गडचिरोली येथील आश्रमशाळेतील 3 निष्पाप विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे झालेला मृत्यू हा केवळ अपघात नाही, तर या निर्दयी व्यवस्थेने केलेला ‘प्रशासकीय खून’ आहे! चौकशी करण्याचं धाडस दाखवणार की नेहमीप्रमाणे पांघरूण घालणार?
- रोहित पवार
@RRPSpeaks@CMOMaharashtra
श्री देवेंद्रजी,
आधी राम मंदिरातील दान पेटी चोरीवर बोला
अयोध्येत राम मंदिर लुटीवरचे नवे रामायण भाजपा ने लिहिले आहे!
विषय राहिला ऑस्कर चा,
ज्युअरी मंडळींच्या घरी लगेच Ed आणि सीबीआय पाठवा साहेब,
काम सोपे आहे
किंवा ज्युरी चा गट फोडण्यासाठी अमित शहा याना पाठवा
चिंता नाही करायची!
जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, त्यांच्यावर पॅलेट गन वापर करण्यात आले. पण आपल्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री घाबरले आणि बेपत्ता आहेत. त्यांनी संसदेत पाऊल ठेवलेलं नाही. मी तर एक चित्रपट बनविणार आहे, लापता गृहमंत्री !
- संजय राऊत,
नेते, शिवसेना ठाकरे
भाजप हा कधीच महिलांचा सन्मान करणारा पक्ष नव्हता तर कायम पाताळयंत्री आणि कारस्थानी पक्ष राहिलाय हेच भाजपचा पदाधिकारी विजय चौधरी यांच्या राजीनाम्याने स्पष्ट झालं. स्वतःच्याच पक्षाच्या महिला नेत्यांबाबत करत असलेलं कारस्थान उघडकीस आल्याने पक्षाच्या इज्जतीचा जो जाहीर पंचनामा झाला त्यावर पांघरुन टाकण्यासाठीचा हा राजीनामा झाला आहे आणि या राजीनाम्याने व्हायरल ऑडिओ क्लिपलाही दुजोरा मिळाला आहे. आता भाजप कोणत्या तोंडाने महिला सन्मानाच्या गप्पा मारणार?
- रोहित पवार
@BJP4Maharashtra
अनेक नेते हे विद्यार्थी आंदोलनातून आले आहेत. यात जे. पी. नड्डा, विनोद तावडे हे देखील विद्यार्थ्यांनी आंदोलनातून आले आहेत. ते विद्यार्थ्यांकडे गेले नाहीत किंवा त्यांचे ऐकून घेतले नाही.
ही आमचं तुमचं करण्याची गोष्ट नाही. पेपरलीकमध्ये जे पण शामील आहेत, ते सर्व आठ जण महाराष्ट्रातून आहे आणि ते सर्व भाजपशी संबंधीत आहेत.
- संजय राऊत,
नेते, शिवसेना ठाकरे
@rautsanjay61@TawdeVinod
अजिंक्य पर्वाची निवृत्ती!
“जीवनातील प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते आणि एक शेवटही. तो क्षण आला की त्याचा सन्मान करून पुढे जाणं गरजेचं आहे. माझ्या फलंदाजीप्रमाणेच मी योग्य वेळेवर नेहमी विश्वास ठेवला आणि आज मला वाटतं, आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.”
— अजिंक्य रहाणे
भारतीय क्रिकेटपटू
आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत महिला २५ मीटर पिस्तूल प्रकारात सलग दुसरे विश्वचषक सुवर्णपदक पटकावणाऱ्या ईशा सिंह आणि कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
माझ्या मनात, म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत खूप होतं की, अरे आपण 'विश्वगुरू' बनू, पण आता मी पाहतोय की विश्वगुरू या कल्पनेच्या अगदी उलट गोष्टी जास्त घडत आहेत. त्यामुळे एकतर आपण 'विश्वगुरू-विश्वगुरू' असं म्हणणं बंद तरी केलं पाहिजे, नाहीतर मग हा सगळा मूर्खपणा थांबवला पाहिजे.
- अनुराधा पौडवाल
‘मी 10 वर्षांपूर्वी हॉल्टरनेक ब्लाउज घातलेला आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. फोटो पाहिल्यानंतर लोकांनी मला इतकं ट्रोल केलं की, बातमी न्यूजपेपरमध्ये देखील छापून आलेली. त्या फोटोमध्ये काहीच नव्हतं. काही असतं आणि ट्रोल केलं असतं, तर काही हरकत नव्हती. पण तरी देखील मला ट्रोल करण्यात आलं.
‘चांगलं बोलायचं असेल तर वेलकम. घाणेरडं बोलायचं असेल तर येऊच नका. मी काय खायचं, काय घालायचं.. हे मला अनोळखी लोकांनी सांगण्याची काहीही गरज नाही. मला बोलण्याचा अधिकार मी फक्त माझ्या कुटुंबियांना दिला आहे.’
पण एकाही नकारात्मक कमेंटला उत्तर दिलं नाही. मी माझी शक्ती अशी का खर्च करू? ट्रोलिंगचं प्रमाण फार वाढलं आहे. मी आता ट्रोल करणाऱ्यांना हाईड करते, नाही तर त्या व्यक्तीला ब्लॉक करते.
- स्पृहा जोशी,
अभिनेत्री