देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करणार आहेत. आपण सर्वांनी हा प्रेरणादायी कार्यक्रम नक्की पहावा, ही नम्र विनंती!
#मन_की_बात#MannKiBaat#नरेंद्र_मोदी #NarendraModi #PMModi
@narendramodi@PMOIndia@BJP4Maharashtra
देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी त्यांच्या 'मन की बात' या विशेष कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. उद्या रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता आपण सर्वजण या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन, मा. मोदीजींचे विचार ऐकावेत, ही नम्र विनंती !
#मन_की_बात #MannKiBaat #नरेंद्र_मोदी #NarendraModi #PMModi
@narendramodi@PMOIndia@BJP4Maharashtra@BJP4India
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भारताचा अमूल्य सांस्कृतिक वारसा पुन्हा मायभूमीत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. गेल्या १२ वर्षात चोरीला गेलेल्या ६५० हून अधिक प्राचीन मूर्ती परदेशातून पुन्हा भारतात आणण्यात आल्या आहेत. भारताचा हा अनमोल ठेवा पुन्हा मायभूमीत परतणे, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.
आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ने भारत की अनमोल सांस्कृतिक विरासत को वापस देश में लाने के लिए लगातार प्रयास किए हैं। पिछले 12 वर्षों में विदेशों से 650 से अधिक चोरी हुई प्राचीन मूर्तियों को वापस भारत लाया गया है। ये हर भारतीय के लिए गर्व की बात है।
#NarendraModi #IndianHeritage #CulturalLegacy #India
भारताच्या खात्यात आणखी एक जागतिक विजेतेपद!🏆🇮🇳
भारताचा स्टार स्नूकरपटू पंकज अडवाणी याने 'WBL वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप २०२६' चे विजेतेपद पटकावून भारताचे नाव उंचावले. पंकजच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे २९वे विश्वविजेतेपद आहे.
सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि जिद्द या बळावर पंकजने भारतीय क्रीडा प्रतिभेची श्रेष्ठता पुन्हा एकदा जगाला दाखवून दिली आहे.
पंकज, या देदीप्यमान यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
Heartiest congratulations to Pankaj Advani on clinching his 29th world title at the WBL World Billiards Championship 2026, making India proud once again! 🏆🇮🇳
#PankajAdvani #Billiords #TeamIndia #Cheer4Bharat
ऐलमा पैलमा गणेश देवा,
माझा खेळ मांडू दे, करीन तुझी सेवा
भोंडला म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतील एक सुंदर लोकपरंपरा! आश्विन महिन्यात माता-भगिनींनी एकत्र येत हादग्याभोवती फेर धरून, गाणी गात साजरा केलेला हा उत्सव आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे.
डोंबिवलीतील ब्राह्मण महासंघ आणि डोंबिवलीकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नमो रमो नवरात्री २०२६’च्या प्रांगणात आज 'सखींचा महाभोंडला' संपन्न झाला. काळाच्या ओघात लोप पावत चाललेली ही परंपरा जपण्याचा सुंदर प्रयत्न माता-भगिनींच्या उत्साहातून अनुभवायला मिळाला.
यावेळी लकी ड्रॉच्या मानकरी ठरलेल्या माधुरीताई काळे व नुपरताई घुगरे या भगिनींना पत्नी सुहासी चव्हाण हिच्या शुभहस्ते मानाची पैठणी देण्यात आली. देवीच्या आरतीने या कार्यक्रमाची सांगता झाली.
या सोहळ्याला भाजपा डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्ष प्रियाताई जोशी, नगरसेविका रंजनाताई पेणकर, नगरसेविका रविनाताई म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
#Bhondla #MaharashtraCulture #NamoRamoNavratri2026 #Dombivlikar
थोर स्वातंत्र्यसेनानी, आझाद हिंद सेनेच्या रणरागिणी कॅप्टन लक्ष्मी सहगल यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील ‘झाशीची राणी रेजिमेंट’चे नेतृत्व करत त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय पराक्रम गाजवला. त्यासोबतच महिलांच्या उत्थानासाठीही त्यांनी मोलाचे योगदान दिले.
त्यांचे कार्य, चरित्र व विचार आपल्याला सदैव प्रेरणादायी राहतील.
#CaptainLakshmiSahgal #AzadHindFauj #IndianFreedomStruggle #NariShakti
जग नव्या Order च्या शोधात असताना, भारतातील काही जण मात्र Disorder निर्माण करण्याची स्वप्नं पाहत आहेत. परदेशात जाऊन भारताचं नाव उंचावण्याऐवजी ते देशाची प्रतिमा मलिन करत आहेत.
जब दुनिया नए Order की तलाश में है, तब भारत में कुछ लोग Disorder का सपना देख रहे हैं। ये लोग विदेश जाकर भारत का नाम रोशन करने के बजाय, देश की छवि धूमिल कर रहे हैं।
#NDTVWorldSummit2026 #NarendraModi #BJP4India #BJP4Maharashtra
ज्याचा दर्या त्याचे वैभव, ज्याचे आरमार त्याचा समुद्र
स्वराज्याच्या रक्षणासाठी सागरी सामर्थ्याचे महत्त्व ओळखून सक्षम आरमाराची उभारणी करणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक, भारतीय नौदलाचे जनक वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांस मराठा आरमार दिनानिमित्त कोटी कोटी वंदन!
महाराजांची दूरदृष्टी आणि स्वराज्याच्या सुरक्षेसाठी त्यांनी उभारलेले आरमार नव्या भारताला सदैव प्रेरणा देत राहील.
#मराठा_आरमार_दिन #ChhatrapatiShivajiMaharaj #HindaviSwarajya
शेतकरी कर्जमाफीची चौथी यादी जाहीर झाली असून या यादीत 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांचा समावेश आहे!
मुख्यमंत्री देवाभाऊ शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे!
@Dev_Fadnavis#BJP#Maharashtra
महाराष्ट्रात आज विविध ठिकाणी शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. लोकशाही व्यवस्थेने शिक्षक आणि पदवीधरांना आपल्या प्रतिनिधीची निवड करण्याचा दिलेला हा महत्त्वपूर्ण अधिकार आहे.
शिक्षक समाजाच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावतात, तर पदवीधर आपल्या ज्ञान, कौशल्य आणि कर्तृत्वातून राष्ट्राच्या प्रगतीला बळ देतात. त्यामुळे शिक्षक आणि पदवीधरांचे प्रश्न, अपेक्षा आणि भविष्यातील वाटचालीला योग्य प्रतिनिधित्व मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
त्यामुळे सर्व शिक्षक व पदवीधर मतदार बंधू-भगिनींना नम्र आवाहन आहे की, मतदान केंद्रावर जाऊन लोकशाहीने आपल्याला बहाल केलेला मतदानाचा अमूल्य अधिकार नक्की बजावावा आणि योग्य उमेदवाराची निवड करावी!
#GraduateConstituencyElection #TeachersConstituencyElection #BJP4Maharashtra
जागतिक कुस्तीच्या आखाड्यातील रौप्यपदक विजेत्या पै. विश्वजीत मोरे याचं अभिनंदन !
अमेरिकेतील लास वेगास येथे पार पडलेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत रौप्यपदक पटकावणारा कोल्हापूरचा सुपुत्र पै. विश्वजीत मोरे याचा आज अभिनंदनपर सन्मान केला. या अभिमानास्पद यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
१२ ते १८ ऑक्टोबरदरम्यान पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जगभरातील ६८ देशांच्या कुस्तीगीरांनी सहभाग नोंदवला होता. भारतीय ग्रीको-रोमन संघाचे प्रतिनिधित्व करताना विश्वजीतने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय कुस्तीगीर ठरण्याचा ऐतिहासिक बहुमान मिळवला.
महाराष्ट्राला कुस्तीची समृद्ध परंपरा लाभली आहे. मेहनत, जिद्द, चिकाटी आणि कठोर सरावाच्या बळावर आपले मल्ल आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा नावलौकिक वाढवत आहेत. विश्वजीतचे हे यश केवळ कोल्हापूर किंवा महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीतून नव्या पिढीतील कुस्तीगीरांना निश्चितच प्रेरणा मिळेल. यावेळी कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीपअप्पा भोंडवे आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर पै. सोनबा गोंगाणे उपस्थित होते.
#VishwajitMore #WorldWrestlingChampionship #IndianWrestling #Kolhapur #Maharashtra #ProudMoment #TeamIndia
@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@blsanthosh@BJP4India@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
दिलों में श्रद्धा, संस्कारों में राष्ट्रप्रेम और भावनाओं में अपार स्नेह! 🇮🇳🙏
माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का इन नन्हे बच्चों द्वारा आत्मीयता और उत्साह के साथ किया गया स्वागत अत्यंत मनमोहक है। बच्चों की निश्छल मुस्कान, सहज भावनाएं और स्नेह से भरा यह सुंदर क्षण भारतीय संस्कारों की अनुपम झलक प्रस्तुत करता है।
#NarendraModi #IndianCulture #BharatiyaSanskar #NewIndia #NationFirst
@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@blsanthosh@BJP4India
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा १ लाख १५ हजार ६९७ शेतकऱ्यांना लाभ!
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर झाली आहे. या यादीत १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत १५ लाख ८५ हजार पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला असून, सुमारे १३ हजार २७५ कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे.
राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की, आपल्या जवळच्या बँक शाखेत अथवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन यादीत आपले नाव तपासून घ्यावे. यादीत नाव असल्यास जवळच्या सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी आणि योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.
#Shetkari #FarmerScheme #कर्जमुक्ती_योजना #BJP4Maharashtra
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra
योजना हिताची, शेतकऱ्यांच्या कल्याणाची !
समस्त शेतकरी बंधूंसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर झाली. या यादीत तब्बल १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे. योजनेच्या माध्यमातून आजवर तब्बल १५ लाख ८५ हजार पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला. सोबतच सुमारे १३ हजार २७५ कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा झाली.
तेव्हा सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या जवळच्या बँक शाखेत अथवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन यादीत आपले नाव पडताळून घ्या. यादीत आपले नाव आल्यास नजीकच्या सेवा केंद्रावर आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करा.
#Shetkari #Farmer #कर्जमुक्ती_योजना #BJP4Maharashtra
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra
भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषद आमदार श्री. राजेंद्रजी राऊत यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी राजकीय वाटचालीसाठी अनेकानेक सदिच्छा !
#Birthday#राजेंद्र_राऊत#RajendraRaut#BJP#MLC
भारताचे कणखर आणि सक्षम केंद्रीय गृहमंत्री माननीय श्री. अमितभाई शाह जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! देशविघातक प्रवृत्तींविरोधात कठोर भूमिका घेत राष्ट्राची सुरक्षा आणि देशाची एकता व अखंडता अबाधित राखण्यासाठी मा. अमितभाई शाह किती ठामपणे उभे राहतात, याची ही एक छोटीशी झलक…
#HBDayAmitShah
@AmitShah@BJP4Maharashtra
आमचे स्फूर्तीस्थान, कुशल संघटक, भारताचे गृहमंत्री मा.श्री. अमितभाईजी शहा यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा घेऊन कार्य करणारे मा. अमितभाई शाह जी यांचे संघटन कौशल्य आणि राष्ट्रहिताप्रती असलेली निष्ठा सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. देशाची एकता, सुरक्षा आणि प्रगती यासाठी आपल्या हातून निरंतर राष्ट्रसेवा आणि जनसेवा घडत राहो. आपणास उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य आणि उज्ज्वल भवितव्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
#अमित_शाह #Amit_Shah #HBDayAmitShah #Home_Minister #BJP
@AmitShah@BJP4Maharashtra
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप-महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना पसंती क्रमांक १ चे मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा!
📅 मतदान : शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६
🕗 वेळ : सकाळी ८.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत
#BJP #पुणे_पदवीधर_मतदारसंघ #Mahayuti #पुणे_शिक्षक_मतदारसंघ #MLC_Election
@narendramodi@Dev_Fadnavis@AmitShah@NitinNabin@RaviDadaChavan@mohol_murlidhar@BJP4Maharashtra