यवतमाळ : जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या घडीपुस्तिका आणि भिंतीपत्रकाचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी (महसूल) अनुप खांडे आदी उपस्थित होते.
यवतमाळ : मतदार जागरुकता मंच स्थापन करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक अमरसिंह जाधव, आरडीसी नरेंद्र फुलझेले आदी उपस्थित होते.
यवतमाळ – जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने यवतमाळ येथे 92 व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात लोकराज्य स्टॉल लावण्यात आला होता. या लोकराज्य स्टॉलचे उद्घाटन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. राज्याचे शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनीसुध्दा लोकराज्य स्टॉलला भेट दिली
यवतमाळ येथे होणा-या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडपाचे भुमिपूजन स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा कांचन चौधरी, संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते आदी उपस्थित होते.
शिक्षणाचे महत्व अधोरेखीत करणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे अधिकारी व कर्मचा-यांना तर वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांसमोर विचार मांडण्याची संधी मिळाली…..
यवतमाळ : तालुक्यातील जांब आणि ईचोरा येथे रस्त्याच्या बांधकामाचे भुमिपूजन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. दोन्ही गावात जवळपास 7 कोटी रुपये खर्च करून या रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील दुष्काळग्रस्त गणेशवाडी आता जलयुक्त झाले आहे. विशेष म्हणजे ‘दि इंडीयन एक्सप्रेस’ मध्ये पहिल्या पानावर ही अँकर स्टोरी म्हणून प्रकाशित करण्यात आली. याच गणेशवाडीवर आधारीत ‘माळरानावर मत्स्यशेती’ हा विशेष लेख लोकराज्यच्या डिसेंबर अंकात प्रकाशित झाला
यवतमाळचे महारेशीम अभियान राज्यात ठरले पथदर्शी ही बातमी वृत्तपत्रात प्रकाशित झाली. तसेच यावर डिसेंबरच्या लोकराज्यमध्ये रेशीम शेती हा विशेष लेख प्रकाशित झाला आहे.
यवतमाळ : नगर भवन येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे उद्घाटन आज जिल्ह्याचे पालकमंत्री मा. मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे लावण्यात आलेल्या स्टॉलला भेट दिली. तसेच लोकराज्य, महात्मा गांधी आणि महामानव या पुस्तकांची पाहणी केली.