बारामती आणि माळेगावच्या विकासकामांना गती देण्यासाठी आढावा बैठक घेतली. नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांना प्राधान्य देत आवश्यक सूचना दिल्या.
📍 सहयोग निवासस्थान, बारामती
दिवाळीचा पाडवा.. पण यंदा दादा सोबत नाहीत, ही उणीव प्रत्येक क्षणी जाणवतेय..!
आदरणीय अजितदादांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बारामती सनसेट पॉईंटवर यंदा बारामतीकरांनी एकत्र येत ‘चला, एक पणती घेऊन या...’ या उपक्रमातून दादांच्या स्मृतींना उजाळा दिला. या उपक्रमाला उपस्थित राहून बारामतीकरांशी संवाद साधला.
प्रत्येक पणतीच्या प्रकाशात दादांच्या आठवणी होत्या, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता होती आणि त्यांनी दिलेल्या प्रेमाची जाणीव होती. दादा आज आपल्यात नसले, तरी बारामतीच्या मातीशी, इथल्या माणसांशी आणि प्रत्येकाच्या मनाशी त्यांचं नातं कायम आहे. हा जिव्हाळा, हे प्रेम आणि या आठवणीच माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे.
दादा, तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही... पण तुम्ही दिलेला प्रकाश असाच कायम तेवत ठेवण्याचा प्रयत्न करत राहीन..!
स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२५-२६
नवी मुंबई देशात अव्वल; महाराष्ट्रातील पाच शहरांचा गौरव!
स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२५-२६ मध्ये महाराष्ट्राने उल्लेखनीय कामगिरी करत देशपातळीवर आपला ठसा उमटवला आहे. भारताच्या महामहिम राष्ट्रपती मा. श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात नवी मुंबई शहराला देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहराचा प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला आहे.
यासोबतच विटा (जि. सांगली) शहराने २० हजार ते ५० हजार लोकसंख्या गटात प्रथम, पाचगणी (जि. सातारा) शहराने २० हजारांपेक्षा कमी लोकसंख्या गटात द्वितीय, रत्नागिरीने स्वच्छ कोस्टल टाऊन श्रेणीत तृतीय, तर पिंपरी-चिंचवडने महाराष्ट्रातील सर्वोत्तम स्वच्छ शहराचा बहुमान पटकावला आहे.
महाराष्ट्राचा गौरव वाढवणाऱ्या या पाचही शहरांचे, स्वच्छता मोहिमेत मोलाचे योगदान देणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आणि संबंधित सर्व विभागांचे अभिनंदन!
#cleancity #स्वच्छसर्वेक्षण
पिंपरी-चिंचवडला राज्यातील सर्वात स्वच्छ शहराचा मान!
‘स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२५-२६’ मध्ये पिंपरी-चिंचवडने महाराष्ट्रातील सर्वोत्तम स्वच्छ शहर म्हणून प्रथम क्रमांक मिळवला आहे. नवी दिल्ली येथे माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांच्या हस्ते शहराला हा सन्मान प्रदान करण्यात आला.
शहराच्या सुनियोजित विकासासाठी आदरणीय अजितदादांनी नेहमीच दूरदृष्टीने नियोजन आणि विकासकामांना प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर स्वच्छतेसाठी राबवण्यात आलेले विविध उपक्रम, महापालिका प्रशासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यामुळे पिंपरी-चिंचवडने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
हा सन्मान म्हणजे शहराच्या विकासासाठी घेतलेले सामूहिक प्रयत्न आणि स्वच्छतेप्रती असलेल्या बांधिलकीची पावती आहे. या अभिमानास्पद यशासाठी महापालिका प्रशासन, अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता सेवक आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व नागरिकांचे अभिनंदन!
महाराष्ट्राच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारी अभिमानास्पद बातमी!
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व लाडघर या कोकणातील तीन सुंदर समुद्रकिनाऱ्यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय ‘ब्लू फ्लॅग’ पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, श्रीवर्धन हा महाराष्ट्रातील पहिला ‘ब्लू फ्लॅग’ पुरस्कार प्राप्त करणारा समुद्रकिनारा ठरला आहे.
स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सुरक्षितता आणि पर्यटनाच्या उत्तम सुविधांच्या निकषांवर मिळालेला हा सन्मान म्हणजे कोकणच्या निसर्गसौंदर्याची जागतिक स्तरावर उमटलेली मोहोर आहे. या यशासाठी योगदान देणारे सर्व अधिकारी, स्थानिक नागरिक आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन!
आज सहयोग निवासस्थान, बारामती येथे माळेगाव नगरपंचायत क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी माळेगाव येथे सुरू असलेल्या तसेच प्रलंबित विकासकामांची सविस्तर माहिती घेतली. ही कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माळेगाव येथील पाणीपुरवठ्याचाही विशेष आढावा घेतला. नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन व्हावे आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
माळेगावच्या सर्वांगीण विकासासोबतच नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देऊन विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
📍 सहयोग निवासस्थान, बारामती
आज सहयोग निवासस्थान, बारामती येथे बारामती नगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी शहरातील सुरू असलेली, प्रलंबित तसेच प्रस्तावित विकासकामांची सविस्तर माहिती घेतली.
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठ्याचा विशेष आढावा घेतला. नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, पाणीटंचाई निर्माण होऊ नये तसेच उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
बारामती शहराचा नियोजनबद्ध विकास आणि नागरिकांना मूलभूत सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करावे, यावर यावेळी भर देण्यात आला.
📍 सहयोग निवासस्थान, बारामती
भारतीय नेमबाजांची जागतिक स्तरावर सुवर्ण भरारी!
ISSF जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत ईशा सिंग, मनू भाकर आणि दिव्या सुब्बाराजू यांनी महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकत भारताला मोठे यश मिळवून दिले आहे.
जागतिक स्तरावरील या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दाखवलेले कौशल्य, चिकाटी आणि सांघिक भावना कौतुकास्पद आहे. त्यांच्या या विजयामुळे भारतीय क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ईशा, मनू आणि दिव्या यांच्या या यशाचा मनापासून आनंद आणि अभिमान आहे. तिघींचेही हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
'मिशन शक्ती-संबल' अंतर्गत 'वन स्टॉप सेंटर'साठी १ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, केंद्र शासनाचा १००% निधी वितरित करण्यात आला आहे.
हिंसाचारग्रस्त आणि संकटात सापडलेल्या महिलांना वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य, पोलीस मदत, तात्पुरता निवारा तसेच मानसिक आधार व समुपदेशन अशा सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. संकटात सापडलेल्या महिलांना पुन्हा आत्मविश्वासाने उभे राहण्यासाठी सुरक्षित वातावरण, योग्य मदत आणि नवी दिशा देणारा हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक मंडळ व परिसरातील इतर मान्यवर देखील उपस्थित होते. ऊसतोड कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.!
#maval#sunilshelke#pankajatai#maharashtra
स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राचा गौरव; नवी मुंबई देशात अव्वल!
‘स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२५-२६’ मध्ये नवी मुंबईने देशातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. या यशासोबतच महाराष्ट्रातील इतर शहरांनीही विविध श्रेणींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत राज्याचा गौरव वाढवला आहे. नवी दिल्ली येथे मा. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
नवी मुंबई - देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल स्थान
विटा (जि. सांगली) - २० ते ५० हजार लोकसंख्येच्या शहरांमध्ये देशात पहिला क्रमांक
पाचगणी (जि. सातारा) - २० हजारांखालील लोकसंख्येच्या गटात दुसरे स्थान
रत्नागिरी - स्वच्छ किनारपट्टी शहरांच्या श्रेणीत तिसरा क्रमांक
पिंपरी-चिंचवड - राज्यातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा मान
ही कामगिरी म्हणजे स्वच्छतेसाठी घेतलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, प्रशासनाचे नियोजन आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाची पोचपावती आहे. महाराष्ट्राचा गौरव वाढवणाऱ्या या सर्व शहरांचे, स्वच्छतादूतांचे, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आणि नागरिकांचे अभिनंदन!
महिलांवरील हिंसाचाराला आळा घालण्यासाठी आणि संकटग्रस्त महिलांना सर्वतोपरी सहाय्य देण्यासाठी ‘मिशन शक्ती-संबल’ अंतर्गत One Stop Centre साठी १ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वैद्यकीय उपचार, कायदेशीर मदत, पोलीस सहाय्य, तात्पुरता निवारा आणि समुपदेशन अशा सुविधा या केंद्रांमधून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
महिलांच्या संरक्षणासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बळ देणारी महत्त्वपूर्ण व्यवस्था!
#womensafety #womansupportingwoman #maharashtra
📍वर्षा निवासस्थान, मुंबई
राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय ना. श्री. देवेंद्र भाऊ फडणवीस यांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन दीपावलीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
यावेळी मराठवाड्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीची माहिती देत भाऊंना राज्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याची विनंती चर्चेदरम्यान केली. त्यास भाऊंनी सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वस्त केले.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
#Mumbai
#CM #Diwali
#Drought
#DMUpdates
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये बारामतीच्या खेळाडूंची देदिप्यमान कामगिरी!
राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात बारामतीचे नाव अभिमानाने उंचावणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा आज प्रशासकीय भवन, बारामती येथे सन्मान करण्याचा योग आला.
दिल्ली येथे पार पडलेल्या ७० व्या नॅशनल स्कूल गेम्स २०२६-२७ कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत बारामती तालुक्यातील कु. श्रावणी संजय शिंदे हिने १४ वर्षांखालील ३३ किलो वजन गटात प्रथम क्रमांक, तर कु. समृद्धी प्रवीण सावंत हिने १४ वर्षांखालील ३० किलो वजन गटात तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या १९ वर्षांखालील मुलींच्या गटात बारामतीच्या कु. अनुष्का बापू कुतवळ हिने देशात प्रथम क्रमांक मिळवत बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या सर्व गुणवंत खेळाडूंचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांचे, क्रीडा शिक्षकांचे आणि मोलाची साथ देणाऱ्या पालकांचे अभिनंदन! बारामतीच्या या खेळाडूंनी आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले यश निश्चितच अभिमानास्पद आहे. त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा!
📍 प्रशासकीय भवन, बारामती
भाऊबीजेच्या निमित्ताने बारामती तालुक्यातील मूर्टी, जोगवडी आणि अंबी बुद्रुक येथील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून शेतकरी बांधव आणि भगिनींशी संवाद साधला. पावसाअभावी कोमेजलेली पिकं, पाण्याची टंचाई आणि आर्थिक अडचणींमुळे शेतकरी कुटुंबांच्या रोजच्या जगण्यावर दुष्काळाचा किती खोलवर परिणाम होत आहे, याची जाणीव झाली.
अजितदादांनी जपलेला शेतकऱ्यांशी असलेला जिव्हाळा आणि मायेचा वारसा पुढे नेत, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका कायम राहील!
राज्यासह देशभरात विविध उच्चपदस्थ पदांवर कार्यरत असलेल्या अधिकारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या ‘आपली बारामती, आपली माणसं’ या ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दीपवंदना’ या उपक्रमातून आदरणीय अजितदादांप्रती असलेलं प्रेम, आदर आणि जिव्हाळा पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला... प्रत्येक दिव्यामध्ये दादांच्या आठवणी होत्या, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञतेची भावना होती. हा आपलेपणा आणि प्रेम असंच कायम राहणं, हीच आमच्यासाठी मोठी ताकद आहे.
आदरणीय दादांच्या स्मृतीस्थळी दिव्यांची आरास करत, त्यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहण्याचा हा उपक्रम मनाला भावणारा होता. या सुंदर उपक्रमासाठी सर्वांचे मनापासून आभार..!
शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत जपला आपुलकीचा ऋणानुबंध!
भाऊबीजेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी बारामती तालुक्यातील मूर्टी, जोगवडी आणि अंबी (बुद्रुक) या गावांमध्ये शेतकरी बांधवांची बांधावर जाऊन भेट घेतली. दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि शेतीविषयक अडचणी जाणून घेत त्यांच्या समस्या व मागण्यांवर संवाद साधला. शेतकरी बांधवांसोबत शेतातच त्यांनी पिठलं-भाकरीच्या घासातून जपले आपुलकीचे नाते!
#शेतकरी #maharashtra #sunetrapawar