गट क पूर्व परीक्षा तारखांवर तारखा देणाऱ्या MPSC ने एकदा सांगा तरी मुख्य कधी घेणार? निकाल कधी लावणार? नियोजन होणे शक्य नाही हे कसे कळाले नाही आयोगाला? सण असताना निवडणुका पार पडतात ना? परीक्षा घ्यायलाच कुठे अडचण उद्भवते यांना? @mpsc_office@Mpsc_Andolan@RahulAsks@TV9
राहुल सर, तुम्ही बोलत होतात सचिवांनी दिलेल्या मुलाखतीत पारदर्शकता आणि वेगवान परीक्षा पद्धती बद्दल. 3 महिन्यात गट क परीक्षा पार पाडणार म्हणणाऱ्यांना सचिवांना एकदा विचारा तरी 6 महिने केवळ पूर्व परीक्षा घेण्यासाठी लागत असतील तर मुख्य कधी घेणार? त्याचा निकाल कधी लावणार?
@RahulAsks
गट क 2026 6 महिन्यात निकाल लागून बाहेर पडू या आशेवर असणाऱ्या उमेदवारांचा जरा सुद्धा विचार केला नाही? जाणारा वेळ आणि वर्ष याची AC त बसून निर्णय घेणाऱ्यांना काय कळणार म्हणा. एका परीक्षेच्या प्रोसेस मध्ये 2 ते 3 वर्षे खर्ची पाडत आहेत हे.
@mpsc_office@TV9Marathi@rahul
गट क पुर्व 2026 तारीख
📌12 जुलै
📌27 सप्टेंबर
📌25 ऑक्टोबर
📌3 जानेवारी
10-15 दिवस परीक्षा पुढे गेली असती तर समजू शकत होतो पण या तारखांवर तारखा देत चाललेय. मग आधीच नियोजन होईल की नाही हे न बघता झोपेत तारखेची घोषणा करत होते का? @mpsc_office@Mpsc_Andolan@RahulAsks
राज्यसेवा म्हणजेच गट अ & ब संवर्ग परीक्षा 9 महिन्यात प्रोसेस पूर्ण करणार, गट ब 6 महिन्यात आणि गट क 3 महिन्यात असे मीडिया ला मुलाखती देणारे सचिव नेमके कुठे जाऊन बसले आता? 6 महिने लागतात यांना गट क पूर्व परीक्षा घ्यायला? #MPSC@mpsc_office@RahulAsks@TV9Marathi@LoksattaLive
प्रशासकीय तानामुळे परीक्षा दहा दिवस पुढे जाऊ शकते दोन महिने पुढे ढकलायची विद्यार्थ्यांचा वेळ वाया घालवायचा हे काम आयोगाने करू नये. लवकरात लवकर पूर्व व मुख्य परीक्षेचा नवीन तारखा जाहीर करावेत.
विद्यार्थी बंधू-भगिनींनो तयारीला लागा…
सोमवारी तुमच्या हक्काच्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा….
आज रस्त्यावर उतरला नाही तर कायम रस्त्यावर रहावं लागेल आणि घोटाळे करणारे महत्त्वाच्या पदांवर जाऊन तुमच्या डोक्यावर बसतील.
म्हणूनच जिंकण्यासाठी हक्काचा लढा लढू आणि न्याय मिळवू…!
#विद्यार्थी_हक्काचा_लढा
"Beauty isn’t about a face, a flower, or perfection—it’s about the heart and soul you fall in love with. I didn’t fall for an image; I fell for your soul. Distance or doubts will never change that, because my world isn't built on how you look, but on who you are to me."
प्रति,
मा. अध्यक्ष,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
मुंबई.
विषय : महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ नियोजित तारखेलाच, म्हणजे २५ ऑक्टोबर २०२६ रोजी घेण्याच्या परीक्षार्थींच्या मागणीबाबत.
महोदय,
महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या वतीने तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या माध्यमातून आपणांस या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष वेधू इच्छितो.
सध्या सामाजिक माध्यमांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नावाने एक पत्रक प्रसारित होत आहे. सदर पत्रकाची अधिकृतता अद्याप स्पष्ट झालेली नसली, तरी त्यामध्ये "२५ ऑक्टोबर २०२६ रोजी नियोजित महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही २७ डिसेंबर २०२६ पर्यंत पुढे ढकलण्याबाबत विचार सुरू असल्याचे" नमूद असल्याचे दिसून येते. सण-उत्सवांच्या कालावधीत प्रशासन व पोलिस यंत्रणेवर येणारा ताण तसेच वाहतूक व्यवस्थेच्या संभाव्य अडचणींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीचा विचार होत असल्याचेही त्यामध्ये नमूद आहे. या पार्श्वभूमीवर, सदर परीक्षा पुढे ढकलण्याचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी लाखो उमेदवारांच्या "शैक्षणिक, मानसिक आणि आर्थिक हिताचा तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सर्वंकष आणि संवेदनशीलपणे विचार" करण्यात यावा, हि विनंती.
परीक्षा दोन महिने पुढे ढकलल्यास उमेदवारांवर पुढील गंभीर परिणाम होऊ शकतात :
१. अभ्यासाचे नियोजन व मानसिक ताण :
उमेदवारांनी मागील अनेक महिन्यांपासून २५ ऑक्टोबर ही निर्धारित तारीख लक्षात घेऊन आपले अभ्यासाचे नियोजन केले आहे. अंतिम टप्प्यातील पुनरावृत्ती, सराव परीक्षा आणि वेळेचे नियोजन यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. अचानक परीक्षा पुढे ढकलल्यास या नियोजनावर परिणाम होऊन उमेदवारांवर अनावश्यक मानसिक ताण निर्माण होऊ शकतो.
२. विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार :
महाराष्ट्राच्या ग्रामीण व दुर्गम भागातून शहरांमध्ये येऊन अभ्यास करणारे हजारो विद्यार्थी भाड्याच्या खोल्या, वसतिगृहे, मेस आणि ग्रंथालयांचा खर्च सहन करत आहेत. परीक्षा दोन महिने पुढे गेल्यास त्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागेल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांसाठी हा प्रश्न अधिक गंभीर आहे.
३. संपूर्ण भरती प्रक्रियेला विलंब :
पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यास त्यानंतरची मुख्य परीक्षा, निकाल, कागदपत्र पडताळणी आणि अंतिम नियुक्ती या संपूर्ण प्रक्रियेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच विविध भरती प्रक्रियांमध्ये विलंबाचा सामना करणाऱ्या उमेदवारांसाठी हा आणखी एक अन्यायकारक विलंब ठरू शकतो. विशेषतः वयोमर्यादेच्या उंबरठ्यावर असलेल्या उमेदवारांच्या संधींवर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
४. प्रशासनाच्या नियोजनातून परीक्षा घेणे शक्य :
महाराष्ट्र प्रशासन आणि पोलिस यंत्रणेला मोठ्या सण-उत्सवांच्या काळातही विविध स्पर्धा परीक्षा व मोठ्या प्रमाणातील परीक्षा केंद्रांवरील व्यवस्था हाताळण्याचा अनुभव आहे. जिल्हानिहाय केंद्रांचे नियोजन, वाहतूक व्यवस्थापन, अतिरिक्त मनुष्यबळ आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय यांच्या माध्यमातून ही परीक्षा नियोजित दिवशी सुरळीतपणे घेणे शक्य आहे, असा आम्हाला विश्वास आहे.
त्यामुळे केवळ प्रशासकीय सोयीच्या कारणास्तव लाखो उमेदवारांच्या भविष्यावर परिणाम करणारा निर्णय घेऊ नये, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. उमेदवारांच्या अडचणींचा विचार करून प्रशासनाने परीक्षा पुढे ढकलण्याऐवजी आवश्यक त्या पर्यायी व्यवस्थांवर भर द्यावा. तसेच, आगामी "Video Conference" मध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना प्रशासकीय अडचणींसोबतच "लाखो विद्यार्थ्यांची भूमिका, त्यांच्या मागण्या, मानसिक व आर्थिक परिस्थिती आणि त्यांच्या भवितव्यावर होणारा परिणाम यांचाही गांभीर्याने विचार करण्यात यावा", अशी विनंती आहे.
"विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मागण्यांचा योग्य आणि सहानुभूतीपूर्वक विचार करून, त्यांच्या हिताला प्राधान्य देणारा योग्य निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घ्यावा", ही आमची अपेक्षा आहे. जिल्हानिहाय येणाऱ्या अडचणींचे निराकरण परीक्षा पुढे ढकलण्याऐवजी प्रभावी प्रशासनिक नियोजन आणि स्थानिक यंत्रणांशी समन्वयातून करण्याचा प्रयत्न व्हावा. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हा विषय गांभीर्याने पाठपुरावा करीत राहील. विद्यार्थ्यांची मेहनत, त्यांचा वेळ आणि त्यांच्या भवितव्याचा आदर करणे ही शासन व आयोगाची सामूहिक जबाबदारी आहे.
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ अनावश्यकपणे पुढे ढकलू नये आणि ती पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार २५ ऑक्टोबर २०२६ रोजीच घेण्यात यावी या विद्यार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक, संवेदनशील आणि न्याय्य विचार करून योग्य निर्णय घ्यावा.
उमेदवारांच्या हिताचा विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, ही अपेक्षा.
आपला विश्वासू,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकरिता,
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस तथा अध्यक्ष : रोजगार व स्वयंरोजगार विभाग
@bhimanwar@mpsc_office@INCMaharashtra@CMOMaharashtra
गावाहून शहरात येऊन, मेसचे पैसे भरून, अहोरात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळणे थांबवा! परीक्षा पुढे ढकलल्याने फक्त तारीख बदलत नाही, तर संपूर्ण शैक्षणिक आणि मानसिक नियोजन कोलमडतं. प्रशासनाने आपली ढिसाळ व्यवस्था सुधारावी, परीक्षा २५ ऑक्टोबरलाच घ्यावी! @mpsc_office
परीक्षा जाहीर करतानाच सण-उत्सव आणि प्रशासकीय नियोजन का लक्षात येत नाही?
आधीच उशिरा होणारी परीक्षा २०२७ पर्यंत ओढून विद्यार्थ्यांवर दडपण का आणताय?
दर वेळी परीक्षा पुढे ढकलणे हाच एकमेव सोपा मार्ग उरलाय का?
प्रशासकीय मार्ग शोधा, परीक्षा वेळेतच झाली पाहिजे! @mpsc_office#MPSC
तारीख देण्यापूर्वी नियोजन का शून्य असते? दर वेळी परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणे थांबवा. अभ्यासाचे नियोजन, आर्थिक भार आणि वाढते दडपण याला जबाबदार कोण? @mpsc_office प्रशासकीय अडचणींवर पर्याय शोधा, पण परीक्षा २५ ऑक्टोबरलाच झाली पाहिजे. #MPSC#ExamOnTime
परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याच्या व्हायरल पत्राने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम आहे.
आधीच उशिरा होणारी परीक्षा २०२७ मध्ये ढकलल्यास मानसिक/सामाजिक दडपण वाढेल.
वारंवार वेळापत्रक बदलल्याने विद्यार्थ्यांचा त्रास वाढतोय. प्रशासकीय मार्ग शोधून परीक्षा २५ ऑक्टोबरलाच घ्या! @mpsc_office