नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि वाढत्या खड्ड्यांच्या समस्या पाहता आज नाशिक येथे जाऊन पेगलवाडी त्र्यंबक रोड, अंबड सातपूर लिंक रोड, कॅनडा कॉर्नर परिसर, शरणपूर लिंक रोडची पाहणी केली.
नाशिकमध्ये एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याचे काम सुरु आहे आणि अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. कुठे गॅस पाईपच काम सुरु आहे सांगितलं जात तर कुठे आणखी काही!
ही सगळी कामं देखील कधी सुरु असतात तर कधी ठप्प!
आमचा दौरा सुरू होण्यापूर्वी अचानक रात्री दीड वाजता ऐन पावसात रस्त्यांची डागडुजी सुरू करण्यात आली. सकाळी पहिले तर रस्त्यांची अवस्था पुन्हा पहिल्यासारखीच...
एकूणच अयोध्येतली चंदाचोरी असो, किंवा सिंहस्थ कुंभमेळाच्या निमित्ताने लाडक्या काँट्रॅक्टरच्या खिशांचे खड्डे भरणे असो...
भाजपला जनतेची सर्वसामान्य नागरिकांची काळजी नसल्याचेच दिसून येते!
येत्या सोमवारी, १७ ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये मोर्चा आयोजित केला आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथून नाशिक महानगरपालिकेवर काढण्यात येणाऱ्या ह्या
मोर्चावर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा! पक्षीय तसेच इतर वैचारिक भेदभाव विसरून नाशिकसाठी रस्त्यावर या!
🚨 वन नेशन, वन इमोशन! 🚨
२४ जुलै, शुक्रवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आमच्यासोबत सामील व्हा! दुपारी ४ वाजल्यापासून आपण सर्वजण तिरंग्याखाली एकत्र येऊया आणि सायंकाळी ५ वाजता आपले राष्ट्रगीत गाऊया.
दिल्लीतील अमानुष दडपशाही आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या अटकेच्या निषेधार्थ हे शांततापूर्ण आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. देशासाठी लढणाऱ्या धाडसी तरुणांच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे, हे दाखवून देणे हा ह्यामगचा उद्देश आहे.
जर तुम्ही जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या @Wangchuk66 जी, @abhijeet_dipke आणि इतर आंदोलनकर्त्या तरुणांच्या पाठीशी असाल, तर नक्की या. तसेच, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर खासदारांना आंदोलन करताना ज्या प्रकारे ताब्यात घेण्यात आले, त्या हुकूमशाहीच्या विरोधात असाल तरी नक्की या. जर हे त्यांच्यासोबत घडू शकते, तर उद्या तुमच्यासोबतही नक्कीच घडू शकते.
त्या आंदोलनातील महिला आणि पुरुषांवर ज्या प्रकारे क्रूर बळाचा वापर करण्यात आला, त्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात असाल तर नक्की या.
हे सर्व देशप्रेमींचे शांततापूर्ण आंदोलन आहे. जागृत झालेल्या देशासाठी, हातात तिरंगा घेऊन एकत्र येऊन राष्ट्रगीत गाण्यासाठी.
देशभक्ती आणि देशावरचे प्रेम म्हणजेचं, जे अयोग्य आहे त्याविरोधात प्रश्न विचारणं... सत्ताधारी देशाची सेवा करण्यात वा प्रशासन चालवण्यात अपयशी ठरतात तेव्हा त्यांना त्याबद्दल जबाबदार धरणं!
सर्व नागरिक, सर्व राजकीय पक्ष आणि विचारसरणीच्या लोकांनी (कोणत्याही पक्षीय झेंड्याशिवाय) आणि आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य उज्ज्वल असावे, चांगले असावे; असे ज्यांना ज्यांना वाटते अशा सर्वांना आमचे आग्रहाचे निमंत्रण आहे.
सर्व विचारसरणीच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांचा एकच आवाज.
नक्की या!
जय हिंद! जय महाराष्ट्र! वंदे मातरम!
While the government has made the necessary amendment as per our constant demand to the Act of redevelopment for cess and paghdi properties, the case is still due for hearing on the 20th of this month.
I have urged the @CMOMaharashtra to ensure that all necessary legal representatives be present.
For all the tenants
⚠️ The amendment has been made, but case is still to be heard.
⚠️ Our demand still is that all eviction notices be stopped immediately
⚠️ Don’t leave your homes, only due to the pressure of the landlord until the government registers you as a tenant.
आज परभणीत पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या सभेस उपस्थित जनसागर आणि शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ही साक्ष आहे; स्वार्थाच्या आणि पैशाच्या मोहापायी पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही.
लढा सुरु झालाय...
गद्दारांच्या राजकारणाचा अंत निश्चित आहे!
A gentle reminder to the Government of Maharashtra: Had they not scrapped the Desalination Plant project in Manori, initiated by us, by now Mumbai wouldn’t need water cuts.
While Mindhe’s illegal government scrapped our project, the new bjp government has approved Gargai Dam- which not only cuts more than 5,00,000 trees in a wildlife sanctuary, but keeps the city of Mumbai monsoon dependent.
And while Maharashtra has no drinking water, the parties in government forget to govern and only indulge in dirt politics of buying out MPs and pride over the end of democracy.
@Marathi_Rash@DrVidyaDeshmukh ह्यांना इतकी जाणीव असती तर असे वागतील का. जनाची नाही मनाची तर लाज बाळगायला हवी ह्यांनी. माणूस किती निच पातळीवर जाऊ शकतो ह्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. सध्या सर्वत्र विवेक बुद्धीचा सत्यानाश झाला आहे.
अन्यायाच्या काळोखाला भेदून, ६ जून १६७४ रोजी रायगडावर एका स्वतंत्र, सार्वभौम 'शिवराज्याचा' सूर्योदय झाला, तो केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता, तर स्वातंत्र्याचा सुवर्णक्षण होता!
आज शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा!
तमाम शिवप्रेमींना शिवराज्याभिषेक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!