*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर करण्यात आलेल्या "गुंगी गुडिया" या आरोपाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांची NDTV मराठीकडे मार्मिक प्रतिक्रिया..*
https://t.co/lCEmcP0HdE
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांना "गुंगी गुडिया" संबोधून काँग्रेस पक्षाने फक्त वहिनींचा नाही तर, विधानसभा निवडणुकीत देशातील रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने निवडून देणाऱ्या संपूर्ण बारामतीकरांचा आणि पर्यायाने आदरणीय शरद पवार साहेबांसह संपूर्ण पवार कुटुंबीयांचा अपमान केला आहे. माननीय सुनेत्रा वहिनींनी वेळोवेळी मोजक्या शब्दात आणि योग्य वेळी मौन ठेवून राजकारणातील आपले व आपल्या पक्षाचे स्थान बळकट केले आहे. त्यांचा धीरोदात्तपणा देशाने अनुभवला आहे. त्यामुळे काँग्रेसने त्याची काळजी करू नये.
आदरणीय शरद पवार साहेबांनी काँग्रेस पक्षाला श्रीमती सुनेत्रा वहिनींची जाहीर माफी मागायला लावावी अन्यथा इंडिया आघाडीतून बाहेर पडावे.
-- उदयकुमार आहेर
(प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
आमदार असूनही एस. टी. बसने प्रवास करणारे कदाचित शेवटचे आमदार स्वर्गीय गणपतराव (आबा) देशमुख यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन🙏💐
आबा, आपण दिलेली साधेपणाची शिकवण मला आयुष्यभर प्रेरणा देत राहील...
-- उदयकुमार आहेर
(प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
आपल्या मनासारखे झाले नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व राज्याच्या उपमुख्यमंत्री मा.ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्यासारख्या शालीन महिलेला राजकारणच करू द्यायचं नाही, असे काहींनी ठरविले आहे. त्यांची नावे वहिनींना देखील ठाऊक आहेत.
पक्षातील मराठा व बहुजन तसेच आदिवासी, अल्पसंख्यांक व दलित समाजातील देशातील अजितदादांचे प्रामाणिक कार्यकर्ते ठामपणाने श्रीमती सुनेत्रावहिनी, पार्थदादा व जयदादा यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून आम्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना फक्त सुनेत्रा वहिनींचेच नेतृत्व मान्य आहे.
याची पक्षातील "अनाजीपंतां" नी गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी. तथाकथित नोटीसीला कायद्याच्या भाषेत योग्य ते उत्तर दिले जाईल.
--उदयकुमार आहेर
(प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या निवडणुकीत उपाध्यक्षपदी कसमादेचे भूमिपुत्र Tv9 चे पुणे ब्युरो चीफ, माझे मित्र मा. श्री. योगेशजी बोरसे हे विजयी झाले. सर्व विजयी उमेदवारांचे व श्री. योगेशजी बोरसे यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन💐💐
📍मुंबई
आज स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
स्वराज्यनिष्ठा आणि अदम्य शौर्य यांचे प्रतीक असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन आजही प्रत्येकाला राष्ट्रनिष्ठा, त्याग आणि पराक्रमाची प्रेरणा देते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या जीविताला असलेल्या धोक्याबाबत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आम्ही करीत आहोत.
-उदयकुमार आहेर
प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
आज बारामतीच्या दौऱ्यावर असताना, काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पावलेल्या अमूल्य जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या दुख:दायी प्रसंगी शासन त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
#PahalgamTerroristAttack