गट ब पूर्व 2026 साठी SR पदाचे मागणीपत्रक आयोगाला प्राप्त झाले होते पण काही तांत्रिक कारणाने ते परत पाठवल्याची चर्चा आहे.
त्या जागा add करूनच पूर्व परीक्षेचा निकाल विद्यार्थिप्रिय आयोग लावेल,
जेणेकरून विद्यार्थ्यांचे वर्षे वाया जाणार नाही,
अशी खात्री आहे
@bhimanwar@mpsc_office
शेवटची objective परीक्षा असल्याने नैसर्गिक न्यायाच्या तत्वाने सर्वांना समान संधी मिळणे गरजेचे.
गेल्या 2- 3 पूर्व आणि मुख्य परीक्षेमधला कालावधी बघता यावेळी सुद्धा किमान 90 दिवस हे अंतर असणे सर्व परीक्षार्थ्यांच्या हिताचे!
@mpsc_office#राज्यसेवा_postpone#combine_जागावाढ
@mpsc_office विद्यार्थिकेंद्रित आयोगाला स्थापना दिनाच्या शुभेच्छा!💐💐
2013 पासून पारदर्शकतेमुळे जी विश्वासार्हता कमावली ती इथून पुढेही आयोग कायम ठेवेल तसेच गेल्या 2-3 वर्षात कारभारात आलेली मर्गळता दूर करून इथून पुढे सर्व कारभार सुरळीत पार पडेल, अशी खात्री आहे!
@AbhiPawarBJP सद्या राज्यसेवेचा एकच पेपर descriptive आहे.त्यांच्या #RTI_Copy आपण बघीतल्या तर marking देण्याची पद्धत किती बिकट आहे हे आपणाला कळेल..त्यामुळे संपूर्ण मुख्य परीक्षा descriptive असल्यावरची भयावह स्थिती अकल्पनीय!
@BaliramDoleyINC
28 तारखेला बीएमसीच्या जाचक अटींविरोधात विद्यार्थी शिष्टमंडळाने माझी भेट घेतली होती. काँग्रेसचे वरिष्ठ नेते देखील या विषयावर लक्ष देत असून, या संदर्भात मा.भूषण गगराणी सरांपर्यंत हा मुद्दा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
सर्व बाजूंनी सातत्याने प्रयत्न करूनही बीएमसी ऐकण्यास तयार नाही, यावरून त्यांचा काय हेतू आहे हे समजणे कठीण आहे. सामान्य कुटुंबातील त��ुण अनेकदा दहावी-बारावीनंतर गॅप घेऊन काम करत शिक्षण पूर्ण करतात. त्यांच्या मार्गात विनाकारण अटी घालण्यात काहीही अर्थ नाही. मात्र, जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात असल्याचे दिसत आहे.
माननीय आयुक्तांनी या विषयावर अधिक न्याय्य निर्णय घ्यावेत, अशी आमची विनंती आहे.
@mybmc @CMOMaharashtra
@NANA_PATOLE
@AdvYashomatiINC
@Dhananjay_AAP
#BMC #StudentsMovement #FightForJustice #YouthEmpowerment #LeadershipInAction #InspirationForAll #StudentRights #StandForTruth
Combine मधील इतर 3 पदांपासून PSI पदाची प्रक्रिया वेगळी करावी,फक्त एवढीच विद्यार्थ्य���ंची मागणी आहे,
अभ्यासक्रम 4 ही पदांसाठी सारखाच असावा जसा 2023 च्या परीक्षा पद्धतीमध्ये आहे.
#MPSC
@mpsc_office
@AbhiPawarBJP काही वेळा व्यापक जनहित डावलले जात असेल तर विद्यार्थ्यांनाही पर्याय उरत नाही.शेवटी लोकशाहीत लोक च सर्वस्वी आहे..
माननीय आयोग नेहमीच विद्यार्थीप्रिय राहिला आहे आणि इथून पुढेही राहील अशी खात्री आहे,
आणि पारदर्शकते बाबतीतही #MPSC आयोग देशात सर्वोच्च स्थानी आहे यात शंका नाही.
#MPSC आंदोलन तिसरा दिवस
मित्रांनो...
👉गेल्या काही दिवसापासून अविरत सुरु असलेला लढा अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे.
हजारो योद्धे गेल्या दोन दिवसापासून आंदोलनस्थळी तळ ठोकून आहेत.खूप दुदैव आहे महाराष्ट्रासारख्याराज्यात अभ्यास सोडून विद्यार्थ्यांना असे रस्त्यावर आंदोलन करत आहेत.
👉मा. @mieknathshinde साहेब या लाखो उमेदवारांतर्फे परत एकदा नम्र विनंती करतोय, यांच्या आर्त हाका ���का.
त्यांचा आक्रोश,तीव्र संताप आपल्यापर्यंत पोहोचला आहेच.
करोडो रुपये,निधी किंवा लाभाचे काहीही मागत नाहीत.फक्त त्यांचा परीक्षा देण्याचा हक्क व त्या जागा /ती पदे त्यांना हवी आहेत.
सरकारचे ते कर्तव्य व सोबत जबाबदारी देखील आहे.
कल्याणकारी राज्यात हक्कच मिळत नसतील तर त्याचा उपयोग काय????
👉प्रमुख मागण्या
1.#MPSC & IBPS exam dates Overlapping issue 25th August
2.#MPSC कृषी 2024 258 जागा
��ियोजित महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 मध्येच समाविष्ट करण्यात याव्या
3.#MPSC राज्यसेवा 2024
जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या राज्यसेवा जाहिरातीत
उपजिल्हाधिकारी,तहसीलदार, पोलीस उपाधीक्षक, मुख्याधिकारी,शिक्षण अधिकारी सह सर्व 35 संवर्गाची किमान 1500 जागा मागणीपत्रक तात्काळ मा.आयोगाकडे पाठवण्यात यावे.
गेल्या 9 महिन्यापासून याची सातत्याने
मागणी हे उमेदवार करत आहेत हे आपण
जाणताच.
4.#MPSC ��ंयुक्त अराजपत्रित गट ब व गट क जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी.
7 महिने शासनाकडून उशीर झाला आहे.
याची गंभीर दखल घेण्यात यावी
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mpsc_office
@Drsuvarnas
@NANA_PATOLE
@ssaunik
महाराष्ट्रातील हजारो गोरगरीब #MPSC उमेदवार दोन दिवसापासून पुण्यात आंदोलनाला बसले आहेत.
पण @mieknathshinde सरकारला त्याचे काहीही सोयरसुतक नाही.���हायुती सरकारने गोरगरीब लेकरांच्या आयुष्याचा खेळखंडोबा तर केलाच वरून तमाशा बघत त्याचा आनंद लुटत आहेत
👉 सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणीना सांगणे आहे पूर्ण काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत आहे.
आंदोलनस्थळी बसलेल्या काही विद्यार्थी मित्रांसोबत आज दुपारी फोनवर संवाद झाला.
👉उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत दुपारीच बोललो.त्यांनी यासंदर्भात काम करण्याचे आश्वासन दिले.
तस��च मी पुणे पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क करून आंदोलनाला सहकार्य करण्यास सांगितले.पोलीस प्रशासनाने आपल्याला सहकार्य केले आहेच.
👉महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची टीम तुमच्यासोबत आंदोलनस्थळी पहिल्या मिनिटापासून आहे हे आपल्याला माहित आहेच.तुम्हाला न्याय मिळेपर्यंत ते सर्व तुमच्यासोबतच असतील.
झोपेचे सोंग घेतलेलं सरकार व #MPSC
यांना आपली दखल घ्यावीच लागेल.
@mieknathshinde
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mpsc_office
@Drsuvarnas
@ssaunik
@BaliramDoleyINC
मा. @mieknathshinde साहेब
शेवटी रस्त्यावर उतरावे लागलंच
🔶गेले कित्येक महिने लाखो बेरोजगारांच्या मागण्या आपल्याकडे नम्रपणे मांडत होतो,पण झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला त्यात काडीचा रस नव्हता.
गेल्या 16 तासापासून #MPSC उमेदवारांच्या मनातील तीव्र असंतोष,रोष आपण
अहिल्यादेवी अभ्यासिका समोर,पुणे येथे पाहिला असेलच.
आज काय तो
एकदाचा सोक्षमोक्ष झालाच पाहिजे.
प्रमुख मागण्या
🔶1. IBPS & MPSC exam dates overlapping issue
25 august
🔶 2. #MPSC कृषी च्या 258 जागा
महाराष्ट्र नागरी सेवा र���जपत्रित 2024 मध्येच तात्काळ समाविष्ट करण्यात याव्यात
🔶3. #MPSC च्या जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या राज्यसेवा परीक्षेत सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागांचे
सर्वसमावेशक मागणीपत्रक तात्काळ
पाठवण्यात यावे.
उपजिल्हाधिकारी,
पोलीस उपाधीक्षक,मुख्याधिकारी सह सर्व महत्वाच्या संवर्गाचा समावेश करण्यात यावा.
गेल्या 9 महिन्यापासून हे उमेदवार विनवण्या करत आहेत,पण आपण त्यांच्यावर अक्षरशः सूड उगवत आहात.
🔶4. #MPSC ची संयुक्त अराजपत्रित
गट-ब् व गट -क जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी.
फेब्रुवारी त नियोजित असणारी जाहिरात ऑगस्ट संपत आला तरी प्रसिद्ध झाली नाही.
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mpsc_office
@Drsuvarnas
@ssaunik
@NANA_PATOLE
@dhananjay_munde
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा येत्या २५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. परंतु त्याच दिवशी ‘आयबीपीएस’ची देखील ��रीक्षा ठेवली आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे अनेक उमेदवारांना कोणत्या तरी एका परीक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे. वर्षानुवर्षे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांवर हे अन्याय केल्यासारखे होईल. यासंदर्भात गेली काही दिवसांपासून हे सर्वजण विविध माध्यमांतून शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु शासनाने त्यांच्याकडे योग्य ते लक्ष दिलेले नाही. यामुळे हे सर्व विद्यार्थी काल रात्रीपासून पुण्यात आंदोलन करीत आहेत. त्यातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र कृषि सेवा गट अ, ब, आणि ब (कनिष्ठ) संवर्गासाठी दोन-तीन दिवसांत जाहिरात प्रकाशित करण्यात येऊन सदर पदांसाठी ऑक्टोबरमध्ये परिक्षा घेण्यासंदर्भातील ट्विट केले आहे. जर हि परिक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार असेल तर कृषी विभागाची पदे राज्यसेवा परीक्षेमध्ये समाविष्ट करून ऑक्टोबर मध्ये एकत्रित सर्वसामवेशक राज्यसेवा परिक्षा घेता येणे शक्य आहे, व तेच तांत्रिकदृष्ट्या योग्य राहील असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. असे केल्यास विद्यार्थ्यां��ा दोन्ही परीक्षा देता येतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा योजनेचा संदर्भ घेतला तर त्यांचे हे म्हणणे बरोबर देखील आहे. तरी मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की, या विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून कृपया त्यांची दखल घ्यावी आणि त्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला योग्य ते निर्देश देऊन तातडीने त्यासंदर्भात���ल परिपत्रक जाहिर करावे.
@CMOMaharashtra @mpsc_office
तरुण परिक्षेची तैयारी करण्याकरिता अभ्यासिकेत असण्याएवजी रस्त्यावर आणलेत.रोडवर आणून ठेवलाय महाराष्ट्र माझा.
कृषी अधिकाऱ्यांच्या २५८ जागा MPSC च्या आडमुठया धोरणामुळे २५ तारखेचया परिक्षेपासून वंचित ठेवताय हे योग्य नाही.@NANA_PATOLE#MPSC@mieknathshinde@Dev_Fadnavis