📍 कुडाळ, सिंधुदुर्ग.
कुडाळ नगरपंचायत व पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आलेल्या गणेश घाट बांधकाम व परिसर सुशोभीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, सभापती श्री. मिलिंद नाईक, कुडाळ नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता शिरवलकर, उपनगराध्यक्ष श्री. किरण शिंदे, मुख्याधिकारी श्री. खंडू पवळ, सौ. दीपलक्ष्मी पडते, संजय पडते, श्री. काका कुडाळकर, श्री. आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख श्री. विनायक राणे, श्री. ओंकार तेली यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📍 सिंधुदुर्ग, कुडाळ
कुडाळ तालुक्यातील घावनळे येथील उबाठा शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला, सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे शिवसेना परिवारात मनःपूर्वक स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, श्री. संजय पडते, श्री. संतोष साठविलकर, श्री. काका कुडाळकर, कुडाळ सभापती श्री. मिलिंद नाईक, श्री. आनंद शिरवलकर, श्री. दीपक नारकर, श्री. विनायक राणे, श्री. अरविंद करलकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
"माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उबाठा सोडली नाही" हा २०२६ चा सर्वात मोठा विनोद आहे. वैभव नाईक हरणारच होता म्हणून शेवटच्या क्षणाला इलेक्शन फॉर्म दिला नाही आणि त्यावर हा नीच आहे हे सगळ्यांना माहीत आहे.
ज्या काँग्रेसने याच्या कुटुंबाला सगळं दिलं त्याच काँग्रेसला सोडून हा दुसऱ्या पक्षात गेला, हा घंट्याचा निष्ठावान.
याला आता जिल्ह्यात कुत्र उभ करत नाही, हा ग्रामपंचायतीला पडेल याची अशी परिस्थिती झाली आहे, याचे दोन भाऊ माझ्यामुळे नगरसेवक झाले ते पण हा नमकहराम विसरला पण असो मी लहान लोकांच्या तोंडी लागत नाही, इथून पुढे काही बोलला तर माझे पदाधिकारी उत्तर देतील.
आणि हो रवी चव्हाण साहेबांचा खरा लाभार्थी वैभव आहे हे जग जाहीर आहे.
जय महाराष्ट्र 🚩
📍 सिंधुदुर्गनगरी | १५ ऑगस्ट २०२६.
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा मुख्यालय, ओरोस येथे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच क्रीडा, महिला व बालविकास आदी विभागातील मान्यवरांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी मंत्री तथा आमदार श्री. दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत, उपाध्यक्ष श्री. दादा साईल, माजी आमदार श्री. राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. अबीद नाईक, जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविंद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मोहन दहिकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्गातले सगळे अनधिकृत धंदे आणि त्या धंद्यांना सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधिक्षक श्री दहीकर देत असलेला पाठिंबा मला जनतेसमोर ठेवावा लागणार.
दोन दिवसांनी या विषयावर पत्रकार परिषद घेणार आहे.
उद्योजक श्री. हनुमंत इंगळे यांचे सुपुत्र चि. साईनाथ आणि चि. सौ. का. पूनम यांच्या शुभविवाह सोहळ्यानिमित्त आयोजित स्वागत समारंभ सोहळ्यास उपस्थित राहून नवदांपत्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे हे आपल्या संचालक मंडळासह शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेला सहकार क्षेत्रात सर्वोत्तम बनविण्यासाठी सातत्याने काम करत आहेत. ही बँक गेली अनेक वर्षे आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे राज्यात अव्वल राहिली आहे. राज्यस्थरावरील विविध पूरस्कार हे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेने मिळवले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, शेती पूरक संस्था, सहकारी संस्था यांच्या हिताच्या दृष्टीने जिल्हा बँक कार्यरत आहे.
आता सगळं चांगलं चालू असताना महायुतीमध्ये चांगलं वातावरण राहो यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. वैयक्तिक अजेंडा यामध्ये येता कामा नये, बसून चर्चेमधून मार्ग निघू शकतो पण टीका करायची काही गरज नाही.
कणकवलीत ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना यांचा सार्वजनिक गणेश उत्सवास भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी जिल्हाप्रमुख श्री दत्ता सामंत, श्री संदीप मेस्त्री, श्री अण्णा कोदे, श्री समीर प्रभुगावकर, श्री प्रज्वल वर्दम आदी उपस्थित होते.
मीडियाच्या माध्यमातून दिसतंय की सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी माझ्या मतदारसंघात म्हणजे कुडाळ नगरपंचायत मधल्या सहा नगरसेवकांचे निलंबन केले आहे.
आम्हाला ज्या दिवशी खासदार श्री नारायण राणे साहेब सांगतील त्या दिवशी हे निलंबन मान्य करू.
सिंधुदुर्गात भाजप चे निर्णय हे खासदार श्री राणे साहेब घेत असतात म्हणून या पत्राला आम्ही किंमत देत नाही.
नितेश राणे एखाद्या विषयावर बोल्यानंतर त्यावर तुम्ही टीका करा पण वयक्तिक टीका नको.
नितेश काही टोकाचं बोलला नाही, किव्हा वैयक्तिक बोलला नाही.
कुठल्याही धमकीला राणे परिवार कधीच घाबरत नाही, तुम्ही जसे मरायला तयार असता तसेच आम्ही राणे पण असतो.
आमच्या परिवाराच्या सदस्यावर कोण हाथ टाकायच्या वार्ता करत असेल तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही म्हणून भाषा जपून वापरली पाहिजे कारण आम्ही तुम्ही काही परके नाही.
विषय सोडवताना नातं तुटता कामा नाही याची काळजी घेतली पाहिजे.
मनोज जरांगे पाटील तुमचे आणि माझे संबंध नेहमी आपुलकीचे राहिले, कौटुंबिक राहिले ते तसेच राहिले पाहिजे. मी आज पर्यंत नातं जपलं, पुढे ही जपेन… आपल्या कडून पण तीच अपेक्षा आहे.
जय मराठा 🚩
श्री. उद्धव ठाकरे,
तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रमाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो. उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागलात नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली.
राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा...
आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका, तुम्हाला ही मी शुभेच्छा देतो कारणं पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचे नसते. तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली असेल तर, नाहीतर तुमच अजून कठिन होईल.
जय महाराष्ट्र!
काही मीडिया चॅनल राणे साहेब मुख्यमंत्री शिंदे साहेबांना माझ्या विधानसभा तिकिटासाठी भेटायला गेले अशी बातमी करत आहेत,
मी माझे विषय हाताळायला सक्षम आहे, राणे साहेब स्वतःच्या कामानिमित्त शिंदे साहेबांना भेटले.
राणे साहेब माझ्यासाठी शिंदे साहेबांना भेटले ही बातमी चुकीची आहे.
@meNeeleshNRane साहेब सदैव तुमच्यासोबत आजचा निर्णय साहेब मनाला घाव करणारा निघाला आम्हा सर्वांना कुटुंब सदस्य प्रमाणे वागणूक दिलात आमच्या अडचणीत आमच्या पाठीशी खंबीर साथ दिलात आमच्यासारख्या अनेक कार्यकर्ते तुमचे चाहते आहेत कृपया साहेब असं अर्धवट रस्त्यावर सोडून जाऊ नकात हा निर्णय घेऊ नकात 🙏🏼