महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज राजसाहेबांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं...
#गणेशोत्सव#MNSAdhikrut
मा. अमितसाहेब ठाकरे यांच्या मागणीला यश – गणेशोत्सव काळातील परीक्षा पुढे ढकलल्या जाणार...
गणेशोत्सव हा "राज्य महोत्सव" असूनही अनेक शाळा व महाविद्यालयांनी परीक्षा ठेवून विद्यार्थ्यांचा उत्साह हिरावून घेतला होता. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमितसाहेब ठाकरे यांनी ठाम मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत राज्य सरकारने गणेशोत्सव काळातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने याला विद्यार्थ्यांच्या संस्कृती व आनंदाचा विजय असल्याचे म्हटले आहे.
#MNVSAdhikrut
पक्षप्रवेश, वणी.
पराभवाने खचून न जाता, नव्याने झेप घ्यायची.!
मनसे नेते राजू उंबरकर यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. यावेळी १०० पदाधिकाऱ्यांची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. @mnsadhikrut
राज ठाकरे यांच्या पक्ष शिस्तीला सलाम.
पक्षात कोणीही लोकप्रतिनिधी नसताना पक्षातील नेत्यांना राजकीय शिस्त नसल्याने थेट पद मुक्त केले,मग तो कोणीही असो.पक्षाचे राजकीय बाजारात ज्यांना स्वतःला विकायचे आहे त्यांनी बातम्या पेरण्यापेक्षा गप्प गुमाने निघून जावे,ठाकरेंवर दबाव टाकायचा नाही.
गद्दारांची टोळी सगळ्या गद्दारांनाच गोळा करत फिरत आहे. ५० खोके घेऊन हे फुटले आता इतरांना खोके वाटत फिरतायत. यांना काय कळणार इमान आणि निष्ठा म्हणजे काय? यांनी तर फक्त स्वार्थासाठी आपल्याच नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न केलाय. या मिंधे गटामुळे महाराष्ट्राला गद्दारीचा शाप लागलाय. ज्यावेळी स्वत:ला पोरगं होत नाही तेव्हा दुसऱ्याचं मुल मांडीवर घ्याव लागतं. मिंधे गटाची हीच अवस्था आहे. आणि ज्यांना खांद्यावर घेतलं तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झालेत. पण या गद्दारांना गाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.
यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा ‘विद्यार्थी संवाद दौरा’...
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आर्णी, दिग्रस आणि पुसद तालुक्यात ‘विद्यार्थी संवाद दौरा’ आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी केले. दौऱ्यात शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे यांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व मूलभूत सोयीसुविधा तसेच अडचणी जाणून घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या समस्या प्रशासनासमोर मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कटिबद्ध असल्याचे नानवटकर यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी प्रशांत गौरकर, उमेश जाधव, चेतण रुडे, अजय लाड, गणेश खुरसडे, मयूर राऊत, महेश विडाकर, प्रज्वल झकवके, ओम गिरी, आकाश ठाकरे, दर्शन नानवरे, धीरज कोडापे, साईराम कवडे, प्रथमेश पाटील, राम मोहरकर, सुरज चौधरी, साई मागें, बालाजी लडके, रवी खापरकर, संतोष बावणे यांसह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना योग्य मंच मिळेल व त्यांना न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
#MNVSAdhikrut
पक्ष प्रवेश ...
" तुमच्याकडे प्रस्थापित असतील तर आमच्याकडे विस्थापित आहेत " ...
नवी मुंबई वाशी आणि कोपरखैरणे विभागातील महिला व तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला ...
याप्रसंगी शहर सचिव विलास घोणे,विभाग अध्यक्ष अभिलेश दंडवते,चंद्रकांत डांगे,सखाराम सकपाळ उपस्थित होते ...
#mns #मनसे
#नवीमुंबई #navimumbai