भीमा सहकारी साखर कारखाना (ता. मोहोळ, जि. सोलापूर) च्या ४४ व्या गळीत हंगामाचा मिल रोलर पूजन समारंभ कारखान्याचे चेअरमन मा. श्री. @VDMahadik यांच्या हस्ते संपन्न झाला. या समारंभास उपस्थित राहिलो.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने ‘लक्ष असूदेत’ असं सांगण्याची कुठेही गरजच पडली नाही कारण पाहताक्षणीच सर्व सभासद म्हणाले, “दादा तुम्ही निवांत राहा”, आपण महाडिक गटाचेच आहोत आणि कायम महाडिक गटासोबतच राहणार. हा विश्वास आणि ही ताकद आहे महाडिक गटाची.”
यावेळी आपल्या कार्यकर्त्यांसह गावातल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देखील भेटीगाठी घेतल्या. इंगळी आणि तळंदगे गावातील सभासदांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी चर्चा केली. या संबंध दौऱ्यात आपल्या सर्व सभासदांनी जे प्रेम दिलं ते पाहून खरच भारावून जायला झालं.
“एसीरूममध्ये बसून जनतेचे प्रश्न समजून घेणं या मताचा मी मुळीच नाही. जोपर्यंत तुम्ही आपल्या लोकांमध्ये जाऊन मिसळत नाही तोपर्यंत तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य कळत नाही याची महाडिक कुटुंबाला चांगलीच जाण आहे. हाच वारसा पुढे नेत राहणं हे मी माझं कर्तव्य समजतो.
यावेळी इचलकरंजीतील संपूर्ण पंचक्रोशीत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कायम तत्पर असणाऱ्या श्रीमंत बाबासो घोरपडे विकास सेवा सोसायटीलाही भेट दिली. यावेळी पट्टनकोडोली गावच्या बिरदेव व कल्लेश्वर मंदिरात जाण्याचा योग आला. मंदिरात नतमस्तक झाल्यानंतर एक वेगळीच प्रसन्नता अनुभवायला मिळाली.
कोल्हापुरात राजकीय धुमशान पण खासदार पुत्राची 'वेगळी वाट', महाडिक यांच्या लेकाचा कौतुकास्पद उपक्रम
https://t.co/opFi1sDXjz
@dbmahadik#VishwarajMahadik#Kolhapur
दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा
आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम,
प्रभू श्रीरामचंद्र यांना कोटी कोटी नमन !
श्री रामनवमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
// श्री राम जय राम जय जय राम //
#jayshreeram#जयश्रीराम#रामनवमी#ramnavmi🙏
महिला व बालकांच्या दृष्टीकोनातून सामाजिक उपक्रम राबवण्याची ही संधी दिली त्याबद्दल मी, भगिरथी महिला संस्थेच्या माध्यमातून महिला व बालविकास विभागमंत्री ना. श्री. मंगलप्रभात लोढा यांचे मनापासून आभार मानतो."
-विश्वराज धनंजय महाडिक.
चेअरमन- भीमा सहकारी साखर कारखाना, टाकळी, (सि)
“गावपातळीवर अंगणवाडी हा महिला व बालकांच्या विकासाचा महत्वाचा पाया समजला जातो. याच दृष्टीकोनातून आपल्या भगिरथी महिला संस्थेच्या माध्यमातून कोल्हापुर सोलापूर जिल्ह्यातील १५ अंगणवाडी दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्य शासनाशी सामंजस्य करार करून दत्तक घेण्यात आलेल्या या १५ अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिला व बालकांसोबतच अंगणवाडी सेविकांचाही विचार भगिरथी महिला संस्था करणार आहे.
भाषेवर मजबूत पकड, व्यासंगी विचार, उत्तम संघटक, कुशल राजकिय व्यक्तिमत्त्व, परखड वक्ते, अभ्यासू राजकारणी अशी ओळख असलेले पुण्याचे खासदार, भाजपचे जेष्ठ नेते मा.गिरीश बापट साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली.!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती, सद्गती देवो हीच अपेक्षा!
ॐ शांति 🙏