आज सकाळी मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून पडून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. ह्या घटनेतील बाधित कुटुंबांच्या आणि जखमी नागरिकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
#centralrailway
शिवसेना मोफत दाखला वाटप शिबिर यशस्वी!
मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अधिवास प्रमाणपत्र (डोमासाईल) आणि उत्पन्न दाखला मोफत वाटप शिबिराचे आयोजन!
📍 ठिकाण: युवासेना जनसंपर्क कार्यालय
📅 दिनांक: ८ जून २०२५
महाराष्ट्र राज्याचे परिवहनमंत्री तथा पालकमंत्री धाराशिव मा.ना.श्री. प्रतापजी सरनाईक साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणांस यशस्वी, आनंदी व निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच मनोकामना!
@PratapSarnaik
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निर्घुण हत्या हा केवळ एक गुन्हा नाही, तर माणुसकीवरचा मोठा डाग आहे. ज्यांनी गावाच्या हितासाठी, जनतेच्या भल्यासाठी स्वतःचं आयुष्य झोकून दिलं, त्यांनाच निर्दयपणे संपवलं जाणं हे खूप क्रूर आहे.
#RushikeshSanjayMane#santoshdeshmukhcase
शिंदे साहेबांचा आला आदेश निवडून आणा आपला नरेश
उमेदवार मा.@nareshmhaske यांच्या यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी जिजामाताई नगर येथे मोठ्या उत्साहात चौकसभा आज पार पडली. माझ्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या सभेत प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाबद्दल धन्यवाद !
🚩एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश निवडून आणा आपला नरेश
ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार श्री.नरेशजी म्हस्के साहेब यांच्या प्रचारार्थ आज विभागातील साईनाथनगर येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन येणाऱ्या दिवसां मध्ये महायुती चा उमेदवाराला स्थानिक लोकांपर्यंत पोचविण्याचा निर्धार केला.
ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार श्री.नरेशजी म्हस्के साहेब यांच्या प्रचारार्थ आज विभागातील हाजुरी येथील. आंध्रा लोकवस्तीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रचारसंदर्भात चर्चा करून निर्धार केला. एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश निवडून आणा आपला @nareshmhaske@Shivsenaofc@mieknathshinde
'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच' ही ऐतिहासिक गर्जना करणारे थोर स्वातंत्र्यसेनानी, साक्षेपी संपादक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
या संकटसमयी अगदी तत्परतेने एनडीआरएफ, टिडीआरएफ, अग्निशमन दल, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे स्वयंसेवक यांच्यासमवेत विविध कंपन्यांचे कर्मचारी हे गेल्या काही तासांपासून अथक परिश्रम घेत गरजूंना विविध मदत पोहचविण्याचे कार्य करत आहे त्यांच्या या मेहनतीला सलाम.
#रायगड जिल्ह्यातील #खालापूर जवळील #इशाळवाडी या आपत्तीग्रस्त गावाला भेट देऊन येथील परिस्थितीचा आणि चालू असलेल्या मदत कार्याचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री महोदयांचा आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवेचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे.