बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान, जंगल सफारी, मराठा आंदोलन यांसह विविध विषयांवर माध्यमांशी संवाद...
( नागपूर | 30-8-2026)
#Maharashtra#Nagpur
Transforming Gorewada into Vidarbha’s Wildlife and Tourism Hub
Chaired a review meeting today on the ongoing work and future development of the Balasaheb Thackeray Gorewada International Zoological Park in Nagpur. Reviewed the progress of the African Safari, including the infrastructure and key works required for its launch. Directed the concerned officials to set clear deadlines for the remaining works and accelerate its execution to ensure the project is completed as planned.
While works regarding the Wildlife Rescue Centre, Indian Safari and Entrance Plaza were completed in 2021, the next phase will include major attractions such as the Walking Trail, African Safari, Safari Plaza, Animal Hospital, Quarantine Block, Trail of Senses, Biopark, Night Zoo, Gondwana Park, Bio-Discovery Plaza and Tribal Trail. Directed to speed up works regarding the proposed African Safari.
By developing diverse attractions and strengthening connections between this zoological park and surrounding national parks, Gorewada can emerge as a leading tourism destination that showcases Vidarbha’s rich wildlife and natural beauty while offering visitors a world-class experience.
Minister Ganesh Naik ji and senior officials were present.
@NaikSpeaks@wildgorewada
#Maharashtra #Nagpur #WildlifeConservation
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे विजय पोतदार यांनी मुख्यमंत्री सहाय���यता निधीमध्ये ₹1,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting regarding the works at the Balasaheb Thackeray Gorewada International Zoological Park.
Minister Ganesh Naik and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या कामांसंदर्भात आढावा बैठक.
यावेळी मंत्री गणेश नाईक व वरिष्ठ अधिकार��� उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में बालासाहेब ठाकरे गोरेवाडा अंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान के कार्यों के संदर्भ में समीक्षा बैठक।
इस अवसर पर मंत्री गणेश नाईक एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕐1pm | 30-8-2026📍Nagpur | दु. १ वा. | ३०-८-२०२६📍नागपूर.
@Dev_Fadnavis @NaikSpeaks @wildgorewada
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #WildlifeConservation
गोरेवाड्याला जागतिक दर्जाचे वन्यजीव पर्यटन केंद्र बनविण्याचा संकल्प!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर येथे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या कामांसंदर्भात आढावा बैठक पार पडली.
बाळासा��ेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोरेवाडा प्रकल्पाची पाहणी करून विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. आफ्रिकन सफारी सुरू करण्यासाठी करण्यात येत असलेल्या कामांची सद्यस्थिती, प्रकल्पाची प्रगती आणि सफारी सुरू करण्याचे अपेक्षित वेळापत्रक याबाबत माहिती जाणून घेतली. गोरेवाड्यात सुरू असलेल्य��� सर्व कामांसाठी निश्चित कालमर्यादा ठरवून त्यानुसार कामांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
आफ्रिकन सफारी हा गोरेवाडा प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि अन्य कामांची पूर्तता कोणत्या टप्प्यावर आहे, याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती जाणून घेतली आणि आफ्रिकन सफारी सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली क��मे नि��्चित करून त्यांची पूर्तता कालबद्ध पद्धतीने करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले.
गोरेवाडा प्रकल्पाचा पहिला टप्पा 2021 मध्ये पूर्ण करण्यात आला असून या टप्प्यात वाइल्डलाइफ रेस्क्यू सेंटर, इंडियन सफारी आणि एंट्रन्स प्लाझा यांचा समावेश आहे. यानंतर आता गोरेवाडा प्रकल्पाच्या पुढील विकासासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात विविध सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. आफ्रिकन सफारीसह महत्त्वाची ��ामे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट आहेत. वॉकिंग ट्रेल, आफ्रिकन सफारी, सफारी प्लाझा, ॲनिमल हॉस्पिटल आणि क्वारंटाईन ब्लॉक यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यातील आफ्रिकन सफारीच्या कामाच्या प्रगतीबाबत माहिती जाणून घेतली. यासह सफारी सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कामे, त्यांची सद्यस्थिती आणि पुढील नियोजन यांचाही आढावा घेतला आणि आफ्रिकन सफारीच्या कामाला गती देण्याचे ���िर्देश दिले.
प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात ट्रेल ऑफ सेन्सेस, बायोपार्क, नाईट झू, गोंडवाना पार्क, बायो डिस्कव्हरी प्लाझा आणि ट्रायबल ट्रेल यांचा समावेश आहे. या विविध सुविधांच्या माध्यमातून गोरेवाडा प्रकल्पाचा वन्यजीव पर्यटनासोबतच जैवविविधता, निसर्ग आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव देणारे महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याची संकल्पना मांडण्यात आली. प्रकल्पाच्या पुढील विकासासाठी अनुभवी आणि सक्षम सल्लागाराची नियुक्ती करावी, गोरेवाड्याचा विकास करताना दीर्घकालीन पर्यटनाच्या गरजा लक्षात घेऊन नियोजन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
ताडोबा आणि पेंच येथे येणाऱ्या पर्यटकांनी गोरेवाड्यात 1 ते 2 दिवस पर्यटनासाठी घालवावेत, या दृष्टीने गो���ेवाड्याचा विकास करावा. ताडोबा आणि गोरेवाडा या दोन्ही पर्यटनस्थळांना जोडणारे प्रभावी नियोजन करून पर्यटकांचा मुक्काम वाढेल, अशा पद्धतीने सुविधा विकसित कराव्यात. गोरेवाडा प्रकल्पात वन्यजीव पर्यटनासोबत पर्यटकांना विविध अनुभव देणाऱ्या सुविधा विकसित करून विदर्भातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून गोरेवाड्याची ओळख निर्माण करण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस य��ंनी दिले.
गोरेवाडा प्राणी उद्यानाची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पाहणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रकल्पातील विविध सुविधांची आणि सुरू असलेल्या कामांची माहिती जाणून घेत प्रकल्पाच्या पुढील विकासासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी मंत्र��� गणेश नाईक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @NaikSpeaks @wildgorewada
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #WildlifeConservation
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज रामगिरी निवासस्थान, नागपूर येथे विविध ठिकाणांहून आलेल्या बहिणींनी राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रेम आणि जिव्हाळ्यासाठी सर्व लाडक्या बहिणींचे आभार मानले.
@Dev_Fadnavis#Maharashtra#DevendraFadnavis #Nagpur
शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते डॉ. श्रीपाद ढेकणे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
विद्यार्थी चळवळीपासून सार्वजनिक जीवनाला सुरुवात करत त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ��ाध्यमातून विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या. पुढे प्राध्यापक म्हणून अध्यापन क्षेत्रात योगदान दिले. शिक्षण मंत्रालयात आणि मुख्यमंत्री कार्यालयात विशेष अधिकारी म्हणून कार्यरत असताना राष्ट्रीय शिक्षण धोरणाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शिक्षण क्षेत्रातील विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.
त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्र आणि सार्वजनिक जीवनातील एक समर्पित, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
ॐ शांती 🙏