महाराष्ट्राचं महत्त्व जगाला कळतंय, पण आपल्याला आपल्या ताकदीची जाणीव कधी होणार? ज्या थोर महापुरुषांनी आणि दिग्गजांनी हे राज्य घडवलं, त्यांच्या कष्टाची जाण ठेवून आपण आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगायला हवा.
मराठीतच बोला, मराठीतच लढा आणि मराठीतच व्यक्त व्हा. आपली भाषा हीच आपली संस्कृती आणि आपल्या स्वप्नातल्या महाराष्ट्राचा पाया आहे. चला, आपल्या वैभवशाली वारशाचा अभिमान बाळगूया आणि मराठीचा डंका अभिमानाने मिरवूया!
#मराठीअस्मिता
#राजठाकरे
#महाराष्ट्रधर्म
#मराठीभाषा
#MNSAdhikrut
पुण्यातील वसंत व्याख्यानमालेच्या १५१ व्या ज्ञानसत्रात, 'माझ्या मनातील महाराष्ट्र, मराठी अस्मिता' या विषयावर माझं व्याख्यान झालं. महाराष्ट्र हा असा प्रांत आहे की तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, त्या क्षेत्रातली उत्तुंग व्यक्तिमत्व या भूमीत जन्माला आलेले आहेत. या सगळ्यांनी फक्त महाराष्ट्राला आकार दिला असं नाही तर त्यांनी देशाच्या भावविश्वाला आणि विचारविश्वाला आकार दिला. अशा महान व्यक्तींचा महाराष्ट्राला काहीसा विसर पडला आहे असं हल्ली जाणवतं.
आपण कोण आहोत, कोणाचे पूर्वज आहोत याचं अचूक भान आपल्याला आलं तर आपलं वर्तमान आणि भविष्य उज्वल असेल. त्यासाठी महाराष्ट्राच्या उज्वल परंपरेचा एक पट मी पुन्हा एकदा वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने मांडायचा प्रयत्न केला. आज १५० हुन अधिक उत्तुंग माणसांविषयी अगदी थोडक्यात व्यक्त झालो. अर्थात ज्यांच्याबद्दल बोलता आलं त्याच्या इतकीच किंवा त्याहून मोठी यादी ज्यांची नावं घेता आली नाहीत त्यांची आहे याची मला पूर्ण जाणीव आहे.
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला हा योग जुळून आला हा विशेष आनंद आहे. राजकीय नेत्यांचं काम हे फक्त राजकारण करणं इतकं नाही तर जमेल तेंव्हा प्रबोधन करणं हे पण आहे हे मानणाऱ्यातला मी आहे. त्यामुळे हे व्याख्यान तुमच्यासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या मराठी भाषेसाठी आणि आपल्याकडे जी रत्न जन्माला आली त्यांच स्मरण करून त्यातून बोध घेण्यासाठी जरूर ऐका.
https://t.co/0vOjM57rAs
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्या १०५ हुतात्म्यांना आणि थोर नेत्यांना मानाचा मुजरा!
ज्यांच्या त्यागातून, श्रमातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला त्या मुंबईचं, आपल्या महाराष्ट्राचं महत्व उमजलं का ?
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#महाराष्ट्रदिन #कामगारदिन
अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च २०२६ ला आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र' हा प्रश्न पडतो.
ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा 'गीतारहस्य' सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब 'तीर्थ' प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे.
महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि एकूणच विवेकाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आजदेखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जणं या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे.
हा खरात स्त्रियांचं शोषण करतोय, ते झालं तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपलं भलं करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही.
आधी आमदार खासदारकीची तिकिटं मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड. आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे.
आणि या असल्या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतले आहेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे. त्यात हल्ली महाराष्ट्रात काही अधिकारी हे मंत्र्यांचे सगळ्या प्रकारचे सल्लागार आणि नियोजनकार झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांना पण कसंही करून सत्तेला चिकटून रहायचं आहे.
या सगळ्याचा महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आतातरी होणार आहे का ? माध्यमं सध्या खरात प्रकरणाचा रोज पाठपुरावा करत आहेत हे चांगलं आहे पण म्हणून त्यांनी जनतेला पुन्हा एकदा आपण कोण होतो याचं दर्शन घडवायला हवं असं मला मनापासून वाटतं. गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून मी हा महाराष्ट्र कोणी घडवला आहे याचं दर्शन मुद्दामून करवलं होतं, ती माझी समज काय आहे हे दाखवण्यासाठी नाही. तर आत्ताच्या तरुण पिढीला हे कळावं म्हणून. माझ्यापरीने हे काम मी करत राहणार आहेच.
पण महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. हे असले लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात. महाराष्ट्रातील गावागावांत आजही कीर्तनं होतात, ज्ञानेश्वरीचं पठण होतं, आजही या राज्यात तर्काचा आवाज मोठा आहे. पण जर तुम्ही या असल्या नाठाळांना आपले नेते मानणार असाल तर महाराष्ट्राचं काही खरं नाही हे नक्की.
राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केला आहे.
जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेंव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं ? माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल.
माझी माध्यमांना विनंती आहे की तुम्ही या असल्या धोबीपछाड राजकारणाचा भाग होऊ नका. या असल्या बुवाबाबांना शोधून काढा. त्यांची कृत्य उघडकीस आणा. इतकंच नाही तर खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका.
Jai Maharashtra,
From today, registration drive for the primary membership of Maharashtra Navnirman Sena begins. Yesterday, after offering my respects to Chhatrapati Shivaji Maharaj, I filled my own primary membership registration form.
Through this initiative, I appeal to the youth of Maharashtra — by joining this membership drive, you will not merely become party members; you will become Sevak of Maharashtra. For us, your caste, religion, or political background is secondary. What truly matters is that you are deeply inspired by the spirit and pride of Maharashtra.
This is the very party that has consistently stood on the streets for Maharashtra through numerous movements, that has undertaken many socially meaningful initiatives, and that has presented a comprehensive vision for the state’s development. In the coming days, we will introduce several new initiatives that can help shape the direction and future of Maharashtra’s progress.
You now have the opportunity to be a part of this journey. Do not let this opportunity pass.
If you choose not only to become a member but also an active participant, it will bring me even greater satisfaction. The Maharashtra Navnirman Sena is entering a new phase of transformation, and I personally assure you that those who step forward during this process will receive meaningful opportunities to contribute.
For membership registration, my colleagues will be setting up stalls outside party branches and at prominent public locations across Maharashtra. You may visit these stalls and register in person. Alternatively, you may also complete your membership by scanning the QR code provided below, or simply visit https://t.co/atzF1PWSyp
I wholeheartedly welcome every individual who chooses to become a sentinel of Maharashtra through this membership drive into the Maharashtra Navnirman Sena family.
With regards.
Raj Thackeray
मनसे सदस्य नोंदणी अभियान!
काल लातूर येथे JSPM महाविद्यालय, जयक्रांती महाविद्यालय तसेच विजय GNM नर्सिंग स्कूल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष किरण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी मनसे सरचिटणीस तसेच मनसे शेतकरी सेना अध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे, मनसे विद्यार्थी सेना राज्य सरचिटणीस राजीव जावळीकर, शेतकरी सेना राज्य सचिव भागवत कांदे, लातूर मनसे विद्यार्थी सेना जिल्हा संघटक महेश माने यांच्यासह ध्रुव महापूरकर, योगेश सूर्यवंशी, रवी पांचाळ आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एक कार्यकर्ता स्वतःच्याच वाढदिवसानिमित्त स्वतःच फुलांचा गुच्छा आणि शाल घेऊन जातो आणि नेत्याकडून सत्कार करून घेतो आणि नेत्याच्या चेहऱ्यावर साधं स्मित हास्य देखील नाही.
मराठी तरुणांनी व्यवसाय करावा, सामाजिक कार्य करावे, पक्षासाठी पण काम करावे परंतु आपला स्वाभिमान देखील जपावा.
आज मराठी भाषा गौरव दिवस. सर्वप्रथम सर्व मराठी भाषिकांना आणि जे मराठी भाषिक नाहीत पण जे मराठी भाषेचा इथे राहून आदर करतात आणि बोलतात किंवा बोलायचा प्रयत्न करतात त्यांना देखील मनःपूर्वक शुभेच्छा.
आजच्या दिवसाची ही पोस्ट लिहिताना गेले काही दिवस सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल जी चर्चा सुरु आहे, त्याचे संदर्भ आहेत. त्यात दिल्लीत एआय परिषद झाली त्या सगळ्याचे संदर्भ पण डोक्यात घोळत होते.
त्यातच अँथ्रोपिकच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने जगभरात जी घुसळण सुरु केली आहे. त्या अँथ्रोपिकचा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री. राहुल पाटील ही मराठी व्यक्ती आहे ही पण बाब महत्वाची होतीच .
या निमित्ताने कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील लोकांशी चर्चा केली, त्यांचं म्हणणं समजवून घेतलं आणि त्यातून जे जाणवलं ते आज मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने मांडत आहे.
आज फक्त मराठीच नाही तर जगातील सगळ्याच स्थानिक भाषा ज्यांना स्वतःची लिपी आहे अशा सगळ्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे.
मध्यंतरी मला काही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणाली दाखवल्या. त्या बघितल्यावर एक लक्षात आलं ते म्हणजे आता ज्ञान मिळवायला किंवा व्यक्त व्हायला किंवा अर्थार्जन करायला या प्रणालींचा हवा तसा वापर करणं शक्य आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तुमची मातृभाषा उत्तम येत असेल तरी तुम्ही मागे पडू शकत नाही.
दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला आणि त्यानंतर जमीन ही मोठी शक्ती ठरली. औद्योगिक क्रांतीनंतर मशिन्स ही मोठी शक्ती वाटायला लागली. जसं डिजिटल युग सुरु झालं तसा डेटा शक्तिवान ठरला आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात हा डेटा ज्या भाषांमधून तयार होईल त्या भाषा शक्तिशाली ठरतील.
आणि म्हणूनच माझे महाराष्ट्र सैनिक असोत की इतर मराठी जनांनी, मराठी भाषेतून अतिप्रचंड पण उत्तम दर्जाचा डेटा तयार होईल हे बघितलं पाहिजे.
यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात समाज माध्यमांवर मराठीमध्ये व्यक्त व्हा. तुम्ही ज्या क्षेत्रांत तज्ज्ञ असाल त्याचे मराठीत ब्लॉग्स सुरु करा, मराठी पॉडकास्टस सुरु करा. कम्प्युटरवर कोडिंग करण्यापासून ते मराठी भाषिकांनी सुरु केलेले डिजिटल विश्वकोश तयार होऊ देत. शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता विषय, ती प्रणाली कशी हाताळायची हे सगळं मराठीत मुलांना शिकवलं जावं. या सगळ्यातून मराठी भाषा ही डिजिटल जगातील ज्ञानाची वाहक बनेल आणि जितका मोठा डेटा (विदा ) या सगळ्या कृत्रिम बुद्धी प्रणालींना मिळेल तितकी ही सर्व सॉफ्टवेअर्स उत्कृष्ट संधी मराठीत उपलब्ध करून देतील.
आपण मराठी भाषा आणि मराठी प्रांत याच्या सार्वभौमत्वासाठी आवाज उठवत आलो आहोत, आता या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मराठी भाषेतून ज्ञान मिळ्वण्याबाबतचं सार्वभौमत्व मिळवणं शक्य आहे. ही संधी सोडू नका.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक नोकऱ्या कमी होतील अशी भीती सर्वत्र बोलली जात आहे. ती सार्थ असेल देखील. पण नक्की काय घडेल याचा अचूक अंदाज कोणीच व्यक्त करू शकत नाही. पण एक असं तंत्रज्ञान तुमच्या हातात आलं आहे जे आत्मसात केलं तर पारंपरिक उधोगधंद्यात काहीसा मागे पडलेला मराठी माणूस स्वतःच खूप मोठं साम्राज्य उभं करू शकेल. आज जगातील अनेक बलाढ्य कंपन्या या गेल्या २० /३० वर्षांत उभ्या राहिल्या आहेत आणि ते जी संपत्ती निर्माण करत आहेत ते १०० वर्ष जुन्या उद्योगसमूहांना पण शक्य होत नाही. त्यासाठी डिजिटल जगात मराठी मोठ्या प्रमाणावर उमटेल हे पहा. समाज माध्यमांवर मराठीत टीका, द्वेष पसरवण्यापेक्षा नवीन सकारात्मक माहिती टाका.
तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा.
राज ठाकरे ।