महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम न करता निव्वळ ढोबळ योजना दाखवून सत्तेत आल्यानंतर हे पुढची पाच वर्षे तुम्हाला पुन्हा फसवतील... म्हणून यंदा मात्र आपण महिलांच्या सुरक्षेसाठी ठाम उभं राहूयात, त्यासाठीच #आता_राजठाकरेच_पाहिजे#VoteForMNS
जय हिंद!
जय महाराष्ट्र
#WomenEmpowerment
सदा सरवणकर सरकारच्या पैशांनी स्वतः चा प्रचार करतांना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? असे किती घोटा���े तुम्ही केले आहेत? तुमचा खरा चेहरा आता जगासमोर येत आहे!
#sadasarvankar #dadarmahim #bmc #MNS
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माहीम विधानसभेचे अधिकृत उमेदवार श्री. अमित राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी सौं.मिताली अमित ठाकरे यांनी "क्रॉस फायर विथ अमित अँड मिताली ठाकरे" या लोकशाही मराठीच्या मुलाखतीत मांडलेले रोखठोक विचार.
🏵️ मी सध्या प्रचारात इतका मग्न आहे की, मी कोणत्या इंटरव्यूमध्ये काय म्हणालो, माझ्या भाषणाच्या वेळी मी काय म्हणालो? हे मला अजिबात आठवत नाही. याचं कारण म्हणजे मी भारावून गेल्याप्रमाणे प्रचार करतो आहे, याचाच अर्थ मला आत्ताच्या क्षणामध्ये जगायला आवडतं.
🏵️ मिताली ठाकरे म्हणाल्या की, निवडणुकीच्या यादीत नाव जाहीर झाल्यावर, मी सहजतेने कोणाशी न बोलता, स्वतःच ठरवलं की मी प्रचारात जाणार, अगदी आमचं वैयक्तिक पण या विषयावर बोलणं झालं नव्हतं.
🏵️ यादीत नाव जाहीर झाल्याचं पत्रकारांकडून समजल्यावर पोटात गोळा आला, कारण आता आयुष्य पूर्णपणे बदलणार होतं, आता जो काही वेळ असेल तो लोकांसाठीच घालवायला हवा आणि त्यासाठी मी तयार आहे.
🏵️ मिताली ठाकरे म्हणाल्या, आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करत असताना खूप वेगळं आणि चां��लं वाटतं आहे. प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा अनुभव येत होता. लोकं घरी बोलवायचे, औक्षण करायचे, गप्पा मारायचे. या सर्वात मी महिलांना लगेच कनेक्ट व्हायचे त्यांना माझ्याशी बोलायला छान वाटायचं, त्यांच्या अडचणी त्या मला सांगायच्या. उदाहरणार्थ महिलांसाठी स्वच्छ प्रसाधन गृह उपलब्ध नाहीत, ही अडचण मला स्वतःला पण जाणवली.
🏵️ आमच्या हातात सत्ता आल्यावर, आम्हाला शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. असे असले तरीसुद्धा प्रखर इच्छाशक्ती असेल तर हे सहज, लवकर शक्य होईल.
🏵️ लोकांची लोकप्रतिनिधींकडून एवढीच निव्वळ अपेक्षा आहे की, आम्हाला पुढची स्वप्न दाखवण्या अगोदर आमच्या मूलभूत गरजा पूर्ण करा.
🏵️ २०२४ मध्ये आपण अजूनही पाण्याची, विजेची, खड्डे मुक्त रस्त्यांची स्वप्न बघत आहोत. या मूलभूत गरजांची पूर्तता यापूर्व���च व्हायला हवी होती.
🏵️ मला महाराष्ट्राच्या प्रगतीबद्दल बोलणारे कोणीच उमेदवार अजून तरी आढळले नाहीत, जे दिसतात ते फक्त गद्दार, खोके एवढचं म्हणत आहेत आणि तेच सगळीकडून ऐकायला येत आहे.
🏵️ आम्ही महिलांच्या हाताला काम देऊ, तरुणांना काम मिळणार, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी निश्चित काहीतरी चांगलं करणार, आम्हाला ठाऊक आहे की कसं करायचं? आणि हे आम्ही करू शकतो. आम्ही कोणत्याही गोष्टींची फु���ट सवय नाही लावणार, याबाबतीत मार्गारेट थॅचर म्हणतात की, तुम्हाला जर काही फुकट मिळत असेल, तर समजून जा की, ते कोणाच्यातरी खिशातून आलं आहे. लाडकी बहीण योजनेसाठी जे पैसे वाटले जात आहेत, ते नेत्यांचे नसून लोकांचे आहेत आणि ते कधीपर्यंत वाटले जाणार? हे लोकांनी त्यांना विचारायला हवं. यासाठी सरकारने काही प्लॅन केला आहे का? की उद्याचं उद्या बघू असं करणार आहेत. आपल्या राज्यातल्या सर्व महिला सक्षम आहे���, त्यांना फुकटचे पैसे देण्याऐवजी काम करायला निश्चित आवडेल.
🏵️ मिताली ठाकरे म्हणाल्या की, प्रचार करत असताना मला असं जाणवत आहे की, महिलांच्या खूप अडचणी आहेत आणि त्यावर लवकरात लवकर मार्ग निघायला हवा.
🏵️ कोरोना काळात मुख्यमंत्र्यांची दारं सर्व जनतेसाठी बंद होती, सर्व जग जिथे थांबलं होतं, तिथे तुम्ही हॉस्पिटल मधल्या बेडचे, तिथल्या पंख्यांचे स्कॅम म्हणजे घोटाळे करत होतात. मी कोरोना काळात जी कामं केली आहेत त्याची सर्व यादी माझ्याकडे आहे. पीपीइ किट, ऑक्सीजन, मास्क, डॉक्टरांचे प्रश्न, आशा वर्कर्सचा प्रश्न इत्यादी अनेक प्रश्न आम्ही कोरोना काळात सत्तेत नसताना सोडवले आहेत. कोरोना काळात आम्ही काय केलं त्याचं आम्ही उत्तर देऊ आणि तुम्ही काय केलं? जर खरच केलं असेल तर त्याचे उत्तर तुम्ही द्या.
🏵️ मिताली ठाकरे म्हणाल्या की, आम्ही कोणी केलेल्या टीकाटिप्पणी वरती जास्त लक्ष देत नाही, कारण आमच्या परिवाराचं मुख्य ��्येय हे लोकांना मदत करणं आहे.
🏵️ आमच्या पक्षाला जर कोणासोबत जायची वेळ आली तर, आम्ही भाजपसोबतच जाऊ. या निवडणुकीचा काय निकाल लागेल हे क��णीच सांगू शकत नाही.
🏵️ राजकारणातली माझी आवडती व्यक्ती म्हणजे राज साहेब ठाकरे, हे मी त्यांचा मुलगा म्हणून बोलत नाही. मी त्यांचं काम जवळून पाहिलेलं आहे. नाशिक महानगरपालिकेत आमची सत्ता २०१२ ते २०१७ पर्यंत होती. पूर्ण महाराष्ट्रात एकमेव नाशिक महानगरपालिका होती, जिच्यावर या काळात एकही भ्रष्टाचाराचा आरोप लागलेला नाही.
🏵️ मला लोकांना भेटून त्यांच्या अडचणी समजून घ्यायला आवडतात. प्रामाणि��पणाला मी दैवत मानतो. जे महाराष्ट्र सैनिक मागील दहा वर्षात पक्षाची पडझड होत असून सुद्धा टिकून राहिले, त्यांचा मी आदर करतो. कोणत्याही ठिकाणी सभा होणार असेल, ती सभा असते काही तासांची, पण त्याच्या मागचं व्यवस्थापन, त्याच्या मागची मेहनत, ते कौशल्य आपल्या महाराष्ट्र सैनिकांचं असतं, सभेच्या अगोदर राजसाहेब सुद्धा ते जाऊन पाहायचे, त्यांची विचारपूस करायचे, तसंच मी पण करण्याचा प्रयत्न करतो, म्हणज���च मला पक्षासाठी पुढाकार घ्यायला निश्चित आवडेल.
🏵️ एका ठाकरेंना तुम्ही संधी दिली, त्याचं ��्यांनी काय केलं? हे सर्वांना माहित आहे, आता दुसऱ्या ठाकरेंना संधी देऊन बघा असं मी लोकांना आवाहन करतो.
🏵️ मिताली ठाकरे म्हणाल्या की, आजकाल आमचं जेवणाचं वेळापत्रक पूर्ण कोलमडून गेलं आहे, मोकळ्या वेळेत आम्ही, आज ज्या अडचणी लोकांच्या ऐकल्या त्या लवकर कशा सोडवू शकतो, यावर आमची चर्चा सुरू असते. उदाहरणार्थ प्रचारादरम्यान आम्हाला कोळीवाड्यात लाईट नसल्याचं निदर्शनास आलं, त्यावर जोर दिला असता आज तिथे लाईट लागले आहेत.
🏵️ मी स्क्रिप्ट वाचून कोणतंही काम किंवा अभिनय करू शकत नाही, म्हणून अभिनय न करता राजकारणात आलो, इथे आल्यावर समजलं की, इथे नेते कमी अभिनेते जास्त आहेत.
🏵️ निवडणुकीचा निकाल लोकंच ठरवतील, मी जिंकेन किंवा हरेन याचं प्रेशर कधीच घेत नाही, मी काम करतच राहणार. लोकांनी कधीच पाहिलं नसेल असं माहीम आणि दादर मला लोकांना बनवून दाखवायचं आहे, या प्रामाणिक हेतूने मी निवडणुकीच्या ���णांगणात उतरलो आहे.
🏵️ मी निवडणुकीत उभा राहिलो असल्याने आम्ही दोघे एकत्र दिसत आहोत, अन्यथा आ��्ही दोघे आपापल्या कामात व्यस्त असतो, मी घरी गेल्यावर कधीच राजकारण डिस्कस करत नाही. ही पहिलीच वेळ असेल की, आम्ही एकत्र दिसत आहोत.
🏵️ मिताली ठाकरे म्हणाल्या की, आम्हाला एकमेकांची सोबत आवडते, अगदी प्रचारादरम्यान सुद्धा एका इमारतीमधून दुसऱ्या इमारतीत जात असताना, आम्ही वेगवेगळ्या गप्पा मारत असतो.
#MNVSAdhikrut
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि माहीम विधानसभेचे उमेदवार श्री.अमित राज ठाकरे यांनी "गरम चर्चा" या मुलाखतीत माहीम-दादर परिसराची दुरावस्था आणि त्याला सुधारण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी जुन्या माहीम-दादरचे वैभव परत आणण्याचे वचन द��त लोकांना नवीन चेहऱ्याला संधी देण्याचे आवाहन केले. समुद्र किनारे स्वच्छता, रोजगार निर्मिती, 24x7 मदत केंद्रांची स्थापना आणि जनतेच्या विश्वासार्हतेसाठी वचनबद्ध असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
#RajThackeray
#AmitThackeray
#Mahim #dadar #Prabhadevi
#maharashtra
दादर-माहीमच्या उज्वल विकासाचं वचन पूर्ण करण्यासाठी तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी क्रमांक १ च्या 'रेल्वे इंजिन' चिन्हापुढील बटण दाबून तुमचं अमूल्य मत नोंदवा आणि श्री. अमित राज ठाकरे यांना सर्वाधिक ��ताधिक्यांनी निवडून देऊया, चला नवनिर्माण घडवूया!
#ElectionDay
ऑल इंडिया मेडिकल वर्कर्स एसोसिएशन तर्फे अमितजी राजसाहेब ठाकरे यांना जाहिर पाठिंबा.
गेल्या 14 वर्षात प्रथमच ऑल इंडिया मेडिकल वर्कर्स एसोसिएशन राजकीय संघटनेला पाठिंबा देत आहोत याचे मुख्य कारण म्हणजे ज्या घराने मराठी भाषाचा डंका विश्वात वाजवला, मराठी भाषाला अभिजात दर्जा देण्यास केंद्र सरकारला भाग पाडले, महाराष्ट्रची संस्कृती जपली.. फक्त आणि फक्त हिंदू हितावर ठाम राहिले ऐसे महाराष्ट्रतील एकमेव उमेदवार मा.श्री. अमितजी राजसाहेब ठाकरे यांना तमाम मेडिकल वर्कर्स (अ,ब,क आणि ड) श्रेणी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य मतदान करणार आहोत, त्याचे अधिकृत पत्र देतांना
अध्यक्ष हर्षवर्धन साईवाला आणि मेडीकल वर्कर्स एसोसिएशनचे शिष्ट मंडळ उपस्थित होते...
#RajThackeray #MNSAdhikrut
#AmitThackeray #DevelopedMahim
#harshwardhansaiwala #allindiamedicalworkersassociation
राजन शिरोडकर यांच्या निधनाने आज महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरपले. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, भावपूर्ण श्रद्धांजली!
#rajanshirodkar#rip#भावपूर्ण_श्रद्धांजली#MNS
ऑल इंडिया मेडिकल वर्कर्स एसोसिएशन तर्फे अमितजी राजसाहेब ठाकरे यांना जाहिर पाठिंबा.
गेल्या 14 वर्षात प्रथमच ऑल इंडिया मेडिकल वर्कर्स एसोसिएशन राजकीय संघटनेला पाठिंबा देत आहोत याचे मुख्य कारण म्हणजे ज्या घराने मराठी भाषाचा डंका विश्वात वाजवला, मराठी भाषाला अभिजात दर्जा देण्यास केंद्र सरकारला भाग पाडले, महाराष्ट्रची संस्कृती जपली.. फक्त आणि फक्त हिंदू हितावर ठाम राहिले ऐसे महाराष्ट्रतील एकमेव उमेदवार मा.श्री. अमितजी राजसाहेब ठाकरे यांना तमाम मेडिकल वर्कर्स (अ,ब,क आणि ड) श्रेणी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य मतदान करणार आहोत, त्याचे अधिकृत पत्र देतांना
अध्यक्ष हर्षवर्धन साईवाला आणि मेडीकल वर्कर्स एसोसिएशनचे शिष्ट मंडळ उपस्थित होते...
#RajThackeray #MNSAdhikrut
#AmitThackeray #DevelopedMahim
#harshwardhansaiwala #allindiamedicalworkersassociation
भारताचे पहिले पंतप्रधान पंड��त जवाहरलाल नेहरू यांची जयंती, म्हणजेच बालदिन! त्यांच्या विचारांनी आणि कार्याने देशातील प्रत्येक बालकाला मोठी स्वप्न��� पाहण्याची प्रेरणा दिली. बालदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸
#happychildrensday #NehruJayanti #MNS