आमचे दैवत शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीमंत राजे समरजितसिंह घाटगे(राजेसाहेब) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🎂
@ghatge_raje#HappyBirthday#rajesaheb
छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत!
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.
#ProudMoment #worldheritage #chatrapatishivajimaharaj
छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत !
किल्ले पन्हाळगड आता जागतिक वारसा यादीत...
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. 'अद्वितीय वैश्विक मूल्य' म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे.
यात महाराष्ट्रातील 11 किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.
#UNESCO #fort #panhalgad #worldheritage
मनःपूर्वक अभिनंदन...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मा. शशिकांत शिंदे साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष समाजाच्या तळागाळात पोहोचेल, असा विश्वास वाटतो.
#Congratulations #मनःपूर्वक_अभिनंदन
@shindespeaks
कागलनगरीत सहर्ष स्वागत!
घाटगे घराच्या नव्या पिढीचे नवे शिलेदार आणि आमचे धाकटे चिरंजीव युवराज राजे राघवेंद्रसिंह घाटगे यांच्यासह काल कागल नगरीचे ग्रामदैवत गहिनीनाथ गैबी पीर व घाटगे कुटुंबाचे कुलदैवत प्रभू श्री रामचंद्र यांचे मनोभावे दर्शन घेतले.
प्रथमच कागल नगरीत आगमन झाल्यानंतर आईसाहेब, पत्नी नवोदितादेवी घाटगे आणि कुटुंबातील सदस्यांसह प्रचंड जनसमुदायाने त्यांचे सहर्ष स्वागत केले. यावेळी नागरिकांनी केलेले धनगरी ढोल व बँड पथक तसेच मिळणारे भरपूर प्रेम आणि स्नेह सदैव संस्मरणीय असतील, यात शंकाच नाही. यावेळी गलेफा अर्पण केला तसेच प्रभू श्री रामचंद्र यांची महाआरती करत राजर्षी छत्रपती शाहू महाराज, श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज आणि स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांची समृद्ध परंपरा जपण्याची शक्ती मिळो, अशी मनोमन प्रार्थना केली.
नागरिकांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर!
एसटी भाडेवाढ आणि प्रिपेड स्मार्ट मीटर हे दोन्ही सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडून टाकणाऱ्या गोष्टी असून याचसह नवीन सीमा तपासणी नाक्यावर अनेक धोकादायक अडथळे निर्माण झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
या सर्व मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदार कार्यालय, कागल एसटी डेपो आणि महावितरणच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. नागरिकांच्या हक्कांसाठी करण्यात आलेल्या या मागण्यांवर प्रशासन सकारात्मक कार्यवाही करेल, ही अपेक्षा...
मनःपूर्वक अभिनंदन!
कडगाव, ता. गडहिंग्लज या गावातील रहिवासी ॲड. शरद संभाजीराव दभडे यांना नोटरी करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. याबद्दल त्यांचा सत्कार आणि अभिनंदन केले.
वचनपूर्ती...
आपल्या गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव गावातील लिंगनूर माळभाग कॉलनीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या खराब झाल्यावर होत्या. या भागातील नागरिकांच्या विनंतीस मान देऊन सदर ठिकाणी नवीन सिमेंट टाक्या बांधून दिल्या.
यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत असून येत्या काळातही सदैव आम्ही आपल्या सेवेत तत्पर असू, यात शंकाच नाही.
तू चाल पुढं पुढं...
आपल्या गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव गावात श्री. नितीन मोदर यांनी नव्याने सेंद्रिय ऊसाचे रसवंतीगृह सुरू केले आहे. त्यांच्या या नूतन व्यवसायाला सदिच्छा भेट दिली आणि अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
एक स्पर्धा स्वतःशी,
एक भेट भविष्याशी...
आज इंडोनेशिया देशातील साखर उद्योगातील तज्ञ शिष्टमंडळाने आपल्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने भेट दिली आणि आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी भारत आणि इंडोनेशिया देशातील साखर उद्योगात वापरले जाणारे तंत्रज्ञान आणि त्याबद्दल तुलना, आधुनिक तंत्रज्ञान आणि कारखान्याची वाढणारी गुणवत्ता तसेच अन्य विषयांचा समावेश होता.
याप्रसंगी कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी माहिती देताना आपल्या शाहू कारखान्याचा आजवरचा सहकार क्षेत्रातील चढता आलेख, प्राप्त झालेले विविध पुरस्कार आणि शेतकरी व सभासद बांधवांचा असणारा विश्वास याबद्दल माहिती देताना कारखान्याची स्पर्धा फक्त स्वतःशी असून भविष्यात अधिकाधिक समाजाभिमुख कार्य करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे स्पष्ट केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादकता आणि पर्यायाने साखर उत्पादन वाढवणे आवश्यक असून शेतकरी बांधवांना याबद्दल प्रोत्साहन देण्यासाठी कारखान्याचे कार्य सांगण्यात आले.
याचसह सहवीज निर्मिती, इथेनॉल निर्माण, सल्फरलेस साखर, बायोगॅस निर्मिती प्रकल्प आदी गोष्टींची माहिती देण्यात आली. याप्रसंगी पीटी गोल्डनचे विक्री अधिकारी श्री. इंद्र गुणवान, प्रक्रिया विभागाचे प्रमुख युद्धो विद्धी, पुण्याच्या जे. पी. मुखर्जी असोसिएट्सचे कार्यकारी संचालक शिरीष करंदीकर, इंडोनेशियन व शाहू साखर कारखान्याचा अधिकारी वर्ग उपस्थित होता.
वक्रतुण्ड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा।।
सर्व भक्तांना श्री गणेश जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
#shriganesha#ganpatibappamorya#ganeshjaynti
मनःपूर्वक शुभेच्छा!
आज आपल्या कागल तालुक्यातील पिंपळगाव खु. गावात वास्तव्यास असणारे श्री. संदीप शंकर कुरणे यांचा वास्तू शांती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी त्यांच्या निमंत्रणास मान देत उपस्थिती दर्शवली आणि त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
#vastushantipooja #Congratulations
तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीनें ॥
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी जीवनभर आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाला दिशा दाखवण्याचे काम केले. अध्यात्मिक मार्गे समाजप्रबोधन करणाऱ्या संतश्रेष्ठ तुकोबारायांना आज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
#santtukarammaharaj🚩 #jayanti #vinmraabhivadan🙏
मागोवा दैदीप्यमान इतिहासाचा...
कोल्हापूरचे सुपुत्र आणि ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपल्या लेखणीतून आजवर अनेक ऐतिहासिक गोष्टींवर प्रकाश टाकला असून आज त्यांच्या मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
शहाजी छत्रपती ट्रस्ट, न्यू पॅलेस आणि महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम मा. खा. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत, जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षततेखाली तर मा. खा. सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थिती दर्शवत छत्रपती राजाराम महाराज यांच्या अकाली मृत्यूनंतर स्वराज्याची धुरा सांभाळणाऱ्या महाराणी ताराबाई यांना अभिवादन केले आणि हा जाज्वल्य इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, अशी सदिच्छा व्यक्त केली.
@ShahuChhatrpati@supriya_sule@PrakashAbitkar
कर हर मैदान फतेह...
कागल तालुक्यातील व्हनाळी गावात वास्तव्यास असणाऱ्या प्रणवी वाडकर यांची महावितरणच्या ज्युनिअर असिस्टंट पदी निवड झाली आहे. याबद्दल आज त्यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले आणि आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो, असेही नमूद केले.
वाढदिवसाच्या शुभेच्छा...
आज आपल्या कागल तालुक्यातील व्हन्नूर गावातील रहिवासी श्री. अरुण लोंढे आणि कागल शहरातील श्री. किरण बेलेकर यांचा जन्मदिवस! या निमित्ताने दोघांनाही वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांना आरोग्यदायी जीवन लाभो, अशी प्रार्थना केली.
मनःपूर्वक आभार!
नुकताच आपल्या श्री छत्रपती शाहू साखर कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा २०२३-२४ चा कै. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार प्राप्त झाला आहे.
कारखान्याला मिळालेला हा ७२ वा पुरस्कार असून याबद्दल सभासद, शेतकरी व नागरिकांतून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. या सर्व शुभेच्छांचा स्वीकार करत त्यांचे मनस्वी आभार मानले आणि त्यांचे हे प्रेम असेच टिकून राहो, अशी प्रार्थना केली. याप्रसंगीची काही क्षणचित्रे...
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सार्वभौमत्व टिकवण्यासाठी लोकशाहीचा अंमल स्वीकारणे आवश्यक होते. आजच्याच दिवशी खऱ्या अर्थाने प्रजेचे राज्य प्रस्थापित झाले आणि स्वातंत्र्याला नवा अर्थ मिळाला.
हेच प्रजासत्ताक राष्ट्र पुढे नेणे, हीच आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांना खरी आदरांजली! आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...