Congratulations to Shri Umesh Patil on his appointment as the National Chief Spokesperson of the Nationalist Congress Party by Hon. National President and Deputy Chief Minister of Maharashtra, Smt. Sunetra Vahini Ajitdada Pawar.
@umeshpatilspeak
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या हस्ते आज मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी आमदार श्री. झिशान सिद्दिकी यांची मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसंगी त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. या नव्या जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छा.
@zeeshanBabaS
राष्ट्रीय अध्यक्षतथा महाराष्ट्र राज्याच्या मा उपमुक्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार ह्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी माझे सहकारी बंधू मा उमेश दादा पाटील यांची नियुक्ती केली मनपूर्वक अभिंदन दादा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा @umeshpatilspeak
आज नवी दिल्ली येथे महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांची माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह भेट घेऊन आगामी ३१ ऑक्टोबर रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण दिले. यावेळी गोदा आरती, कुंभमेळा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन, कुंभमेळा गीताचे लोकार्पण, कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आणि विशेष टपाल तिकिटाचे अनावरण असे विविध कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांसाठी त्यांना आमंत्रित केले.
या प्रसंगी महाराष्ट्राची समृद्ध आध्यात्मिक परंपरा, आदिवासी उद्योजकता, येवल्याची पैठणी, कृषिसमृद्धी आणि खाद्यसंस्कृती यांची ओळख करून देणारा विशेष भेटवस्तू संच राष्ट्रपती महोदयांना प्रदान केला. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा हा सिंहस्थ कुंभमेळा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि आध्यात्मिक परंपरेचा गौरव जागतिक स्तरावर अधोरेखित करणारा ठरेल.
@rashtrapatibhvn
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या मान्यतेने आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सौ. निर्मला नवले यांची नियुक्ती केली.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्षा मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी सौ. निर्मला नवले यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि राज्यभर युवतींचे संघटन बळकट करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी कार्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस तथा प्रवक्ते श्री. सूरज चव्हाण आणि प्रदेश प्रवक्त्या ॲड. सायली दळवी उपस्थित होते.
@iAditiTatkare काँग्रेस ची बौद्धिक दिवाळखोरी ह्यातून दिसून येते हा अपमान सुनेत्रा वाहिनीचा नसून भारतातील तमाम नारीशक्तीचा आहे नारीशक्ती काँग्रेसला कधीच माफ करणार नाही
महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय अजितदादांच्या पश्चात आदरणीय सुनेत्राकाकी पवार यांनी अत्यंत धैर्याने जनसेवा आणि महाराष्ट्राच्या विकासाची जबाबदारी स्वीकारली. वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून त्यांनी जनतेच्या सेवेला प्राधान्य दिले, ही बाब निश्चितच प्रेरणादायी आहे.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्याचा सन्मान व्हायला हवा. मात्र, त्यांच्यावर होत असलेली वैयक्तिक आणि मर्यादा ओलांडणारी टीका ही केवळ दुर्दैवीच नव्हे, तर महिलांच्या नेतृत्वाचा अवमान करणारी आहे. दुर्दैवाने स्वतःला "पुरोगामी" म्हणवून घेणाऱ्या पक्षानेच पुरुषी मानसिकतेतून आदरणीय काकींवर मर्यादा ओलांडून टीका करणे हे महाराष्ट्रासाठी अवमानकारक आहे.
@INCMaharashtra
कष्ट, जिद्द आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर बारामतीची सुपुत्री कु. श्रावणी कृष्णकांत कुदळे हिने NEET 2026 परीक्षेत ७२० पैकी ७१० गुण मिळवून महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावले. इतकेच नव्हे, तर संपूर्ण देशातील मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवून तिने बारामतीसह महाराष्ट्राचा मान उंचावला आहे.
श्रावणीचे हे यश असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. या तेजोमय कामगिरीबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन आणि वैद्यकीय क्षेत्रातील तिची भावी वाटचाल यशस्वी, उज्ज्वल व समाजोपयोगी ठरो, ही सदिच्छा.
आज वाल्हेकर ज्वेल्सच्या नवीन शोरूमच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून शुभारंभ केला.
सुवर्णकार व्यवसाय हा विश्वास, गुणवत्ता आणि समृद्ध परंपरेचा वारसा जपणारा व्यवसाय आहे. वाल्हेकर ज्वेल्स ग्राहकांचा विश्वास संपादन करत उत्कृष्ट सेवा, पारदर्शक व्यवहार आणि दर्जेदार दागिन्यांच्या माध्यमातून यशाची नवी शिखरे गाठो, तसंच या व्यवसायातून परिसरातील नागरिकांना अधिक चांगली सेवा उपलब्ध होवो, अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी श्री. चेतन शहा–वाल्हेकर तसंच संपूर्ण परिवाराचं अभिनंदन करत त्यांच्या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.
📍 बारामती
बारामतीत पर्यावरण संवर्धनाचा ऐतिहासिक संकल्प!
आज बारामती येथे स्वर्गीय मा. अजितदादा पवार पर्यटन उद्यान नामकरण समारंभ तसेच "देवगिरी ते देवराई" राज्यव्यापी वृक्षसंवर्धन अभियानाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.
हा सोहळा केवळ एका उद्यानाच्या नामकरणाचा नव्हता, तर पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ अधिक बळकट करण्याचा आणि स्वर्गीय मा. अजितदादा पवार यांच्या पर्यावरणप्रेमी विचारांना कृतीतून अभिवादन करण्याचा प्रेरणादायी क्षण ठरला.
स्वर्गीय अजितदादांनी कन्हेरी पर्यटन उद्यानाच्या संकल्पनेपासून ते उभारणीपर्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे राखीव वनाच्या ५५ हेक्टर क्षेत्राच्या विकासासाठी ८ कोटी ७५ लाखांचा निधी उपलब्ध झाला. या माध्यमातून Pathways, Suspension Bridge, Solar Lights, Adventure Activity Zone, Rock Garden आणि Butterfly Garden यांसारख्या आधुनिक सुविधांची निर्मिती करण्यात आली.
"देवगिरी ते देवराई" हे अभियान केवळ वृक्षलागवडीपुरते मर्यादित नसून पर्यावरण संवर्धनाची व्यापक जनचळवळ आहे. २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या अभियानात सहकार्य करणारे वनमंत्री श्री. गणेश नाईक, ज्येष्ठ अभिनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री. सयाजी शिंदे, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, Mumbai Port Authority, सह्याद्री देवराई फाउंडेशन, Environmental Forum of India, संयुक्त वन व्यवस्थापन समित्या, इको डेव्हलपमेंट कमिट्या, CSR भागीदार, औद्योगिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायती आणि सर्व स्वयंसेवकांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान झालेल्या पावसाने वातावरण अधिक भावूक झाले. उपस्थित प्रत्येकाच्या मनात स्वर्गीय अजितदादा आजही आपल्या आशीर्वादाच्या रूपाने सोबत असल्याची भावना जागृत झाली.
स्वर्गीय अजितदादा पवार यांनी केलेला पर्यावरण संवर्धनाच्या प्रेरणेचा वारसा पुढे नेत, हरित, समृद्ध आणि शाश्वत महाराष्ट्र घडविण्यासाठीचा निर्धार यावेळी पुन्हा एकदा मा. सुनेत्रावहिनींनी व्यक्त आला.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे आज स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं.
'माऊली'चा गजर करत विठ्ठलनामात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना प्रेमानं भोजन वाढत त्यांच्या सेवेत सहभागी होण्याचं भाग्य लाभलं. वारकरी संप्रदायाने जपलेली सेवा, समता, प्रेम आणि भक्तीची परंपरा हीच महाराष्ट्राची खरी ओळख आहे. या पवित्र भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनात मोठ्या संख्येनं वारकरी सहभागी झाले.
📍काटेवाडी, बारामती
आज बारामती इथं स्वर्गीय मा. अजितदादा पवार पर्यटन उद्यान नामकरण समारंभ आणि "देवगिरी ते देवराई" राज्यव्यापी वृक्षसंवर्धन अभियानाचा शुभारंभ झाला. हा केवळ एका उद्यानाच्या नामकरणाचा किंवा वृक्षसंवर्धन अभियानाच्या प्रारंभाचा सोहळा नव्हता, तर पर्यावरण संवर्धनाचा संकल्प अधिक दृढ करणारा आणि स्वर्गीय मा. अजितदादांच्या विचारांना कृतीतून अभिवादन करणारा अविस्मरणीय क्षण ठरला.
या प्रसंगी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आलं. पर्यावरण संवर्धन, देशी वृक्षांची लागवड आणि वनसंपदेच्या जतनासाठी त्यांचा नेहमीच विशेष आग्रह असायचा. त्यांच्या नावानं उभारण्यात आलेलं हे पर्यटन उद्यान निसर्गाशी जोडणारं, पर्यावरण शिक्षण देणारं आणि भावी पिढीला प्रेरणा देणारं केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कन्हेरी पर्यटन उद्यानाची संकल्पना, नियोजन आणि उभारणीत आदरणीय अजितदादांचं मोलाचं योगदान राहिलं आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळं कन्हेरी येथील राखीव वनाच्या ५५ हेक्टर क्षेत्रासाठी ₹८ कोटी ७५ लाखांचा निधी उपलब्ध झाला. या निधीतून Pathways, Suspension Bridge, Solar Lights, Adventure Activity Tools, Rock Garden आणि Butterfly Garden विकसित करण्यात आले आहेत.
"देवगिरी ते देवराई" हे अभियान केवळ वृक्षलागवडीचे नाही, तर पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ आहे. २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट राज्य शासनानं निश्चित केलं असून, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येकानं या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन यावेळी केलं.
या अभियानासाठी सहकार्य करणारे वनमंत्री श्री. गणेश नाईक, ज्येष्ठ अभिनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री. सयाजी शिंदे, तसेच वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, Mumbai Port Authority, सह्याद्री देवराई फाउंडेशन, Environmental Forum of India, संयुक्त वन व्यवस्थापन समित्या, इको डेव्हलपमेंट कमिट्या, विविध CSR भागीदार, औद्योगिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायती आणि सर्व स्वयंसेवकांचं अभिनंदन केलं.
कार्यक्रम सुरू असतानाच पडलेल्या पावसाने वातावरण आणखी भावूक झालं. उपस्थित प्रत्येकाच्या मनात दादा आजही आपल्या आशीर्वादाच्या रूपानं सोबत असल्याची भावना दाटून आली.
आदरणीय अजितदादांनी दिलेली पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा जपत, हरित, समृद्ध आणि शाश्वत महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार यावेळी पुन्हा एकदा व्यक्त करण्यात आला.
शेतकऱ्यांची 'पाटी कोरी' करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय!
दिवसा १२ तास मोफत वीज, ₹४८,००० कोटींचे थकीत वीजबिल माफ, तसेच केंद्र व राज्य सरकार योजनांद्वारे कर्जमुक्ती व्यतिरिक्त यावर्षी शेती क्षेत्रासाठी ₹९५,००० कोटींची तरतूद देखील करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत समृद्ध आणि सक्षम कृषी व्यवस्थेकडे महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे.
#ncpmahayuti #Krushi #FreeElectricity #ViksitMaharashtra #Shetkari
महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, आदरणीय अजितदादा यांच्या जयंतीचा सन २०२६ पासून राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये समावेश करण्यात आला आहे. हा केवळ शासन निर्णय नसून, महाराष्ट्राच्या विकासासाठी आयुष्यभर झटलेल्या, लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या आणि विकासाला नवी दिशा देणाऱ्या दादांच्या कार्याचा राज्याने केलेला अधिकृत गौरव आहे.
दादांनी प्रशासनात कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण करत पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग, शिक्षण, क्रीडा, ग्रामीण विकास आणि जनकल्याणाच्या प्रत्येक क्षेत्रात दूरदृष्टीने काम केले. आपल्या कर्तृत्व, निर्णयक्षम नेतृत्व आणि लोकाभिमुख कार्यशैलीमुळे त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा भक्कम पाया रचला. म्हणूनच ते जनतेच्या मनात केवळ एक नेता नव्हते, तर प्रत्येकाच्या हक्काचे 'दादा' होते.
यापुढे दरवर्षी २२ जुलै रोजी शासकीय स्तरावर त्यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार आहे. दादांच्या लोकसेवेचा, विकासदृष्टीचा आणि जनतेप्रती असलेल्या समर्पणाचा हा सन्मान संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा क्षण आहे.
आदरणीय अजितदादांचे विचार, कार्य आणि विकासाचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
आदरणीय अजितदादांना विनम्र मानवंदना!
आज देवगिरी या निवासस्थानी पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच सर्वसामान्य नागरिकांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या विविध समस्या, सूचना आणि मागण्या जाणून घेतल्या. संबंधित विषयांवर सकारात्मक चर्चा करत त्या मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
📍मुंबई