियोजन करून आवश्यक ती उपाययोजना त्वरित राबवावी, असे स्पष्ट निर्देश दिले. शेतकरी बांधवांच्या पाठीशी आपलं सरकार खंबीरपणे उभं आहे.
आज संगोबा येथे बांधावर जाऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, नुकसान झालेल्या शेतपिकांचा आढावा घेतला. पिकांचं जे नुकसान झालेलं आहे, त्यांचे तातडीनं पंचनामे करून त्वरित मदत पोहोचवावी, अशा सूचना संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या.
📍करमाळा, सोलापूर
राष्ट्रवादी एक विचार, राष्ट्रवादी एक परिवार...
आजच्या उत्साही सकाळची सुरुवात राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमानं झाली. दापोडी येथे श्री. नजीर मुजावर यांच्या राहत्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या परिवारानं मला दिलेलं प्रेम हे मोलाचं आहे, त्यासाठी मी सर्वांचा आभारी आहे. यानिमित्तानं अल्पोपहाराचा आनंद लुटला. या प्रसंगी दापोडी परिसरातील नागरिकांनी सुद्धा मोठ्या आपुलकीनं स्वागत केलं, त्यांना देखील धन्यवाद देतो. लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्यासाठी सदैव कार्यतत्पर राहीन, असा विश्वास सर्वांना दिला.
#राष्ट्रवादी_परिवार_मिलन