NEET पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेसाठी एकत्र येऊया!
🗓️ १९ जुलै २०२६ | ⏰ सायं. ४ वा.
📍 शिवतीर्थ, माँसाहेबांच्या पुतळ्याजवळ
विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या संरक्षणासाठी उपस्थित राहा!
हबीब बिल्डिंग येथील ज्येष्ठ शिवसैनिक श्री. अनंत राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची सदिच्छा भेट घेऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाखाप्रमुख श्री. दीपक बागवे उपस्थित होते.
श्री. अनंत राणे यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धी लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
प्रभाग क्र. १९९ मध्ये BLA म्हणून नगरसेविका सौ. अबोली गोपाळ खाड्ये यांनी BLO अनिकेत परमार यांच्यासमवेत SIR प्रक्रियेचा आढावा घेतला. मतदार नोंदणी, दुरुस्ती व नागरिकांना मार्गदर्शनासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यावेळी संगीता मुरुडकर, अण्णा तावडे व छायाताई कोळी उपस्थित होत्या.
प्रभाग क्र. १९८ मधील सखुबाई मोहिते मार्ग, बीडीडी चाळ क्र. २७ व २८ परिसरातील नाल्यांची नगरसेविका सौ. अबोली गोपाळ खाड्ये यांच्या पाठपुराव्यामुळे स्वच्छता करण्यात आली. पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी स्वच्छतेचा हा सातत्यपूर्ण प्रयत्न.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित क्रीडा महोत्सवात नगरसेविका सौ. अबोली गोपाळ खाड्ये यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
प्रभाग क्र. १९८ मधील रुस्तमवाला चाळ परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची नगरसेविका सौ. अबोली गोपाळ खाड्ये यांच्या पाठपुराव्याने आवश्यक छाटणी करण्यात आली.
SIR प्रक्रियेच्या संदर्भात आमदार सुनिल भाऊ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. मतदार नोंदणी, यादीतील त्रुटी व दुरुस्त्यांबाबत चर्चा करून प्रत्येक पात्र मतदाराचा मतदानाचा हक्क अबाधित राहावा, यावर भर देण्यात आला.
प्रभाग क्र. १९८ मधील वीज समस्यांबाबत बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देत उद्या प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार.
योगिनी एकादशीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा!
भगवंत श्रीविठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत, सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि अखंड भक्तिभाव नांदो, हीच श्रीविठ्ठल चरणी प्रार्थना.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल!
कार्यसम्राट आमदार श्री. सुनीलभाऊ शिंदे यांच्या माध्यमातून विधानभवनाला सदिच्छा भेट. विधानसभेच्या कामकाजाचा अभ्यास, मोलाचे मार्गदर्शन आणि जनसेवेची नवी प्रेरणा लाभली.
आज प्रभाग १९८ मधील गणपतराव कदम मार्ग, रुस्तमवाला चाळ येथील हनुमान मंदिर परिसरात कोसळलेल्या झाडाची पाहणी केली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. संबंधित यंत्रणेला तातडीने झाड हटवून परिसर सुरक्षित करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता.
“चला पंढरीसी जाऊं, रखुमादेवीवरा पाहूं…” 🙏
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त सर्व वारकरी आणि विठ्ठलभक्तांना हार्दिक शुभेच्छा! श्री विठ्ठल-रखुमाईंची कृपा सर्वांवर सदैव राहो. 🚩✨
प्रभाग १९८ मधील गणपतराव कदम मार्ग, रुस्तमवाला चाळ येथील हनुमान मंदिर परिसरात कोसळलेल्या झाडाची आज प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित यंत्रणेला तातडीने झाड हटवून परिसर सुरक्षित करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांची सुरक्षितता हेच सर्वोच्च प्राधान्य.
लागलिसे आस गोडी अभंगाची,
कृपा विठ्ठलाची, पांडुरंगाची..! 🙏
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पावन पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त सर्व वारकरी व भाविकांना हार्दिक शुभेच्छा! संतांचा भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश सर्वांच्या जीवनात आनंद व समाधान घेऊन येवो.
॥ राम कृष्ण हरी ॥
🌧️ सतर्क नागरिक, सुरक्षित परिसर!
मुसळधार पावसात परिसरातील नागरी समस्या (पाणी साचणे, झाडे/फांद्या पडणे, उघडी गटारे, खड्डे, वीज/BEST अडचणी) दिसल्यास स्पष्ट फोटो व अचूक ठिकाणासह पाठवा.
आपला एक संदेश त्वरित कार्यवाहीसाठी मदत करू शकतो. 🙏
प्रभाग क्र. १९८, बीडीडी चाळ क्र. १० येथे BLO सौ. संध्या कांबळे यांच्या कामाचा आढावा घेत मतदार नोंदणी व कागदपत्र पडताळणीबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.
SIR प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी BLA पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. आवश्यक नियोजन, मतदार नोंदणी, कागदपत्रांची पूर्तता आणि बूथस्तरीय जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
बीडीडी चाळ क्र. ७ मधील पावसामुळे बाधित घरांची पाहणी करून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देत प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू.
पाणीपुरवठ्याच्या गंभीर व प्रलंबित समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित पूर्वनियोजित बैठकीस Hydraulic Engineer कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर. नागरिकांच्या प्रश्नांबाबतचा हा निष्काळजीपणा अस्वीकार्य! जबाबदारी निश्चित करून पाणीपुरवठ्याच्या समस्या तातडीने सोडवाव्यात.