*माण तालुक्यातील टाकेवाडी येथे सत्यमेव जयते वाॅटरकप स्पर्धा 2018 मधील राज्यस्तरीय व तालुका स्तरावरील गावांचा कृतज्ञता व गौरव सोहळा* कार्यक्रमादरम्यान मनोगत व्यक्त करताना माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील.
बारामती आणि माढा मध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यासाठी स्वतः @PawarSpeaks साहेब,विजयसिंह मोहिते पाटील आणि मी सातत्याने पाठपुरावा करीत होतो.परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आज बारामती व माढा मध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. याबद्दल @MEAIndia चे आभार. (२/२)
@RailMinIndia@PiyushGoyal@PiyushGoyalOffc पंढरपुर-लोणंद मार्गाचा लवकरात लवकर सर्वे करुन DPR सादर करण्याचे आदेश आज रेल्वेमंत्र्यांनी दिले तसेच कुर्डूवाडी रेल्वे वर्कशॉप ला वाढीव काम देण्याचेही आदेश संबंधीत अधिकार्यांना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिले.
शंकररावांचं शिक्षण फार नव्हतं, पण त्यांना सगळ्या विषयांची जाण होती. परदेशात नवीन कृषिविषयक संशोधन वा तंत्रज्ञान आलं तर त्याकडेही त्यांचं बारकाईने लक्ष असायचं. आणि ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या भल्यासाठी व लाभाकरता आपल्या भागामध्ये कसं राबवता येईल, ही दूरदृष्टी त्यांच्याजवळ होती.
सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी माझ्यावर होती. सोलापूरमध्ये त्या काळात कारखानदारी अतिशय तुरळक होती. शंकरराव मोहिते-पाटील यांनी सहकारी तत्वावर शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने सुरू करून ऐतिहासिक कामगिरी बजावली.
सहकारमहर्षी कै. शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून अकलूज येथे शिक्षण प्रसारक मंडळाच्या रत्नाई महिला संकुलात बांधण्यात आलेल्या रत्नाई महिला वसतीगृहाचे उद्घाटन करताना आनंद वाटला.