यावेळी आनंद उत्सव साजरा करत लाडू वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुंबईतले जिल्हाध्यक्ष आणि वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
अयोध्या येथील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सर्वांना मंगलमयी शुभेच्छा.
डॉ. ज्योती विनायकराव मेटे
#जयश्रीराम#JaiShriRam#Ayodhya#RamMandir
अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामचे दिंडोशी विभागाचे अध्यक्ष राम दादा भोईटे यांनी दिनांक २२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून दिंडोशीकर नागरिकांशी संवाद साधला.
मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन....!!
सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या मनस्वी शुभेच्छा....!
- डॉ. ज्योती विनायकराव मेटे
वाटचाल मोठी आहे, सोबत कोण आहे यापेक्षा तुमच्या मनात काय आहे हे महत्त्वाचे आहे. काहीही झाले तरी आपल्याला आपले ध्येय प्राप्त करायचे आहे ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ.
शिवसंग्राम संघटनेच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त सर्वांना मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा 💐🚩
#शिवसंग्रामवर्धापनदिन
मराठा आरक्षणाचे प्रणेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेबांचे स्मरण करत असताना मराठा आरक्षण आणि अरबी समुद्रातील शिवस्मारक या दोन गोष्टींमध्ये कदापि तडजोड होणार नाही यासाठी शिवसंग्राम चा प्रत्येक मावळा त्याच्या ताकदीने लढणार आणि जिंकणार आहे.
हम लढेंगे भी और जितेंगे भी..!
शिवछत्रपतींच्या विचारांना अभिप्रेत, बहुजनांच्या न्याय हक्कासांठी सदैव कटिबद्ध असलेली आपली शिवसंग्राम संघटना आज २२ व्या वर्षात पदार्पण करतेय.
सामाजिक हितासाठी, आपल्या अस्मितेसाठी स्वर्गीय मेटे साहेबांनी पेटवलेली ही मशाल अखंड तेवत ठेवूया.!
विद्यमान सरकार असो की विरोधीपक्ष सर्वांना मेटे साहेबांचे आणि शिवसंग्रामचे मराठा आरक्षणप्रतीचे योगदान, संघर्ष आणि अभ्यास ज्ञात असतानाही आजच्या बैठकीला निमंत्रित न करणे हे अतिशय गंभीर आणि दुर्दैवी आहे.
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
मराठा आरक्षण शिवसंग्रामचा प्राण आहे, श्वास आहे, ध्यास आहे. स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेबांनी मराठा आरक्षणासाठी उमेदीची तीस वर्षे आणि प्रसंगी स्वतःचा प्राणही दिला.
आणि आरक्षणाच्या लढ्याची ज्योत कायम शेवटच्या श्वासापर्यंत तेवत ठेवली. सोबतच विधिमंडळातील प्रत्येक अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी अभ्यासपूर्ण मांडणी करून समाजाची विदारक परिस्थीती सरकार समोर मांडली. दुर्दैवाने नियतीने घात केला आणि समाजासाठी लढणारा लढवय्या धारातीर्थी पडला.
काकडहिरा गावचे जवान पांडुरंग तावरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
संपूर्ण तावरे परिवाराला या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
जय हिंद जय भारत🇮🇳🙏🏻
डॉ.ज्योती विनायकराव मेटे
सिक्कीममध्ये झालेल्या ढगफुटीमुळे तिस्ता नदीला महापूर आला, या पुरात लष्कराच्या छावणीसह २२ जवान वाहून गेले यात बीड जिल्ह्यातील काकडहिरा गावचे जवान पांडुरंग वामन तावरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बीडचा भूमिपुत्र अविनाश साबळे याने आशियाई स्पर्धेत ३००० मीटर स्टीपलचेज प्रकारात सुवर्ण पदका पाठोपाठ ५००० मीटर प्रकारामध्ये रौप्य पदक जिंकत भारतासाठी दोन पदके मिळवून दिल्याबद्दल त्याचे अभिनंदन !
जिल्ह्याला आणि संपूर्ण भारताला तुझा सार्थ अभिमान आहे.!
डॉ. ज्योती विनायकराव मेटे