भर पावसातुन स्टेशनपर्यंतचे अंतर यशस्वीरित्या पार केले.ट्रेन उशिराने धावत होती.ओला नसलेला एक बाक शोधून काढला.छत्री बाकाच्या खिळ्याला अडकवली आणि जरा उसंत घेतली.लोकल भरलेली आली,चटकन चढलो.६-७ स्टेशन निघून गेली.अजूनही माझी छत्री माझी वाट पाहत तिथेच लटकत असेल का?
#घष्टी
स्वातंत्र्य की स्वैराचार? संस्कार आणि मानसिकतेचा हा आरसा 🧠
आजच्या काळात फॅशन आणि स्वातंत्र्य या नावाखाली समाज कोणत्या दिशेला चालला आहे, हे सांगणारा हा फोटो खूप काही बोलून जातो. ही केवळ कपड्यांची तुलना नाही, तर ती आहे लज्जा आणि जबाबदारी यांतील फरकाची!
सार्वजनिक ठिकाणी वावरताना जर एखाद्या पुरुषाची पॅन्टची चैन चुकून उघडी राहिली, तर त्याला होणारा पश्चाताप आणि दिवसभर वाटणारी लाज हे त्याच्या सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. ती चैन चुकून उघडी राहिलेली असते, तरीही त्याला ��्वतःच्या नजरेत खाली बघितल्यासारखं वाटतं.
दुसरीकडे, आज काही ठिकाणी फॅशनच्या नावाखाली पाठ, मांड्या आणि नाभी सताड उघडी ठेवून वावरलं जातं. हे चुकून घडत नाही, तर ते जाणीवपूर्वक केलं जातं. गंमत म्हणजे, अशा प्रदर्शनानंतर जेव्हा लोकांच्या नजरा वळतात, तेव्हा सर्रास एकच वाक्य ऐकायला मिळतं आजकाल पुरुषांची मानसिकता खराब होत आहे!
मानसिकता शुद्ध असणे ही काळाची गरज आहेच, यात वाद नाही. पण स्वतःच्या मर्यादा सोडून वावरल्यानंतर केवळ दुसऱ्याच्या नजरेला दोष देणे कितपत योग्य आहे? टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. संस्कार, मर्यादा आणि शालीनता हीच समाजाची खरी ओळख असते.
कपड्यांचे स्वातंत्र्य जरूर असावे, पण ते इतरांच्या मानसिकतेची परीक्षा पाहणारे नसावे. स्वतःचा आदर करायला शिका, तरच समाज तुमच��� आदर करेल!