President Nationalist Congress Party Pune| Ex Member of Legislative Assembly, Maharashtra,Vadgaonsheri Assembly, Pune Councillor, P.M.C| NCP | Civil Engineer
महाराष्ट्राचे लाडके, लोकाभिमुख आणि विकासाला नवी दिशा देणारे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महाआरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर उद्घाटन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, खासदार मा. सुनील तटकरे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित होतो. मा. आमदार विलास भाऊ लांडे, नगरसेवक विराज लांडे, मा. नगरसेवक विक्रांत लांडे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.
स्व. अजितदादांनी आयुष्यभर जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, सर्वसामान्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि लोकसेवा हीच खरी राजकारणाची ओळख असावी, हा त्यांचा विचार आजही आपल्याला प्रेरणा देत राहतो. त्यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य आणि रक्तदानासारखा समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी शहराध्यक्ष श्री. योगेश बहल, कविताताई आल्हाट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीमुळे आणि सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, स्वयंसेवक, कार्यकर्ते आणि उपस्थित नागरिकांचे मनःपूर्वक आभार.
#लोकनेता
#अजितदादापवार
@SunilTatkare
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!"
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रखर नेते, समाजजागृतीचे प्रणेते आणि राष्ट्रभावनेला नवी दिशा देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य, शिक्षण आणि सामाजिक जागृतीचा दीप प्रज्वलित केला.
त्यांचे विचार, राष्ट्रनिष्ठा आणि समाजहिताची प्रेरणा आजही प्रत्येक भारतीयाला नवी ऊर्जा देत आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श जपत राष्ट्रसेवेचा संकल्प अधिक दृढ करूया.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#लोकमान्यटिळक #LokmanyaTilak
आमचे नेतृत्व आधारवड स्मरणीय नेतृत्व स्व अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराच्या वतीने आयोजित विविध विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा आज संपन्न झाला. समाजातील प्रत्येक घटकाला बळ देणारे आणि सकारात्मक परिवर्तन घडविणारे उपक्रम हेच स्व. अजितदादांना खरी आदरांजली आहेत.
आगामी काही दिवसात आदर्श महिला सक्षमीकरण पुरस्कार, ई-पिंक रिक्षा योजनेसाठी पात्र महिलांना फॉर्म वाटप, वृक्षारोपण तसेच बुद्धिबळ स्पर्धा अशा विविध उपक्रमांद्वारे स्व. अजितदादांनी जपलेला समाजहिताचा आणि विकासाचा विचार कृतीतून पुढे नेण्याचा प्रयत्न शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होणार आहे.
मा.नगरसेवक प्रकाशभाऊ ढोरे , पुणे शहर अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग विनोद रणपिसे, मा. पौर्णिमाताई बाळासाहेब रानवडे, मा. स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब द. रानवडे आणि कार्याध्यक्ष अमृता स्वप्नील रानवडे यांच्या माध्यमातून हे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
#लोकनेते
#अजितदादा
#अजितदादा_पवार_जयंती
#राष्ट्रवादी_काँग्रेस_पार्टी
राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
आदरणीय दादा…
खरंतर 22 जुलै म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी उत्साहाचा दिवस
हा दिवस आला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची धामधूम असायची. तुमच्यासाठी वाढदिवस हा पण कामाचाच दिवस असायचा. तुम्हाला भेटून शुभेच्छा दिल्या की काय सुनील मतदारसंघात काम कशी सुरू आहे? योजनांचे काय अपडेट्स आहेत हे तुम्ही विचारायचा. यंदाही तुम्हाला प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या, आपल्या मतदारसंघात आणि समाजासाठी कोणते विधायक उपक्रम करणार आहोत हे सांगायचं, तुमच्याकडून नेहमीप्रमाणे एखादी शाबासकीची थाप आणि पुढच्या कामाची दिशा घ्यायची…हेच ठरवलं होतं पण यावेळी शुभेच्छा स्वीकारायला तुम्हीच नाही.
दादा, तुमच्या अचानक जाण्याने आयुष्यात एक अशी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीच भरून निघणार नाही. माझ्यासाठी तुम्ही केवळ नेते नव्हता, तर प्रत्येक कठीण प्रसंगी खंबीरपणे पाठीशी उभे राहणारा आधार होता. काम करताना शिस्त कशी असावी, प्रशासनावर पकड कशी असावी, जनतेच्या प्रश्नांवर तडजोड न करता ठामपणे उभं कसं राहावं आणि विकास हा नेहमीच केंद्रस्थानी कसा ठेवावा, हे मी तुमच्याकडूनच शिकलो.
आजही एखादा कठीण प्रश्न समोर आला, राज्यावर संकट आलं किंवा जनतेच्या अडचणी पाहिल्या की एकच विचार येतो... "आज दादा असते तर..." हा विचार केवळ माझ्या मनात नाही, तर असंख्य महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आजही जिवंत आहे. हीच तुमच्या कार्याची खरी कमाई आहे.
दादा, तुमची जयंती साजरी करण्याची वेळ आमच्यावर आली, हे आमचं दुर्दैव आहे. तुमच्या जाण्यानंतर आदरणीय सुनेत्रावहिनींनी मोठ्या धैर्याने तुमची जबाबदारी स्वीकारली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळत त्या तुमचा विचार आणि वारसा पुढे नेत आहेत. पण या सगळ्या प्रवासात प्रत्येक क्षणी तुमची उणीव प्रकर्षाने जाणवते.
दादा, तुमचा हात आज डोक्यावर नसला तरी तुमची शिकवण, तुमचे संस्कार आणि तुमचा विश्वास हीच आमची ताकद आहे. तुमचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून तुमच्या विचारांचा, संघर्षाचा आणि जनसेवेच्या व्रताचा वारसा अखेरच्या श्वासापर्यंत जपण्याचा आणि पुढे नेण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहीन.
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
@mahancpspeaks@SunetraA_Pawar@parthajitpawar
लोकनेते, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्व अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
पूर्वी हा दिवस दादांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्याचा असायचा. आज मात्र त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत जयंती साजरी करावी लागत आहे, ही वेदना शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारा, प्रत्येकाच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभा राहणारा आणि जनतेच्या हितासाठी अखंड झटणारा नेता म्हणून दादा सदैव स्मरणात राहतील. त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा, कामाची तळमळ आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी हेच आमच्यासाठी पुढील वाटचालीचे बळ आहे.
दादा, तुमची उणीव प्रत्येक क्षणी जाणवते. जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन आणि विनम्र प्रणाम.
आदरणीय दादा,
आज २२ जुलै… तुमचा वाढदिवस
दरवर्षीप्रमाणे यंदाही तुम्हाला प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या, मतदारसंघातील कामांचा आढावा द्यायचा आणि तुमच्या मार्गदर्शनातून पुढच्या वाटचालीची दिशा घ्यायची, अशीच मनापासून इच्छा होती. पण आज शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही आमच्यात नाही..! हे आमच्यासाठी आयुष्यभर पुरणारे दुःख आहे.
दादा, तुमच्या जाण्याने मी केवळ एक नेता गमावला नाही, तर संकटाच्या काळात खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा आधार हरवला.
आजही एखादा महत्त्वाचा प्रश्न समोर आला की मनात पहिला विचार येतो – "आज अजितदादा असते तर…!" हा विचार केवळ माझाच नाही, तर तमाम महाराष्ट्राच्या जनतेचाही आहे.
तुमच्या जाण्यानंतर आदरणीय सुनेत्रावहिनींनी मोठ्या धैर्याने जबाबदारी स्वीकारत तुमचा विचार आणि जनसेवेचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. आम्हीही तुमचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून संघर्ष, विकास आणि जनहिताचा तुमचा वसा पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहू.
दादा, तुमच्याकडून मिळालेली संघर्षाची शिकवण, कामाप्रती असलेली निष्ठा आणि सर्वसामान्य माणसासाठी झटण्याची प्रेरणा हीच माझी खरी ताकद आहे. तुमचा कार्यकर्ता म्हणून तुमचे विचार आणि ध्येय पुढे नेण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. हीच तुमच्या जयंतीनिमित्त तुम्हाला माझ्याकडून खरी आदरांजली.
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
पुण्याच्या विकासपुरुषाला कायमस्वरूपी मानवंदना...
पुणे महानगरपालिकेत स्व. अजितदादा पवार यांचे तैलचित्र साकार होणार, ही प्रत्येक पुणेकरासाठी अभिमानाची बाब आहे.
दादांनी पुण्याच्या विकासाला दिलेली दिशा आणि दूरदृष्टी ही पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. महानगरपालिकेतील हे तैलचित्र त्यांच्या कार्याची, विकासनिष्ठ नेतृत्वाची आणि जनसेवेच्या अखंड प्रवासाची कायम स्मरण करून देणारे ठरेल.
आज या तैलचित्रासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. विरोधी पक्षनेते निलेश निकम, मा. महापौर दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक राकेश कामठे, नगरसेवक गणेश कल्याणकर, नगरसेवक सूरज लोखंडे, महेश हांडे तसेच इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
आजच्या उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांनी या प्रकल्पांच्या उभारणीत तत्कालीन अर्थमंत्री, आपल्या सर्वांचे आधारवड स्व. अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र मंत्रिमंडळातून आवश्यक मंजुरी मिळवून देत केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला. "आज त्यांची उणीव जाणवते," या आम्हा सर्वांच्या भावना त्यांनी व्यासपीठावरून बोलून दाखवल्या. पुणे शिरूर उन्नत मार्ग, हडपसर–यवत या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी स्व. अजितदादांनी केलेला दूरदृष्टीचा पाठपुरावा आणि विकासाची भूमिका आजही या कामांच्या रूपाने जिवंत आहे.
पुणे जिल्ह्याच्या प्रगतीसाठी त्यांनी पाहिलेली स्वप्ने प्रत्यक्षात साकार होताना पाहणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे. पुणे जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणाऱ्या पुणे–शिरूर, हडपसर–यवत आणि तळेगाव–चाकण–शिक्रापूर या महत्त्वाकांक्षी उन्नत महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आज केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी आणि मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक व वैचारिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा आवाज हरपला आहे.
समाजपरिवर्तनाची तळमळ, लोकशाही मूल्यांवरील निष्ठा आणि युवकांना जागृत करण्याचे त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
आज लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वारगेट येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं.
यावेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मातंग समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि समाजप्रबोधनाच्या कार्यातून समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचा विचार जनमानसात रुजवला. त्यांचे विचार आणि कार्य समाजाला कायम प्रेरणा देत राहतील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे स्मारकास भेट देऊन राज्याच्या उपमुख्यमंत्री व पक्षाध्यक्ष आदरणीय सौ. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या सह अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
श्रमिक, वंचित आणि सर्वसामान्यांच्या वेदना आपल्या साहित्य व शाहिरीतून जगासमोर मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत.
पयावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मान्यवर आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते अभिवादन प्रसंगी उपस्थित होते.
#लोकशाहीरअण्णाभाऊसाठे
@SunetraA_Pawar@mahancpspeaks
पायाभूत सुविधा विकासाच्या दिशेने आणखी एक ऐतिहासिक पाऊल...
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) अंतर्गत पुणे–शिरूर उन्नत मार्ग, तळेगाव–चाकण–शिक्रापूर आणि हडपसर–यवत या तीन महत्त्वाकांक्षी रस्ते विकास प्रकल्पांचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत आहे. आमचे नेतृत्व आधारवड स्व. अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून पूर्व पुण्याच्या विकासाला गती मिळाली आहे.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या भूमिपूजन सोहळ्यास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीन गडकरी साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
पुणे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही मनःपूर्वक विनंती.
🗓️ शनिवार, १८ जुलै २०२६
🕜 दुपारी १.३० वाजता
📍 गणेश कला क्रीडा मंच, पुणे
युवा नेते, खासदार मा. पार्थदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. माझ्या संकल्पनेतून आणि प्रयत्नांतून लवकरच एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार आहोत. याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी वडगावशेरी मतदारसंघाध्यक्ष आनंदजी सरवदे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी किरण खैरे हेही उपस्थित होते.
शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना आपल्या लेखणीतून शब्द देणारे, लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी शिल्पकार होते.
त्यांच्या साहित्याने समता, स्वाभिमान, सामाजिक न्याय आणि मानवी मूल्यांची ज्योत प्रत्येकाच्या मनात प्रज्वलित केली. त्यांचे विचार आजही समाजाला अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि परिवर्तनासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देतात.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन
माझी लाडकी पुतणी शरयू हिने
नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन!
शरयू बेटा, तुझ्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीचे हे यश आहे. आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर तू यशस्वीपणे पाऊल ठेवले आहेस, याचा मनापासून आनंद वाटतो. पुढील वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवासासाठी तुला खूप खूप शुभेच्छा.
ज्ञान, सेवा आणि संवेदनशीलतेच्या बळावर तू एक उत्कृष्ट डॉक्टर म्हणून समाजातील सर्व घटकांसाठी काम करशील असा विश्वास आहे. खूप आशीर्वाद आणि मनःपूर्वक शुभेच्छा!
Dear Sharayu Beta,
Heartiest congratulations on clearing the NEET examination!
This is an important milestone, and your hard work and perseverance have brought you here. Wishing you all the very best for the next phase of your journey. May you continue to learn, grow, and make the most of every opportunity that comes your way.
May your future be filled with success, good health, and happiness.
With love and best wishes,
पुणे-शिरूर उन्नत महामार्गाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत २१ एप्रिल २०२३ रोजी तत्कालीन विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांच्यासमवेत प्रत्यक्ष पाहणी दौरा केला होता. त्यानंतर दादा उपमुख्यमंत्री झाल्यावर सर्किट हाऊस येथे सविस्तर बैठक घेऊन या प्रकल्पाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. तसेच या प्रकल्पाला गती मिळावी यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांनाही निवेदन सादर करण्यात आले होते.
या प्रकल्पासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला, प्रत्येक स्तरावर ही मागणी लावून धरली आणि पूर्व पुण्यातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.
आज या प्रकल्पाला प्रत्यक्ष गती मिळाली असून, १८ जुलै रोजी होणाऱ्या भूमिपूजनाचा मला मनापासून आनंद आहे. हा केवळ एका रस्त्याचा प्रकल्प नसून, पूर्व पुण्याच्या विकासाला नवी दिशा देणारा आणि लाखो नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करणारा ऐतिहासिक टप्पा आहे. याप्रसंगी आमचे नेतृत्व आधारवड स्मरणीय अजितदादा यांची प्रकर्षाने उणीव जाणवते आहे. त्यांच्या दूरदृष्टीने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू होतो आहे.
#PuneShirurElevatedCorridor
पुणे-शिरूर उन्नत महामार्गाबाबत आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीस मी उपस्थित होतो. या बैठकीस उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार (ऑनलाईन), सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्रराजे भोसले, कृषिमंत्री मा. दत्तामामा भरणे तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते. स्व. अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनातून आणि पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज प्रत्यक्षात येतो आहे.
राज्य शासनाने पुणे-शिरूर मार्गावर देशातील सर्वात लांब 'डबल डेकर' उन्नत महामार्ग उभारण्यास मंजुरी दिली. एकूण ५३ किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी सुमारे ३५ किलोमीटरचा भाग उन्नत उड्डाणपूल असणार असून, त्यासाठी सुमारे ₹७,३०० कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या स्तरावर सहा पदरी महामार्ग, तर दुसऱ्या स्तरावर रामवाडी ते वाघोलीदरम्यान पुणे मेट्रो धावणार आहे. त्यामुळे वाघोली, खराडी, शिक्रापूर आणि परिसरातील वाहतूक कोंडीत मोठी घट होणार असून, पुणे ते शिरूर हा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. तसेच हा मार्ग पुढे समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार असल्याने पूर्व पुण्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल, उद्योग, व्यापार आणि रोजगाराच्या संधी वाढतील तसेच लाखो नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होईल. राज्य शासनाच्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत करतो.
#PuneShirurElevatedCorridor
पुणे-शिरूर उन्नत महामार्गाबाबत आज आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीस मी उपस्थित होतो. या बैठकीस उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार (ऑनलाईन), सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्रराजे भोसले, कृषिमंत्री मा. दत्तामामा भरणे तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते. स्व. अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनातून आणि पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज प्रत्यक्षात येतो आहे.
राज्य शासनाने पुणे-शिरूर मार्गावर देशातील सर्वात लांब 'डबल डेकर' उन्नत महामार्ग उभारण्यास मंजुरी दिली. एकूण ५३ किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी सुमारे ३५ किलोमीटरचा भाग उन्नत उड्डाणपूल असणार असून, त्यासाठी सुमारे ₹७,३०० कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या स्तरावर सहा पदरी महामार्ग, तर दुसऱ्या स्तरावर रामवाडी ते वाघोलीदरम्यान पुणे मेट्रो धावणार आहे. त्यामुळे वाघोली, खराडी, शिक्रापूर आणि परिसरातील वाहतूक कोंडीत मोठी घट होणार असून, पुणे ते शिरूर हा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. तसेच हा मार्ग पुढे समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार असल्याने पूर्व पुण्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल, उद्योग, व्यापार आणि रोजगाराच्या संधी वाढतील तसेच लाखो नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होईल. राज्य शासनाच्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत करतो.
#PuneShirurElevatedCorridor
@SunetraA_Pawar@mahancpspeaks
राज्य शासनाची आदरणीय अजितदादांना मानवंदना!
स्व. अजितदादा अनंतराव पवार यांच्या जयंतीचा राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यापुढे दरवर्षी २२ जुलै रोजी सर्व शासकीय कार्यालयात त्यांची जयंती साजरी करण्यात येईल.
हा निर्णय त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा आणि समाजसेवेच्या वारशाचा गौरव करणारा आहे.
#AjitDadaPawar #Maharashtra #ncp #Mahayuti