@shubham_9909@Dev_Fadnavis ' एकदा ' शिवाजी नगर हिंजवडी चालू झाली की मधला एकदा फार आवडला...किती व���्ष झाली तो एकदा येतोय असा वाटतं..बाकी मेट्रो राहूदे...मेट्रो सुरू झाली की कदाचित रस्ते बरे होतील याचं जास्त अप्रूप आहे मला तरी
@dpranav88 नको त्या गोष्टी मधे तुम्हाला का पडायचा आहे....dj, plasma बंद हवा का नको ते बोला. त्यानं काही फालतु बडबड केली असेल. जेवढा कामाचा आहे चांगला आहे ते घ्या आणि पुढे चला
@DheerajGhate Bakichancha jau de saheb. Aplya bappachi vitambana apan kartoy hi bhavna ahe...samjun ghya...pratyek veli dusarya ni mati khalli mhanun apan shen khayacha barobar nahi. Apan marg dakhvu changlya goshtincha...vichar kara
गेल्या २ वर्षांत (चाकण-पिंपरी-हिंजवडी) ६५०+ लोकांना रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे आणि अपघातांमुळे जीव गेला आहे. 😔🙏🏻
तर आपण लोकप्रतिनिधींचा एक सहज आढावा घेऊ. 📃👀
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड मधील विद्यमान आमदार, खासदार आणि त्यांचे पक्ष:
• पुणे शहर (८ विधानसभा मतदारसंघ)
कोथरूड: चंद्रकांत पाटील (BJP)
कसबा पेठ: हेमंत रासने (BJP)
शिवाजीनगर: सिद्धार्थ शिरोळे (BJP)
पर्वती: माधुरी मिसाळ (BJP)
खडकवासला: भीमराव तापकीर (BJP)
पुणे कॅन्टोन्मेंट: सुनील कांबळे (BJP)
वडगाव शेरी: बापू पठारे (NCP-SP)
हडपसर: चेतन तुपे (NCP)
• पिंपरी-चिंचवड परिसर ( ४ विधानसभा मतदारसंघ)
चिंचवड: शंकर जगताप (BJP)
पिंपरी: अ��्णा बनसोडे (NCP)
भोसरी: महेश लांडगे (BJP)
मुळशी: शंकर मांडेकर (NCP)
• जिल्ह्यातले खासदार (४ लोकसभा)
पुणे लोकसभा : मुरलीधर मोहोळ (BJP)
बारामती लोकसभा : सुप्रिया सुळे (NCP-SP)
शिरूर लोकसभा : अमोल कोल्हे (NCP-SP)
मावळ लोकसभा : श्रीरंग बारणे (SS)
• ३ राज्यसभा खासदार ( शरद पवार,मेधा कुलकर्णी, पार्थ पवार )
• ३ विधानपरिषद आमदार ( विक्रम काकडे, उमा खापरे, अमित गोरखे )
एवढ्या सगळ्यांच्या मतदारसंघातील जिवातले जीव असणारे मतदार/कार्यकर्ते, हिंजवडी IT Park आणि चाकण MIDC येथे काम करत आहेत.
या पैकी कोणत्याच नेत्याला तिथे येऊन आंदोलन किंवा त्यांच्यासाठी झटू वाटत नसावं का?
या पैकी कोणत्याही एका नेत्याने येऊन उपोषण/दिवसभर आंदोलन केलं तर प्रश्न सुटणार नाहीत का? समृध्दी महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग होऊ शकतो!
तर हिंजवडी आणि चाकण येथील ट्रॅफिक, रस्ते, फुटपाथ होऊ शकत नाहीत का? ते राहिलं या सगळ्या नेत्यांच्या घरापासून १ किमी अंतरावरील रस्ते, फुटपाथ चांगले आहेत का?
बाकी अन्न, पालेभाज्या, पाणी, आरोग्य, मराठी शाळा, विज, गुंडागर्दी, कोयता गँग या गोष्टी बद्दल मी आत्ता तरी काहीच बोलणार नाही. 🤫
या सगळ्या गोष्टी नीट करण्यासाठी कमी कशाची असावी? इच्छाशक्ती, पैसा का वेळ? शहरात इतके मोठे नेते, मंत्री असताना पण जर या गोष्टी सुटत नसतील तर काय म्हणायचं!
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांना आतापर्यंत एकदाही हिंजवडीला येऊन अडचणी का बघू वाटल्या नसतील?
आणि जानेवारी महिन्यात अतिप्रतीक्षित महानगरपालिका निवडणुका होऊन, निवडून आलेले नगरसेवक यांनी पण काही जास्त पाठपुरावा केला असं दिसलं नाही.
बाकी तुम्ही आम्ही ��नता मुर्ख आहोत आणि इथून पुढेही बनत राहणार, जो पर्यंत आपल्या घरातलं कोणी अपघातात किंवा अडचणीला समोरं जात नाही.
तो पर्यंत काय सर्वांची एकी होणार नाही आणि आवाज पण उठणार नाही!
राजकीय नेत्यांना आपली गरज फक्त आणि फक्त मतदाना दिवशीच आहे लक्षात असूद्या.✌🏻
आपण सगळे देवाच्या भरोशावर आहोत, त्यालाच आपली काळजी! बाकी जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय असो आणि चौथा स्तंभ (मिडियाचा) पण विजय असो. 🙏���🔥🇮🇳
#पुणे #पिंपरी_चिंचवड #हिंजवडी #चाकण #MIDC #IT_Park #सरकार #विरोधीपक्ष