हाता, पायाला आलेल्या सुजेवर पहिल्यांदा घरात असलेला बाम लावला जातो…आधी तो गरजेचा.
लगेच कोणी केंद्रस्थानी असलेल्या Hospital मध्ये धाव नाही घेत आणि गेलात तरी कोणी entertain करणार नाही. समस्या ज्या पातळीवरची असेल त्याच पातळीवर निराकरण, त्याच पातळीवर उपाय हवा. #बाकीविषयसुजेचानाहीचेय
घरी येताना मैदानात लहान मुलं ( ५ ते १० वयोगट ) खेळत होती,
Colour colour which Colour…
एक जण ओरडला ‘जुलाब कलर’ ;
कानात चर्ररर्र झालं.
पुन्हा ऐकलं… ‘जुलाब कलर’ अगदी स्पष्ट आवाज.
आणि कहर म्हणजे बाकी मुलं तसा रंग शोधत होती.
काळ सरून पिढ्या सोकावतात त्या कदाचित अशाच…
#जनरेशन_गॅप
शाळेत इतिहास आभ्यासताना ‘गांधी आडवा येतो’ असा वाक्प्रयोग प्रचलित होता.
आज seamless त्याचा प्रत्यय आला.
गंभीरतेने घ्या वा मिमबुद्धीने…
बाकी सीमोल्लंघन कोण, कुठे, कसं करतंय वा करणारेय हे ज्याचं त्याला ठाऊक आहे वा असतं असं किमान गृहीत धरून चालतो.
#शुभदसरा#गांधीजयंतीच्याशुभेच्छा
मित्र १ - कुठेय ?
मित्र - घरी..कल्याण
मित्र १ -गरब्याचा प्लान आहे, येतो का ?
मित्र- नाही रे, ७ः३० ८ झालेत, दादर पोहचेपर्यंत ९ः३० १० वाजणार, तसाही दमलोय.
मित्र १ - बरं, गरब्यानंतर बसायचासुद्धा विचार होता तसा पोरांचा.
मित्र- अर्ध्या तासात आवरून निघतो, पोहचतो.
#मुद्देसुदथोडकं
हल्ली इथून तिथे, तिथून इथे Self transfer करत आहे तो Account Balance ‘BALANCE’ करण्याची नवीन सवय लागलीये.
एक वेगळंच समाधान… एक वेगळीच नशा.
#काढघाल#उलाढाल#SelfSatisfaction
बोलायला नको, पण दोन अगदी सर्वांगाने अष्टकोनात सुटलेल्या बायका corporate च्या smoking zone मध्ये त्यांच्या पाळीव कुत्र्याच्या calorie count बद्दल गहन चर्चा करत होत्या.
चर्चेचा विषय नाही तर चर्चा करणाऱ्यांची देहबोली आणि दरम्यानची परिस्थिती गंभीर होती.
#OHHMYDOG#OBSERVATION
सकाळी सकाळी एका काकूंना अगरबत्तीमध्ये Strawberry आणि Pineapple Flavour हवा होता.
अगरबत्तीवाल्यासोबतचं त्यांचं conversation सहज जाता जाता कानावर पडलं.
ऐकायला तसं पचलं नाही पण सुगंध दरवळला कानात असो प्रत्येकाच्या आवडीनिवडी.
रात्रीच्या कुबटपणावर सुगंधित उपाय असावा.
#’केवडा’खटाटोप