आदरणीय शरद पवार साहेबांसमोर एक महिला आपलं निवेदन मांडत होती. साहेब केवळ तिचं म्हणणं ऐकत नव्हते, तर प्रत्येक मुद्दा लक्षपूर्वक समजून घेत होते. जिथे काही चूक जाणवली, तिथे तिला थांबवून योग्य दुरुस्तीही सांगत होते.
हे केवळ उत्तम स्मरणशक्तीचं उदाहरण नाही;
ही आहे दशकानुदशकांच्या राजकीय आणि सामाजिक अनुभवातून आलेली विषयाची जाण.
वयाच्या या टप्प्यावरही प्रत्येक शब्दाकडे इतक्या बारकाईने लक्ष देणारा नेता पाहिला की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते
नेतृत्वाचं वय वाढतं,
पण विचारांची धार कधीच बोथट होत नाही!
शरद पवार साहेब म्हणजे
अनुभवाचं विद्यापीठ,
स्मरणशक्तीचा ठेवा
आणि नव्या पिढीचं म्हणणं शांतपणे ऐकण्याची विलक्षण ताकद.
@PawarSpeaks #SharadPawar #Saheb
देशातील काही राज्यांमध्ये ज्याप्रमाणे एसआयआर प्रक्रिया राबवली जात आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही एसआयआर राबवली जात आहे. सामान्य मतदारांना मॅपिंग व इन्यूमरेन्शन भरण्याची शेवटची तारीख ही १७ ऑगस्ट आहे.
बुधवारी निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे की आतापर्यंत १८% मतदारांची प्रपत्रे जमा झालेली नाहीत. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आपल्या महाराष्ट्रात तब्बल १ कोटी ८० लाख नागरिकांनी अद्याप या प्रक्रियेत सहभाग नोंदवलेला नाही. आता फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहे.
माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे. या प्रक्रियेत खुप अडचणी आल्या. अनेक ठिकाणी लोकांना प्रक्रिया समजली नाही, अनेक ठिकाणी BLO यांनाही ही प्रक्रिया पूर्णपणे ज्ञात नव्हती. ग्रामीण भागातील परिस्थिती तर आणखी बिकट होती.
भारतीय संविधानाने या देशातील नागरिकांना मताचा अमूल्य अधिकार दिला आहे. त्यांचा अधिकार अबाधित रहावा, कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने एस आय आर प्रक्रियेसाठी आणखी एकदा मुदतवाढ द्यावी
@ECISVEEP #SIR #ElectionCommisssion
मी याधीही म्हणाले होते की आपली येणारी पिढी ही जास्त सजग आहे. त्यांना कोणीही मूर्ख बनवू शकत नाही. मागील काही दिवसांपासून प्रत्येक पातळीवर ही मुलं सरकारला त्यांच्या जबाबदाऱ्या दाखवून देत आहे.
मागे रायगड जिल्ह्याच्या व्हिडिओ आला होता. आज त्र्यंबकेश्वरमधून व्हिडिओ आला आहे...
या मुलांना 'आम्ही अटल सेतू बांधला', 'आम्ही समृद्धी महामार्ग बांधला', 'आम्ही मिसिंग लिंक बांधला' असं सांगून खोटा 'विकास' दाखवण्याचे धाडस अजिबात करू नये !
माझ्या गावात एसटी का येत नाही, एसटी शाळेपर्यंत जाण्यासाठी योग्य रस्ता का नाही? असा प्रतिप्रश्न ते करतील आणि सरकारचा 'विकास' इथे उत्तर देऊ शकत नाही...
#genzwithbharat #genzcockroach #genzprotest #GenAlpha
Gen z ने सरकारला नामोहरम करून सोडले आहे. Gen Alpha त्या पुढचे आहेत, हे सरकारने लक्षात घ्यावं.. Gen z ने सरकारच्या तोंडाचे पाणी पळवले आहे, Gen Alpha सरकारला सळो की पळो करून सोडतील.
येणाऱ्या पिढीचा USP हा 'निडरपणा" आहे. रायगडमधील कोंदिवडे गावच्या शाळकरी मुलींचा हा व्हिडीओ त्याचे जिवंत उदाहरण आहे..
शाब्बास पोरींनो मोठ्या मोठ्या पत्रकारांना जे जमले नाही ते तुम्ही करून दाखवले...
रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येईल तेव्हा तुमची भेट नक्की घेईल....
@CMOMaharashtra@mieknathshinde
#Transport #school #chatrokigoonj
आज वाढदिवसानिमित्त आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेबांना मनःपूर्वक शुभेच्छा!
स्पष्टवक्तेपणा, अभ्यासू नेतृत्व, सामाजिक प्रश्नांबाबतची संवेदनशीलता आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याची भूमिका आणि विशेष म्हणजे शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची पताका आपण निर्भिडपणे पुढे घेऊन जात आहात यामुळे असंख्य कार्यकर्त्यांसाठी तुम्ही प्रेरणास्थान आहात.
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेच्या कार्यासाठी अखंड ऊर्जा लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक आणि आपुलकीच्या शुभेच्छा, साहेब! 💐
@Awhadspeaks
बिहारच्या #Bankipur विधानसभा निवडणुकीत #PrashantKishor यांचा झालेला विजयी ही भारतीय जनता पक्षाला चपराक आहे !
ही अशा उन्मादी वृत्तीला चपराक आहे की जी म्हणते की भाजपने कुत्रे मांजरी जरी उभे केले तरी निवडून येईल...
ही अशा अहंकारी वृत्तीला चपराक जी तरुणांच्या शक्तीला कमी लेखते, त्यांना मारहाण करण्यात, धमकावण्यात धन्यता मानते....
ही अशा हिंदूविरोधी वृत्तीला चपराक आहे की ज्यांच्या कार्यकाळात प्रभू श्रीरामांच्या मंदिरातील दानपेटीतून चोरी होते, जे आपल्या अध्यक्षांसमोर मारूतीरायांच्या वेशातील माणसाला भाजपचा झेंडा घेऊन नाचायला सांगतात
ही अशी चपराक आहे जी एका अस्ताची सुरुवात करत आहे !
@PrashantKishor@jansuraajonline #बांकीपुर #बिहार #नितिन_नवीन #प्रशांत_किशोर
लवकर बरे व्हा, रोहितदादा!
तुमची तब्येत बरी नसल्याची बातमी कळली. ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, ही माहिती मिळाली.
ईश्वरचरणी प्रार्थना आहे की तुम्ही लवकर पूर्णपणे बरे व्हावे आणि पूर्वीप्रमाणेच जोमाने जनतेच्या सेवेत पुन्हा सक्रिय व्हावे.
काळजी घ्या दादा... संपूर्ण महाराष्ट्राच्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत.
#getwellsoon @RRPSpeaks
सोशल मीडियावर सध्या भाजपचा नेता विजय चौधरी आणि एका मंत्र्यांची कॉल रेकॉर्डींग व्हायरल होत आहे. गटाराचे झाकन उघडल्यावर घाण ओसंडून वाहते तशी घाणेरडी भाषा या संभाषणातून बाहेर पडत आहे.
आश्चर्य या गोष्टीचं आहे की, आपली हिंदू संस्कृती, भारतीय सभ्यता या विषयांवर आभाळ हाणणाऱ्या पक्षातील नेत्यांची ही भाषा आहे ! इतर पक्षातील महिलांना तर हे बोलतच आहेत पण स्वतःच्या पक्षातील महिलांबद्दल बोलतानाही यांच्या तोंडाला लकवा मारत नाहीये. भारतीय जनता पक्षात काम करणाऱ्या माझ्या महिला भगिनींनी सावध रहावे ! कारण मुखात प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन रावणाची वृत्ती असलेल्या लोकांसोबत तुम्ही काम करत आहात.
सोशल मीडियावर लोक अपशब्द वापरतात म्हणून मागील अधिवेशनात मुख्यमंत्री महोदयांनी अशा लोकांचे कान टोचले होते पण मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपल्या पक्षात असलेल्या 'टपोरींना' संस्काराच्या क्लासेसमध्ये घालावे आणि या विजय चौधरी नामक घाणीचा तर राजीनामा घेऊन चालणार नाही, त्याची थेट हकालपट्टी करावी
@CMOMaharashtra@BJP4Maharashtra@NCPspeaks
#Culture #Maharashtra
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय काय म्हणतात माहितीये का ?
"शेतकऱ्यांना वीज नसली तरी चालेल, पण उद्योजकांना वीजेचा तुटवडा होता कामा नये!"
वाह रे वाह...
पालकमंत्री महोदयांना चांगलं आठवडाभर उपाशी ठेवलं पाहिजे. मग अन्न धान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे महत्त्व त्यांना कळेल !
निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नावाने मते मागायची आणि सत्तेत आल्यानंतर उद्योगपतींच्या मांडीवर जाऊन बसायचे... चांगलंय !
या वक्तव्यातून महायुती सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे. हीच सरकारची शेतकरी शेती विषयीची भूमिका आहे...
@GulabraoRPatil@CMOMaharashtra@mieknathshinde #FarmerProtests #farmerschoice
पेपरफुटीमुळे संपूर्ण देशात वादळ उठले असताना आपल्या महाराष्ट्रात औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटला आहे. हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे.
प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच काही उमेदवारांपर्यंत पोहोचली? मध्यस्थांच्या माध्यमातून व्यवहार झाले? जर हे खरं असेल, तर हा लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर टाकलेला दरोडा आहे.
महाराष्ट्रात एकामागून एक भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. मेहनत करणारा विद्यार्थी आजही रस्त्यावर आहे आणि गैरमार्गाचा अवलंब करणारे पुढे जात आहेत, अशी भावना तरुणांमध्ये निर्माण झाली आहे.
अशा परिस्थितीत शासनाने वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. या प्रकरणाची SIT किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेमार्फत निष्पक्ष चौकशी व्हावी. CDR, आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि संबंधित सर्व बाबींची तपासणी करून दोषींना तात्काळ शिक्षा झालीच पाहिजे.
नाहीतर महाराष्ट्रातही जंतर मंतर झाल्याशिवाय गत्यंतर नाही. विद्यार्थी आणि सरकार आमनेसामने आले तर मग शासनाला ठरवावे लागेल की महाराष्ट्राचा धर्मेंद्र प्रधान कुणाला करायचे
#PaperLeak #DrugInspectorExam #JusticeForStudents #Maharashtra
"रुपया कमजोर नाही, डॉलर मजबूत होत आहे" च्या घवघवीत यशानंतर सर्वश्रेष्ठ अर्थमंत्री निर्मलाअक्का घेऊन आल्या आहेत "पेपर फुटला ते चांगलं झालं, विद्यार्थ्यांना जास्त अभ्यास करण्याचा वेळ मिळाला"
अंधेर नगरी चौपट राजा! असा सगळा कारभार आहे.
माझा निर्मलाअक्कांना एक सल्ला आहे. अर्थात सल्ला देण्याइतकी मी मोठी नाही पण तरी... अक्का, जास्त लोड घेऊन नका, या मुलांच्या नादी तर अजिबात लागू नका कारण हे धर्मेंद्र प्रधान सोडतील आणि तुमच्याच राजीनाम्याची मागणी करतील !
#NirmalaSitaraman #Genz #StudentUnity #JantarMantarprotests #DharmendraPradhanMustResign