❤️🙏 चिमुकल्या यशश्रीच्या उपचारांसाठी मदतीचा हात पुढे करूया!
‘उडान फेस्ट – स्वप्नांना देऊया भरारी’ या महोत्सवात सहभागी झालेल्या चिमुकल्या यशश्रीला Spinal Muscular Atrophy (SMA) या दुर्मिळ आजाराशी लढण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे.
यशश्रीच्या उपचारांसाठी तब्बल ₹११ कोटींची मदत आवश्यक आहे. तिच्या उपचारांचा हा मोठा खर्च लक्षात घेता, मी अंबरनाथमधील सर्व नागरिकांना मनापासून आवाहन करते की, आपल्याला जेवढी शक्य असेल तेवढी आर्थिक मदत या चिमुकल्या बाळासाठी नक्की करा. तुमची छोटीशी मदतही तिच्या उपचारांसाठी मोलाची ठरू शकते. ❤️
🙏 चला, माणुसकीच्या नात्याने एकत्र येऊया, यशश्रीच्या कुटुंबाला आधार देऊया आणि तिच्या उपचारांसाठी शक्य तेवढे योगदान देऊया.
📲 मदतीसाठी पोस्टमधील QR कोड स्कॅन करा. ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
यशश्रीच्या लढ्यात आपणही सहभागी होऊया! 💗
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद
#HelpYashashree #SupportYashashree #UdaanFest #Ambernath
#catejashreevkaranjule
🪔🌸 उडान फेस्ट – महिला उद्योजिकांच्या स्वप्नांना भरारी! ✨
‘उडान फेस्ट – स्वप्नांना देऊया भरारी’ या दिवाळी महोत्सवाला भेट देऊन महिला उद्योजिकांशी संवाद साधला. त्यांच्या उत्पादनांची पाहणी करत त्यांच्या मेहनतीचे, कलाकौशल्याचे आणि उद्योजकतेचे कौतुक केले. 💐🛍️
यावेळी नगरसेविका सौ. अनिता भोईर, माजी नगरसेवक तथा पत्रकार श्री. पंकज पाटील, नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. स्वाती आतिश पाटील, नगरसेविका सौ. पूनम पाटील आणि नगरसेविका सौ. मीना वाळेकर यांच्यासह इतर मान्यवर व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देणारा हा महोत्सव म्हणजे त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे व्यासपीठ आहे. या उपक्रमात सहभागी होऊन महिलांचा उत्साह वाढवताना आनंद झाला! ❤️
📍 स्थळ: स्वानंद मॅरेज हॉल, अंबरनाथ पूर्व
📅 दिनांक: २४ व २५ ऑक्टोबर २०२६
चला, महिला उद्योजिकांना साथ देऊया आणि त्यांच्या स्वप्नांना नवी भरारी देऊया! 🌸
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷
#UdaanFest2026 #catejashreekaranjule #WomenEmpowerment #DiwaliMahotsav #Ambernath
🌸 सनशाइन एक्झिबिशन - महिला उद्योजकांना प्रोत्साहन! 🛍️
काल अंबरनाथ पूर्व येथील विश्वकर्मा भवन (गुजराती हॉल) येथे आयोजित Sunshine Exhibition चे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले.
महिला उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आणि त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. या सुंदर आयोजनासाठी दक्षा परमार आणि भावना सपारिया यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा! 💐
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷
#SunshineExhibition #WomenEntrepreneurs #SupportWomen #catejashreevkaranjule #Ambernath
🌸🎗️ पिंकाथॉन – मॅरेथॉन आणि कर्करोग जनजागृती उपक्रम! 🏃♀️💗
आज अंबरनाथमध्ये आयोजित पिंकाथॉन उपक्रमात सहभागी होऊन महिलांचे आरोग्य, फिटनेस आणि कर्करोगाविषयी जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
यावेळी पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. डॉ. स्वप्ना चौधरी यांनी उपक्रमाची माहिती दिली, तर डॉ. रेवती जठार यांनी गर्भाशयमुखाचा आणि स्तनाच्या कर्करोगाविषयी मार्गदर्शन केले.
या उपक्रमासाठी निमंत्रित केल्याबद्दल अंबरनाथ पिंकाथॉनच्या ब्रँड अँबेसिडर धृती चौधरी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार! महिलांच्या आरोग्यासाठी आणि जनजागृतीसाठी त्यांनी केलेले आयोजन कौतुकास्पद आहे.
यावेळी नगरसेवक श्री. कुणाल भोईर आणि नगरसेविका सौ. अपर्णा भोईर यांचीही साथ लाभली.
महिलांचे आरोग्य हीच खरी ताकद—जनजागृतीच्या या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा!
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷
#Pinkathon #WomenRun #CancerAwareness #catejashreekaranjule #ambarnath
🌕🥛 कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
चंद्राचा शीतल प्रकाश, दुधाची गोडी आणि नात्यांमधील प्रेमाचा गोडवा घेऊन येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! ही पौर्णिमा आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, हीच सदिच्छा. 🙏✨
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷
#KojagiriPournima #SharadPurnima #HappyKojagiri #Ambernath #catejashreevkranjulepatil
🪔🌸 उडान फेस्ट – स्वप्नांना देऊया भरारी! ✨
महिला उद्योजिकांच्या स्वप्नांना नवी दिशा आणि त्यांच्या कर्तृत्वाला हक्काचं व्यासपीठ देणाऱ्या उडान फेस्ट – दिवाळी महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ! 💐
मा. नगराध्यक्ष श्री. गुलाबराव करंजुले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, शिवसेना उपशहरप्रमुख श्री. पुरुषोत्तम उगले यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध स्टॉल्सना भेट देत महिला उद्योजिकांच्या कलागुणांचे आणि उत्पादनांचे कौतुक केले. 🛍️✨
🛒 दिवाळीची खरेदी, आकर्षक स्टॉल्स आणि महिला उद्योजिकांच्या स्वप्नांना प्रोत्साहन… असा हा उत्साहाने भरलेला महोत्सव!
📍 स्वानंद मॅरेज हॉल, अंबरनाथ पूर्व
📅 २४ व २५ ऑक्टोबर २०२६
⏰ सकाळी ११ ते रात्री १०
चला, या दिवाळीत महिला उद्योजिकांना साथ देऊया आणि त्यांच्या स्वप्नांना भरारी देऊया! 💖🪔
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷
#UdaanFest2026 #DiwaliMahotsav #WomenEntrepreneurs #Ambernath #catejashreevkaranjule
🪔🌸 ‘उडान फेस्ट – स्वप्नांना देऊया भरारी’चा उत्साहात शुभारंभ!
स्वानंद मॅरेज हॉल, अंबरनाथ पूर्व येथे आयोजित उडान फेस्ट – दिवाळी महोत्सवाचे मा. नगराध्यक्ष श्री. गुलाबराव करंजुले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उपशहरप्रमुख श्री. पुरुषोत्तम उगले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सौ. सुनीता गुलाबराव करंजुले पाटील, व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री. खानजी धल, महिला मोर्चा अध्यक्ष सौ. पौर्णिमा जाधव आणि सौ चंदा गान यांच्यासह अनेक मान्यवरांनी महोत्सवाला भेट देऊन उत्साहात सहभाग घेतला.
महिलांच्या कला, कौशल्य आणि उद्योजकतेला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या महोत्सवातील विविध स्टॉल्सचा आनंद घेत दिवाळीच्या खरेदीसाठी नवनवीन वस्तू आणि आकर्षक पर्यायांची पाहणी करण्यात आली. 🛍️✨
चला, महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देऊया आणि त्यांच्या स्वप्नांना भरारी देऊया! 💐
📍 स्वानंद मॅरेज हॉल, अंबरनाथ पूर्व
📅 २४ व २५ ऑक्टोबर २०२६
⏰ सकाळी ११ ते रात्री १०
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷
#UdaanFest2026 #DiwaliMahotsav #WomenEntrepreneurs #Ambernath
#catejashreevkaranjule
🙏🌸 श्री सत्यनारायण महापूजेला सदिच्छा भेट!
काल अंबरनाथ पश्चिम येथे श्री सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने श्री. शंकर नामदेव मोटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन दर्शन घेतले आणि श्री सत्यनारायणाचे आशीर्वाद घेतले. यावेळी कुटुंबीयांशी संवाद साधत सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 🌺
याप्रसंगी नगरसेविका सौ. मीना वाळेकर यांच्यासोबत उपस्थित राहून भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला.
श्री सत्यनारायणाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो, हीच प्रार्थना! 🙏
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷
#SatyanarayanPuja #Ambernath #Blessings #tejashrikaranjulepatil
🪔🌸 दिवाळी महोत्सवाला सदिच्छा भेट!
कानसई गाव, अंबरनाथ पूर्व येथे नगरसेविका सौ. ज्योत्स्ना चंद्रकांत भोईर यांच्या वतीने आयोजित दिवाळी महोत्सवाला भेट देऊन विविध स्टॉल्सची पाहणी केली. महिला उद्योजिका आणि स्थानिक व्यावसायिकांच्या मेहनतीला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम आनंददायी आहे. ✨
यावेळी नगरसेविका सौ. ज्योत्स्ना चंद्रकांत भोईर, समाजसेवक श्री. चंद्रकांत भोईर आणि महिला पदाधिकारी यांच्यासोबत महोत्सवाचा आनंद अनुभवला.
महिला उद्योजिकांना प्रोत्साहन आणि त्यांच्या व्यवसायाला नवी दिशा मिळो, हीच सदिच्छा! 💐
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷
#diwalimahotsav #womenentrepreneurs #ambernath #catejashreevkaranjule #localbusiness
🌱🌳 पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतादूत सन्मान सोहळा २०२६! 💚🙏
आज अंबरनाथ पूर्व येथील अम्मा हॉलमध्ये ब्राइटनेस फाउंडेशन - उत्कर्ष सामाजिक महिला सेवा संस्था यांच्या वतीने आयोजित पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतादूत सन्मान सोहळ्यात सहभागी झाले.
पर्यावरण रक्षणासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान, कचरा गोळा करून त्याचे रिसायकलिंग करणाऱ्यांचा गौरव, पर्यावरणप्रेमी महिलांचा सन्मान तसेच वृक्षप्रेमींचा सत्कार, वृक्षवाटप आणि कापडी पिशव्यांचे वाटप अशा विविध उपक्रमांद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. 🌿
याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मयुरेश भुजबळ, नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. स्वाती अतिश पाटील आणि उपसभापती तथा नगरसेविका सौ. किरण चौबे व माझे स्वीय सहाय्यक डॉ.आशिष पावसकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरणाचे रक्षण ही केवळ जबाबदारी नसून, येणाऱ्या पिढ्यांसाठी केलेली गुंतवणूक आहे. चला, स्वच्छ आणि हरित अंबरनाथ घडवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करूया! 🌳💚
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷
#environmentconservation #SwachhataDoot #CleanAmbernath #GreenAmbernath #catejashreevkaranjule
🚆🇮🇳 अंबरनाथ रेल्वे स्थानकावर ‘रेल जनसंवाद’ उपक्रमात सहभाग!
आज अंबरनाथ रेल्वे स्थानक येथे आयोजित ‘रेल जनसंवाद’ उपक्रमांतर्गत रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी प्रवाशांना येणाऱ्या अडचणी, रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली.
प्रवाशांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि नागरिक यांच्यात संवाद असणे महत्त्वाचे आहे. देशभरातील ७,००० हून अधिक रेल्वे स्थानकांवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून प्रवाशांच्या अडचणी समजून घेण्याचा आणि रेल्वे सेवा अधिक चांगली करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 🚉
याप्रसंगी नगरसेवक श्री. निखिल चौधरी, नगरसेवक तथा अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष श्री. विश्वजीत करंजुले पाटील यांच्यासह रेल्वे अधिकारी, कर्मचारी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रवाशांच्या समस्या समजून घेऊन रेल्वे सेवा अधिक सुरक्षित, सुरळीत आणि सोयीस्कर व्हावी, यासाठी अशा संवादातून निश्चितच मदत मिळते. 🙏
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷
#railjansamvad #Ambernath #IndianRailways #railyatri #TejashriKaranjulePatil
🌺🙏 आदरणीय केंद्रीय गृहमंत्री तथा केंद्रीय सहकार मंत्री श्री. अमितजी शाह यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐
देशाच्या विकासासाठी आणि राष्ट्रहितासाठी कार्यरत असलेले, देशांतर्गत सुरक्षेला बळकटी देणारे मा. श्री. अमितजी शाह यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
त्यांचे कणखर नेतृत्व, संघटनकौशल्य आणि राष्ट्रसेवेप्रती असलेली निष्ठा देशाच्या प्रगतीसाठी सदैव प्रेरणादायी ठरो.त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि देशसेवेसाठी निरंतर ऊर्जा लाभो, हीच सदिच्छा. 🇮🇳🌸
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷
#AmitShah #BirthdayWishes #ambarnath #catejashreevkaranjule
🎂🌸 वाढदिवसानिमित्त मिळालेलं प्रेम आणि आशीर्वाद! ❤️🙏
माझ्या वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा देणाऱ्या आणि भरभरून आशीर्वाद देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार! आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे, आपुलकीमुळे आणि सदिच्छांमुळे हा दिवस माझ्यासाठी अधिक खास आणि अविस्मरणीय ठरला. 💐❤️
याप्रसंगी कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रुचिता घोरपडे, नियोजन व विकास समिती सभापती तथा नगरसेवक श्री. महेश फुलोरे,मागासवर्गीय समिती सभापती तथा नगरसेवक श्री. कबीर गायकवाड,नगरसेवक श्री. विपुल प्रदीप पाटील, श्री. उमेश पाटील, श्री. किरण राठोड, नगरसेवक श्री. दिनेश गायकवाड, नगरसेविका सौ. पल्लवी लकडे, आणि नगरसेविका सौ. संगीता किसन गायकर यांनी भेटून शुभेच्छा दिल्या.
आपल्या सर्वांचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे. मनःपूर्वक धन्यवाद! 🙏🌺
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷
#वाढदिवस #मनःपूर्वकआभार #आपलेप्रेमआपलेआशीर्वाद #अंबरनाथ #तेजश्रीकरंजुलेपाटील
🌸✨ ‘उडान फेस्ट २०२६ दिवाळी स्पेशल’ च्या तयारीसाठी स्टॉलधारकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक!
अंबरनाथमध्ये २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी स्वानंद मॅरेज हॉल येथे आयोजित करण्यात येणाऱ्या उडान फेस्ट २०२६ च्या नियोजनाच्या अनुषंगाने उडान च्या टीम ने स्टॉलधारकांसोबत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
महिला उद्योजिकांना आपल्या व्यवसायाला नवी ओळख मिळावी, त्यांच्या कलागुणांना आणि उत्पादनांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या स्वावलंबनाला प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. फेस्टच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांच्या सूचना जाणून घेत पुढील नियोजन करण्यात आले. 💐🤝
महिलांच्या स्वप्नांना नवी दिशा आणि त्यांच्या कर्तृत्वाला नवी ओळख देण्यासाठी आपण सर्वजण सज्ज होऊया! ❤️
📍 स्थळ: स्वानंद मॅरेज हॉल, अंबरनाथ पूर्व
📅 दिनांक: २४ व २५ ऑक्टोबर २०२६
शनिवार आणि रविवार
सकाळी ११ ते रात्री ९
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷
#Udaanfest #diwaliexibition #womenentrepreneur #ambarnath #catejashreevkaranjule
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार 🌸🙏🏻
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या भरभरून शुभेच्छा, प्रेम आणि आशीर्वादांनी मी मनापासून भारावून गेले. आपण प्रत्येकाने दाखवलेली आपुलकी आणि दिलेले प्रेम माझ्यासाठी अनमोल आहे. हा दिवस इतका खास आणि आनंददायी केल्याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून ऋणी आहे. ❤️💐
आपले प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे. हे प्रेम असेच कायम राहो आणि आपल्या सेवेसाठी अधिक जोमाने कार्य करण्याची ऊर्जा मला मिळो, हीच सदिच्छा! 🙏
आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! 🌺
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷
#catejashreevkaranjule #birthday #thankyouall #ambarnath #bjp4ambarnath
🍹जयवर्धन ज्यूस बारच्या भव्य शुभारंभाला सदिच्छा भेट! 💐
काल अंबरनाथ पूर्व येथील राधे गोविंद प्लाझा, पटेल आर मार्ट येथे सुरू झालेल्या जयवर्धन ज्यूस बारच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित राहून संचालकांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. नवीन व्यवसायाच्या माध्यमातून प्रगतीच्या अनेक संधी निर्माण होवोत आणि भरभराट लाभो, हीच सदिच्छा! 💐✨
याप्रसंगी अंबरनाथ नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सदा मामा पाटील, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. रुपाली लट्ठे, तसेच शुभारंभाचे आयोजक श्री. आकाश सुनील वाळके आणि श्री. योगेश गणपत मोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
नव्या व्यवसायाची सुरुवात यशस्वी होवो आणि उत्तरोत्तर भरभराट होवो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🙏
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷
#जयवर्धनज्यूसबार #opening #ambernath #catejashreevkaranjule #TejashriKaranjulePatil
🎂🌸 स्वानंद मॅरेज हॉल येथे वाढदिवस उत्साहात साजरा! ❤️🙏
स्वानंद मॅरेज हॉल येथे माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व पदाधिकारी आणि सहकाऱ्यांनी एकत्र येत आनंदात वाढदिवस साजरा केला. सर्वांनी दिलेलं प्रेम, आपुलकी आणि शुभेच्छा माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत. सर्वांचे मनःपूर्वक आभार! 💐❤️
याप्रसंगी आमदार, अंबरनाथ विधानसभा डॉ. बालाजी किणीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शब्बीर सय्यद, नगरसेवक तथा अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष श्री. विश्वजीत करंजुले पाटील, गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री. अभिजीत करंजुले पाटील, शक्तिकेंद्र प्रमुख सौ. दीपाली गुंजाळ, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. रुपाली लट्ठे, अंबरनाथ व्यापारी संघ अध्यक्ष खानजी धल, डॉ. अल्पना गुलाबराव करंजुले पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व सहकाऱ्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शुभाशीर्वाद दिले
आपणा सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझ्यासाठी वाढदिवसाची अनमोल भेट! 🙏🌺
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷
#Birthdaycelebration #swarnandmarriagehall #Ambernath #catejashreevkaranjule
#bjp4ambarnath
🌺🙏 वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात! 🌾
काल डोंबिवली येथे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वतीने आयोजित नमो रमो नवरात्र उत्सवात उपस्थित राहिले.
याप्रसंगी राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी ₹५ लाख ५५हजार ५५५ रुपयांचा धनादेश मा. श्री. रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे माजी शहराध्यक्ष श्री. गुलाबराव करंजुले पाटील, श्री. विश्वजीत करंजुले पाटील, CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील आणि श्री. अभिजीत करंजुले पाटील यांच्या वतीने सुपूर्द करण्यात आला. दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना आधार मिळावा आणि त्यांच्या कठीण काळात मदतीचा हात देता यावा, हीच यामागची भावना आहे. 🙏🌱
यावेळी माजी नगराध्यक्ष श्री गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक तथा अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष श्री. विश्वजीत करंजुले पाटील, गटनेते तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक श्री अभिजीत करंजुले पाटील, नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य श्री. पवन वाळेकर, नियोजन व विकास समिती सभापती तथा नगरसेवक श्री. महेश फुलोरे आणि नगरसेविका सौ. सुजाता भोईर यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.
शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी हातभार लावता आला, याचे मनापासून समाधान वाटते! ❤️🌾
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷
#namoramo #ravindrachavhan #farmershelp #dombiwli #catejashreevkaranjule
🎉📚 डिस्कव्हरकिड्झ ॲक्टिव्हिटी स्कूलच्या नवीन शाखेचे उत्साहात उद्घाटन! ✨
काल अंबरनाथ पूर्व येथील वडवली परिसरात डिस्कव्हरकिड्झ ॲक्टिव्हिटी स्कूलच्या नवीन शाखेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून या नव्या शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ करण्याचा आनंद मिळाला. 🌸
या नवीन शाखेच्या माध्यमातून अंबरनाथमधील चिमुकल्यांना शिक्षणाची आणि व्यक्तिमत्त्व विकासाची एक नवी संधी उपलब्ध होणार आहे, याचा विशेष आनंद वाटतो.
यावेळी माझ्यासोबत नगरसेविका सौ. अपर्णा भोईर, डिस्कव्हरकिड्झच्या संचालिका सौ. कल्पना मॅडम, विभागीय व्यवस्थापक व समन्वयक सौ. प्रिया शिंदे तसेच या उपक्रमाशी संलग्न असलेल्या BALA'S कॉमर्स क्लासेसचे बाळा सर यांनीही या आनंदाच्या क्षणात सहभाग घेतला.
डिस्कव्हरकिड्झ ॲक्टिव्हिटी स्कूलच्या संपूर्ण टीमला या नव्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!✨
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷
#discoverkidz #opening #abacus #ambernath #catejashreevkaranjule
🌺🙏 विविध नवरात्रोत्सव मंडळांना सदिच्छा भेट, देवीचे दर्शन आणि चिमुकल्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन! 💃✨
नवरात्रोत्सवानिमित्त अंबरनाथमधील विविध नवरात्रोत्सव मंडळांना भेट देऊन आदिशक्ती देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंडळांमधील भक्तिमय वातावरण, उत्साह आणि आनंद अनुभवायला मिळाला. 🌺
फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विविध वेशभूषा करून सहभागी झालेल्या चिमुकल्यांचा उत्साह पाहून मन आनंदाने भरून आले. चिमुकल्यांचा उत्साह, नागरिकांची आपुलकी आणि नवरात्रीचा जल्लोष यामुळे हा अनुभव माझ्यासाठी खूपच आनंददायी ठरला. ❤️🌸
यावेळी नगरसेवक तथा अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष श्री विश्वजीत करंजुले पाटील, अंबरनाथ पश्चिम शहराध्यक्ष प्रजेश तेलंगे,नगरसेविका सौ. मिनू सिंग, मा. नगरसेवक श्री. सुरेंद्र यादव, नगरसेविका सौ. पायल सोरखडे, नगरसेविका सौ. पूनम पाटील, नगरसेवक श्री. निखिल चौधरी, नगरसेविका सौ. पल्लवी लकडे आणि नगरसेविका सौ. अमृता मोहोरीकर व इतर सर्व मान्यवरांनी माझ्यासोबत या नवरात्रोत्सवातील आनंद आणि उत्साह अनुभवला. 🙏
आई जगदंबेचा आशीर्वाद, चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि सर्वांसोबत घालवलेले हे सुंदर क्षण नेहमीच स्मरणात राहतील! 🌺✨
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷
#NavratriUtsav #Ambernath #FancyDressCompetition #DeviDarshan #TejashriKaranjulePatil