कटकट,चिडचिड,रागराग कोणालाही नकोच असतो याउलट मनाची शांती सर्वांनाच हवी असते पण आयुष्यात नको असलेल्या गोष्टी आपसूक ठाण मांडून बसलेल्या असतात आणि हव्या त्या गोष्टींसाठी कष्ट घ्यावे लागतात, प्रयत्न करावे लागतात तेव्हाच त्या साध्य होताना दिसतात.
#thursdaymorning#thisislife
एखादा चित्रपट आपल्याला रडवतो, हसवतो आणि जगणं शिकवतो तसा आहे हा पिंपळ...यात निघून जाणं आणि मागे उरणं अधोरेखित होत गेलंय. संवाद सहज आहेत पण मनाचा ठाव घेतात. अनेक प्रश्न आपल्याजवळ सोडून जातात. याच चित्रपटातल्या काही ओळी ज्या लिहून ठेवाव्या वाटल्या... #marathimovie#pimpal
कुछ़ इंसानोंसे अब उम्मीदें नही की जा सकती...
और कुछ़ इंसानोंपे खुदसे ज़ादा भरोसा किया जा सकता है!
.
.
बाकी का पता नहीं...
साल भर में यह जरूर सीख़ा है।
#2020
स्वत:च स्वत:च्या विचारांनी छिन्नविछिन्न करावं सारं...अगदी रोज! आणि मग स्वत:वर दया येऊन जोडत बसावा एक एक कण 'नव्याने' अगदी रोज! हसऱ्या चेहऱ्याचा मुखवटा घालून...