#कराड येथे #कृष्णा_कृषी_महोत्सवांतर्गत आयोजित कृष्णा सांस्कृतिक महोत्सवाला रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. आजच्या पहिल्या दिवशी सादर झालेल्या 'जय जय महाराष्ट्र माझा' या कार्यक्रमात कलाकारांनी आपल्या गीत - नृत्य सादरीकरणातून महाराष्ट्राची लोकपरंपरा उलगडून दाखविली.
#कराड येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी महोत्सवाला कुटुंबासमवेत भेट दिली. या महोत्सवात कृषीसह व्यावसायिक व महिला बचत गटांनी लावलेल्या स्टॉलला भेटी दिल्या. तसेच हिंदी - मराठी गाण्यांच्या 'सूर बहार' या कार्यक्रमाचाही रसिकांसमवेत आनंद लुटला.