"ग्रामविकास हीच खरी प्रगती” हा विचार समाजमनात रुजवत स्वावलंबी, सशक्त आणि आदर्श गावांच्या निर्मितीसाठी आयुष्यभर कार्य करणारे महान समाजप्रबोधक, कीर्तनकार आणि जनतेचे प्रेरणास्थान राष्ट्रसंत तुकड���जी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
‘ग्रामगीता’च्या माध्यमातून त्यांनी ग्रामस्वराज्य, स्वच्छता, शिक्षण, श्रमसंस्कार आणि समाजएकतेचा संदेश देत ग्रामीण भारताच्या विकासाला नवी दिशा दिली. त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आणि राष्ट्रनिर्मितीचा मार्ग दाखवणारे आहेत.
त्यांच्या कार्याला आणि विचारांना विनम्र अभिवादन!
#तुकडोजीमहाराज #जयंती #SocialReform #Maharashtra #SantParampara #ncp
स्व. श्री. अजितदादा पवार यांचं नाव
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाला देण्यात यावं, कारण दादाचं या सरकारमधील मिसिंग लिंक होते.
त्यांची आठवण सदैव सोबत राहील.
#missyoudada
📍 Srinagar, J&K
Jammu and Kashmir’s State Executive Council meeting of the Nationalist Youth Congress was held in Srinagar in the presence of Nationalist Youth Congress National President Shri Dheeraj Sharma and J&K State President Arif Surma, as part of the organisation’s ongoing tour, with the Nationalist Youth Congress making a strong presence in the region, especially among the youth.
The meeting focused on understanding the perspectives of Kashmir’s youth, discussing their concerns, and shaping a clear roadmap ahead. Key discussions were held on organisational expansion, current challenges, and solutions. Several young individuals also joined the organisation during the meeting.
It was emphasised that Kashmir’s youth are talented and capable, and with the right opportunities and direction, can significantly contribute to the region’s development. Along with employment, issues like mental well being and aspiration gaps were also highlighted.
It was announced that the Jammu and Kashmir State Convention of the Nationalist Youth Congress will be held in June, where Hon’ble Rajya Sabha MP Shri Parth Pawar ji will engage with the youth.
The meeting was attended by J&K NYC General Secretary Inam ul Haq, State Secretary Mohammad Zia, along with state executive members, office bearers, and party workers.
@Sharmancpspeaks
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत असताना आदरणीय अजितदादांच्या स्मृतींना वंदन करून त्यांच्या लोकाभिमुख विचारांची प्रेरणा मनाशी बाळगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनसेवेसाठी कटिबद्ध आहे !
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने त्रिवार अभिवादन करण्यात आले.
आज सकाळी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री श्री. नवाब मलिक यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मंत्रालयाजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृत�� पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री श्री. नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश प्रतिनिधी संजय तटकरे, संतोष धुवाळी, बापू भुजबळ, नरेंद्र राणे, जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, सुरेश भालेराव, व्यंकटेश म���नव, अर्शद अमीर, मुंबई महिला अध्यक्षा आरती साळवी,सेवादलाचे अध्यक्ष उत्तमचंद जैन आदींसह जिल्ह्याचे महिला व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, आधुनिक भारताचे निर्माते, सामाजिक न्या���ाचे अध्वर्यू, समतेचे प्रखर पुरस्कर्ते, महान अर्थतज्ज्ञ, विधिज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, संपादक, विचारवंत आणि वंचित-शोषित, पीडित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे युगपुरुष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक समता, महिलांचे अधिकार, कामगार कायदे, आर्थिक न्याय आणि लोकशाही मूल्यांची भक्कम पायाभरणी करण्याचे ऐतिहासिक कार���य त्यांनी केल���. भारतीय राज्यघटनेतून समान हक्क, मूलभूत अधिकार, धर्मस्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि कायद्यापुढे सर्व समान या मूल्यांना त्यांनी संस्थात्मक रूप दिले.
शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन मानत त्यांनी ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा मंत्र दिला आणि समाजातील वंचित घटकांना स्वाभिमानाने उभे राहण्याची प्रेरणा दिली. भारताच्या आर्थिक धोरणांपासून ते जलव्यवस्थापन, कामगार कल्याण, औद्योगिक विकास आणि लोकशाही बळकटीकरणापर्यंत त्यांच्या दूरदृष्टीचा ठसा उमटलेला दिसतो.
समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित न्याय्य, प्रगत आणि सर्वसमावेशक भारताचे त्यांचे स्वप्न आजही आपल्या विचारांना दिशा देणारे आणि कार्याला प्रेरणा देणारे आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाही व्यवस्थेची पायाभरणी करताना त्यांनी दिलेले संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या सन्मानाने जगण्याचा हक्क अधोरेखित करणारा जिवंत दस्तऐवज आहे. अज्ञान, अन्याय आणि गुलामगिरीच्या जोखडात अडकलेल्या समाजाला मुक्त करून त्यांनी समतेचा व न्यायाचा नवा मार्ग दाखवला. डॉ. बाबासाहेबांचे जीवन म्हणजे अन्यायाविरुद्धच्या संघर्षाची प्रेरणादायी गाथा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत, समताधिष्ठित आणि प्रगत भारत घडवण्याचा संकल्प आजच्या दिवशी अधिक दृढ करूया.
आपल्या विचारांनी, कार्याने आणि तत्त्वज्ञानाने युगानुयुगे मार्गदर्शन करणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन!
क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच��या जयंतीनिमित्त आज पुण्यातील फुले वाडा येथे त्यांच्या तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
समाजातील वंचित, शोषित आणि दुर्लक्षित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी उभा केलेला लढा आणि शिक्षणाच्या माध्यमातून रुजवलेले समतेचे विचार आजही आपल्याला दिशादर्शक आहेत. यावेळी समानता, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांचे मूल्य जपताना समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्य करण्याचा संकल्प दृढ केला.
समाजातील अंधार दूर करून शिक्षणाचा दिवा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणारे, स्त्री-शिक्षणाचे जनक, सत्य���ोधक समाजाचे संस्थापक, शेतकरी-शोषित-वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्य वेचणारे थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले यांना २०० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांची ज्योत पेटवून भारतीय समाजाला नवी दिशा दिली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने सुरू केलेला स्त्री शिक्षणाचा लढा, शेतकऱ्��ांच्या प्रश्नांवर केलेले कार्य, जातीय अन्यायाविरुद्ध दिलेला बुलंद आवाज आणि सर्वसमावेशक समाजाची मांडणी आजही प्रेरणादायी आहे.
समता, बंधुता आणि सामाजिक न्याय हीच खरी प्रगतीची वाट आहे, हा विचार महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजमनात रुजवला. शिक्षण, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाचा मार्ग दाखवणाऱ्या त्यांच्या कार्यातून आजही नव्या महाराष्ट्राची दिशा ठरते. त्यांच्या विचारांनी प्रेरित ��ोऊन सर्वसमावेशक, प्रगत आणि न्याय्य महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प आजच्या या विशेष दिवशी आपण पुन्हा दृढ करूया.
क्रांतिसूर्य, थोर समाजसुधारक, सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#MahatmaPhule200
#SocialJustice
#EqualityForAll
#NCP
थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवत शतकानुशतके अज्ञानाच्या अंध:कारात जगणाऱ्या स्त्रियांना सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचे महान कार्य केले. समाजातील विघातक जातीव्यवस्थेतील अपप्रवृत्तींच्या विरोधात ठाम आवाज उठवून त्यांनी सत्य, समता आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला. समाजात ज्ञानाची ज्योत निर्माण करणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज नवी दिल्ली येथे देशाचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती मा.श्री. सी. पी. राधाकृष्णन जी यांच्या उपस्थितीत राज्यसभेच��या सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ मान्यवर नेते उपस्थित होते.
जनतेचा विश्वास आणि त्यांच्या अपेक्षा लक्षात ठेवून राज्यसभेत प्रभावीपणे आवाज उठवण्याचा, जनतेची बाजू मांडण्याचा व देशाच्या विकासासाठी योगदान देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन.
आगामी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्राव��िनी अजितदादा पवार उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.
या पार्श्वभूमीवर २०१ बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह महायुतीचा कार्यकर्ता मेळावा कविवर्�� मोरोपंत नाट्यगृह येथे पार पडला. यावेळी महायुतीतील विविध मान्यवरांनी मा. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत मा. सुनेत्रावहिनींना निवडणुकीत पाठिंबा दर्शवला. यावेळी मा. सुनेत्रावहिनी यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
यावेळी संबोधित करताना, दोन महिन्यांपूर्वी आपण सर्वांनी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री, लोकनेते, आदरणीय अजितदादांना गमावले. ही केवळ माझ्या कुटुंबाची नाही, तर संप��र्ण बारामतीची मोठी हानी आहे. त्यांच्या अनुपस्थितीत ही पहिलीच निवडणूक होत असून त्यांच्या विकासदृष्टीला पुढे नेण्यासाठी आपली साथ अत्यंत आवश्यक आहे.
बारामतीला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचे दादांचे स्वप्न होते. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रामाणिकपणे काम करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. संपूर्ण बारामती हे माझे कुटुंब आहे. दादांचा दरबार जसा सर्वांसाठी खुला होता, तसाच तो पुढेही कायम ठेवत प्रत्येकाच्या अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध ��ाहीन. बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे. ही निवडणूक माझी वैयक्तिक नसून दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक बारामतीकराची आहे, अशा भावना मा. सुनेत्रावहिनींनी व्यक्त केल्या.
या मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. श्र��. प्रफुलजी पटेल, प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनीलजी तटकरे यांच्यासह भाजप, शिवसेना, आरपीआय, रयत क्रांती संघटना, भीमशक्ती रिपब्लिकन सेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@SunetraA_Pawar @mieknathshinde @praful_patel @SunilTatkare @ChhaganCBhujbal
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे आज मा. अजितदादांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. दादा आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या विचारांची शिदोरी, त्यांच्या कार्याची उंची आणि त्यांनी दिलेली मूल्ये प्रत्येक क्षणी सोबत आहेत. या स्मृती स्थळासमोर उभे राहताच त्यांच्या सहवासातील असंख्य आठवणी मनात दाटून आल्या.
जनतेसाठी झटणारा एक निस्वार्थ लोकनेता, निर्णयक्षमतेत कणखर आणि माणुसकीत मृदू असे त्यांचे विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. दादांनी आयुष्यभर जपलेली ही ओळखच आज लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी घालून दिलेला जनसेवेचा मार्ग आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी हीच माझ्यासाठी दिशा आणि शक्ती आहे.
आज त्यांच्या स्��ृतीस्थळाचे दर्शन घेऊन पुढील वाटचालीसाठी नवा ध्यास, नवी उमेद आणि नवी ऊर्जा मिळाली. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालण्याचा निर्धार आणखी दृढ झाला.