आज अभाविप लातूर महानगराच्या वतीने विद्या आराधना अकॅडमीचे संचालक श्री.सतीश डी. पवार सर यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी महानगरमंत्री सुशांत एकोर्गे, सहमंत्री नरेंद्र ठाकूर, वैष्णवी शितोळे,अजय स्वामी उपस्थित होते.
"Team Pharma Vision ALMALA Making a Unique! Today Pharma Vision S.C.O.P-ALMALA Team has installed a water station in their college campus to provide relief to thirsty birds and animals during this scorching summer.
Small actions, big impact!
या मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांना आपल्या मौल्यवान मताची जाणिव करुन देण्यात आली, यावेळी लातूर महानगर फार्माव्हिजन संयोजक बालाजी हत्ते ,आलमला महाविद्यालय फार्माव्हिजन प्रमुख विशाल खरे,महाविद्यालय सहप्रमुख विरोचन पांचाळ व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, लातूर शाखेच्या वतीने चापोली येथे संजीवनी महाविद्यालय , बसस्थानक, हॉटेल, मेडिकल, चापोलि व हणमंतवाडी येथील ग्रामस्थांना मतदाना विषयी माहिती सांगून पत्रक वाटप करण्यात आले.
यावेळी औराद शहर मंत्री भागवत बिरादार , निलंगा शहरमंत्री यश अरिकर, कार्यालयमंत्री प्रसाद डावरगावे,कृष्णा बिरादार, विशाल देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद औराद शाखेच्या वतीने औराद येथील शेतकरी माल खरेदी विक्री बाजार व तगरखेडा येथील ग्रामस्थांना मतदान जनजागृती बद्दल माहिती सांगून पत्रक वाटप करण्यात आले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लातूर महानगर शाखेच्यावतीने एम.एस.बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे मतदान जनजागृती अभियानाची पोस्टर अनावरण करण्यात आले. तसेच पत्रक वाटून मतदान याविषयी माहिती देण्यात आली.यावेळी महानगर सहमंत्री वैभव चव्हाण उपस्थित होते.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद निलंगा शाखेच्यावतीने महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे"मतदान जनजागृती अभियानाचे" पोस्टर अनावरण करण्यात आले, तसेच पत्रक वाटून मतदान याविषयी माहिती दिली. त्याच बरोबर I T I महाविद्यालय निलंगा, व बस स्थानकावर पत्रक वाटप करण्यात आले.
आज अभाविप निलंगा शाखेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने प्रतिमा पुजन व केळी वाटप करण्यात आली. यावेळी निलंगा शहरमंत्री यश अरिकर,आदर्श कांबळे,हर्षवर्धन कांबळे, नागेश नरवने आदी कार्यकरते उपस्थित होते.
आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विकासार्थ विद्यार्थी (SFD) औराद आयोजित मास्टर दिनानाथ मंगेशकर महाविद्यालय औराद येथे पक्षी मित्र अभियानाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
आज अभाविप लातूर महानगर शाखेच्या वतीने सुशिलादेवी महाविद्यालयाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली.महाविद्यालय अध्यक्ष श्रावणी काळे,उपाध्यक्ष राकेश सुरवसे महाविद्यालयल मंत्री राजनंदिनी ठाकूर ,महेक सय्यद,यांची घोषणा करण्यात आली.यावेळी लातूर पश्चिम नगरमंत्री सागर वाडीकर उपस्थित होते.