“यशस्वी व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख त्याच्या कार्यातून आणि माणुसकीतून होत असते.”
माझे मित्र, श्री. अतुलराजे माने यांना ३८ व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या आयुष्यात यशाची नवी शिखरे, उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि भरभराट लाभो. ईश्वर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो.
Happy Birthday Dear! 🎂💐
माझे वडील मंत्री असताना त्यांच्या खुर्चीमागे एक वाक्य कायम कोरलेले असायचे—
“Leadership is an action, not a position.”
आज त्या वाक्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.
मा. मुख्यमंत्री महोदयांनी नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यांसाठी ढगफुटीचा इशारा दिल्यानंतर, मा. ना. गिरीषभाऊ महाराज साहेब यांनी स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता तात्काळ नाशिक विश्रामगृहात दाखल होत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी तळ ठोकला. संकटसमयी लोकप्रतिनिधीने जनतेसोबत उभे राहणे म्हणजे नेमके काय, याचे त्यांनी कृतीतून उदाहरण घालून दिले.
दुर्दैवाने, जिल्ह्याला अनेक मंत्री लाभले असले तरी अशा प्रसंगी जनतेच्या दुःखाशी समरस होऊन मैदानात उतरलेले नेतृत्व क्वचितच दिसते. पद, सत्ता आणि वैभव यापलीकडे जाऊन जनतेच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणारे नेतृत्वच खऱ्या अर्थाने लोकनेतृत्व ठरते.
नाशिक जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने आपल्या या संवेदनशीलतेला, तत्परतेला आणि कर्तव्यनिष्ठेला मनःपूर्वक सलाम.
मानलं तुम्हाला भाऊ…! 🫡
नेतृत्व पदामुळे नव्हे, तर कृतीमुळे सिद्ध होतं—आणि ते तुम्ही पुन्हा एकदा दाखवून दिलंत.
माझे आजोबा, ख्यातनाम शल्यविशारद डॉ. किरण (मामा) देसाई यांचे मेहुणे, भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पटकथालेखक, अभिनेते, चित्रपट निर्माते आणि माझे मार्गदर्शक मा. सलीम खान सर यांच्या प्रकृतीविषयीची बातमी समजल्यानंतर मन अत्यंत व्यथित झाले.
परमेश्वराच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना आहे की, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि लवकरात लवकर संपूर्ण स्वास्थ्य लाभो. त्यांनी आपल्या प्रतिभेने, विचारांनी आणि अनुभवाने पुढील अनेक वर्षे समाजाला प्रेरणा देत राहावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
ईश्वर त्यांना सदैव निरोगी, आनंदी आणि सुदृढ ठेवो. 🙏🏻
माणसं जातात… पण त्यांची मूल्यं, त्यांचं कार्य आणि त्यांनी जपलेली नाती कायम स्मरणात राहतात.
स्व. श्रीकृष्ण राणे साहेब यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. ॐ शांती! 🙏💐
॥ दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती ॥ 🙏🏻
माझे आजोबा आणि माझ्या जीवनातील आदर्श, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, लोकनेते स्व. व्यंकटरावभाऊ हिरे यांच्या ४६ व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतींना कोटी कोटी प्रणाम.
आयुष्यभर लोकसेवा, शिक्षणाचा प्रसार, समाजहिताची अखंड तळमळ आणि जनकल्याणाची मूल्ये जपत त्यांनी उभारलेला कार्याचा दीपस्तंभ आजही असंख्यांना प्रेरणेचा मार्ग दाखवत आहे.
त्यांचे विचार, लोकसेवेप्रती त्यांची अखंड निष्ठा आणि समाजकार्यासाठीचे त्यांचे समर्पित जीवन हा आमच्यासाठी अमूल्य वारसा आहे. त्या वारशाचे जतन आणि संवर्धन करणे, हीच त्यांना खरी आदरांजली.
त्यांच्या पावन स्मृतींना शतशः विनम्र अभिवादन! 💐🙏🏻
आज सहजच एक स्टोरी पाहिली. बॅकग्राऊंडला गाणं होतं…
“वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा..”
ते ऐकलं आणि त्या ओळींचा वेगळाच अर्थ जाणवला.
माकडं स्वतः कष्ट करतात, घाम गाळतात, खेळ करून लोकांचं मनोरंजन करतात आणि त्यातून हजारो गरीब कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. म्हणून मला त्या कष्टकरी “माकडांचा” अभिमान आहे.
पण वाघाचं काय?
वाघाला समोर जो दिसेल त्यालाच फस्त करायची सवय. स्वतःच्या सोबत्यांनाही न सोडणारा वाघ शेवटी एकटाच उरतो.
मग “वाघ एकला राजा” यात कौतुक कसले? स्वतःच्याच कळपाला संपवून एकटा उरण्यात पराक्रम नसतो; खरी ताकद सोबती जपण्यात असते.
एकटेपण हे नेहमी सामर्थ्याचं लक्षण नसतं; कधी कधी ते स्वतःच्या स्वभावाचं परिणामही असतं. 🤣
“गाडीवरील माझे नाव पांढऱ्या पट्ट्या लावून तुम्ही सहज झाकू शकता. पण बळीराजाच्या हृदयावर कोरलेली माझ्या कामाची ओळख कोणत्या पट्टीने झाकणार?
नावे पुसता येतात, पण जनतेच्या मनात निर्माण झालेला विश्वास कधीच पुसता येत नाही.” 🌾
ॲटोराऊंडर्सचे CEO तथा फ्युचर ग्रुपचे संचालक, माझे जिवलग मित्रबंधू श्री. सतीश मंडालिया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉💐
आई तुळजाभवानीच्या चरणी एकच प्रार्थना—आपल्याला उदंड, निरोगी, सुखी आणि यशस्वी आयुष्य लाभो. आपल्या प्रत्येक स्वप्नाला यश लाभो, व्यवसायात सातत्याने भरभराट होवो आणि समाजसेवेच्या कार्यात अधिकाधिक यश मिळो.
आपले मैत्रीचे नाते असेच सदैव दृढ राहो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, भावा! 🎂🎈🙏
लॅम्बॉर्गिनी ही एकेकाळी ट्रॅक्टर बनवणारी कंपनी होती.
सॅमसंग हे एकेकाळी किराणा दुकान होते.
एलजी हे एकेकाळी चेहऱ्यावरील क्रीमचे ब्रँड होते.
आयकिया हे एकेकाळी साधे पेन विक्रेते होते.
यातून काय शिकायला मिळते?
तुमची सध्याची परिस्थिती हीच तुमची अंतिम अवस्था असणे आवश्यक नाही.
खंबीर राहा, सतत नवे प्रयोग करत राहा, दररोज १% जरी सुधारणा होत असेल तरी ती करत राहा, आणि हे लक्षात ठेवा की महान यशाची सुरुवात अनेकदा अत्यंत साध्या आणि नम्र सुरुवातीतूनच होते. 🙏🏻✨
📚 पदवीवर विश्वास की पुन्हा परीक्षांवर?
विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परीक्षा महत्त्वाच्या आहेतच… पण प्रत्येक टप्प्यावर नवीन पात्रता परीक्षा लादून आपण शिक्षणव्यवस्थेवरच अविश्वास दाखवत आहोत का?
🎓 शिक्षणाचा उद्देश “गुणवत्तापूर्ण विद्यार्थी” घडवणे असावा, फक्त “परीक्षार्थी” नव्हे.
#NCET #NEET #NET #SET #TET #EducationSystem #StudentVoice #EducationalReform #IndiaEducation