वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्���क्ष बाळासाहेब आंबेडकर आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांची आज मंत्रालयात टीईटी पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या उर्वरित मागण्यांवर अधिकृत बैठक पार पडली. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि अधिकारी बैठकीत उपस्थित ��ोते.
टीईटी पेपरफुटी प्रकरणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाने शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानी आंदोलन केले होते. त्यानंतर ४ जुलै रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत १२ मागण्यांचे निवेदन शिक्षणमंत्र्यांना देण्यात आले होते.
१३ जुलै रोजी पुन्हा शिक्षणमंत्र्यांच्या सोबत बैठक झाली. त्यांनी १२ मागण्यांपैकी ८ मागण्��ा मान्य केल्या होत्या. आज उर्वरित मागण्यांच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत बैठक झाली.
टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, परीक्षा पारदर्शक व्हावी, पेपरफुटीला आळा घालण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करण्यात आली आहे. पेपर फुटीमध्ये आढलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही.
टीईटी परीक्षेत पारदर्शकता आणि शिस्तबद्धता येण्यासाठी ऑनलाइन परीक्षा घेता येईन का? याची चाचपणी व IBPS संस्थेशी चर्चा करा��ी.
आर्थिक मागास आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आणि विद्यावेतन त्यांच्या खात्यात वेळेवर जमा करण्याचा विषय हा समाज कल्याण, आदिवासी विकास विभागाशी निगडित आहे. त्यासाठी त्या विभागाशी विचार विनिमय करून विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी मदत केली जावी. तसेच शिक्षण सेवकांच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
#TETExam #Exam #SVA
सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश; शिक्षणमंत्री यांनी मान्य केल्या मागण्या!
मालेगाव येथे वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाने राज्यात नुकतीच TET पेपर फुटी प्रकरणी आक्रमक भूमिका घेत राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानी आंदोलन केले होते. त्यानंतर ४ जुलै रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाने १२ मागण्यांचे निवेदन शिक्षण मंत्री यांना दिले होते आणि ८ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला होता.
तो काल संपल्यानंतर आज मालेगावात सम्यक विद्यार्थी आंदोलनाने आंदोलनाची भूमिका घेतली होती. मात्र, तत्पूर्वी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेत १२ मागण्यांपैकी ८ मागण्या मान्य केल्या आहेत. लेखी स्वरूपात त्यांनी उत्तर दिले असून उर्वरित मागण्यांच्या विधानभेत मांडून पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे
: प्रशांत बोराडे
राज्य प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी
#TETExam #Exam #SVA
TET पेपर फुटी प्रकरणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश आले आहे. वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाने राज्यात नुकतीच TET पेपर फुटी प्रकरणी आक्रमक भूमिका घेत राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानी आंदोलन केले होते. त्यानंतर ४ जुलै रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाने १२ मागण्यांचे निवेदन शिक्षणमंत्री यांना दिले होते आणि ८ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला होता.
तो काल संपल्यानंतर आज मालेगावात सम्यक विद्यार्थी आंदोलनाने आंदोलनाची भूमिका घेतली होती. मात्र, तत्पूर्वी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेत सकारात्मकता दर्शवली व १२ मागण्यांपैकी ८ मागण्या मान्य करत उर्वरित मागण्यांवर मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यावर योग्य कारवाई करण्याची भूमिका मांडली.
देशभरात परीक्षा फुटीवरून विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश आहे. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाने हा प्रश्न ताकदीने लावून धरला. नुसताच हा प्रश्न लावून धरला नाही तर विद्यार्थी हिताच्या अनेक मागण्या शिक्षणमंत्री भुसे यांच्याकडून मंजूर करून घेतल्या. ज्याचा मोठा फायदा आगामी काळात विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होईल.
• मान्य झालेल्या मागण्या ―
१. TET पेपर फुटी प्रकरणी दोषी आढलेल्या लोकांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची घोषणा. यातील सहभागी व्यक्तीं, अधिकारी, कर्मचाऱ्यांची कुठलीही गय केली जाणार नाही.
२. TET पेपर फुटीनंतर आता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील TET परीक्षा फी आकारली जाणार नाही.
३. रद्द करण्यात आलेल्या TET परीक्षांमध्ये उमेदवारांना कितीही वेळा TET परीक्षेला बसता येईल. त्यासाठी विद्यार्थी यांना कोणतीही वयोमर्यादा असणार नाही.
४. शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य आणि ज्येष्ठ शिक्षकांना केवळ टीईटीच्या निकषांवरून पदोन्नती नाकारणे हे अन्यायकारक आहे. त्यामुळे सेवेत असलेल्या अशा शिक्षकांच्या अध्यापन कौशल्य वर्गातील कामगिरी आणि अनुभवाचे मूल्यमापन करण्यासाठी एक स्वतंत्र पुनरावलोकन प्रणाली सुरू करण्याच्या मागणी संदर्भात महाराष्ट्र सरकार इतर राज्यांमधील या संदर्भात केलेली कार्यवाही याचा अभ्यास करून निर्णय घेईल.
५. पेपरफुटीला आळा घालण्यासाठ��� राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करण्यात आली आहे. पेपर फुटीमध्ये आढलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. टीईटी परीक्षेत पारदर्शकता आणि शिस्तबद्धता येण्यासाठी ऑनलाइन परीक्षा घेता येईन का? याची चाचपनी व IBPS या संस्थेशी चर्चा सुरू आहे.
६. आर्थिक मागास आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आणि विद्यावेतन त्यांच्या खात्यात वेळेवर जमा करण्याचा विषय हा समाज कल्याण, आदिवासी विकास विभागाशी निगडित आहे. त्यासाठी त्या विभागाशी विचार विनिमय करून विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी शिक्षण विभागाकडून मदत केली जाईल.
७. जून २०२५ मध्ये झालेल्या TET पात्र उमेदवारांची शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलमुळे ऑनलाइन व वेळेत राबविण्यात येईल. शिक्षक भरती प्रक्रिया पुढील दोन-तीन महिन्यांत होईल.
८. शिक्षण सेवक पदाचा कालावधी एक वर्ष ���रण्याबाबत अर्थ विभागाशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल.
आदी मागण्यांवर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी लेखी स्वरूपात उत्तर दिले आहे.
विद्यार्थी प्रश्नांवर जेव्हा अनेक प्रस्थापित राजकीय पक्ष फक्त राजकारण करण्यात व्यस्त होते, तेव्हा सम्यक विद्यार्थी आंदोलनाने हे प्रश्न आक्रमक भूमिका घेऊन सोडवले. हे सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याचे यश आहे.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या सर���व विद्यार्थ्यांचे अभिनंदन! ✊💪
#सम्यक_विद्यार्थी_आंदोलन #SVA #VBAForIndia
सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश;
शिक्षणमंत्र्यांनी मान्य केल्या मागण्या!
मालेगाव येथे वंचित बहुजन आघाडी प्रण��त सम्यक विद्यार्थी आंदोलनाने राज्यात नुकतीच TET पेपर फुटी प्रकरणी आक्रमक भूमिका घेत राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानी आंदोलन केले होते. त्यानंतर ४ जुलै रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाने १२ मागण्यांचे निवेदन शिक्षण मंत्री यांना दिले होते आणि ८ दिवसांचा अल्टीमेटम द���ण्यात आला होता.
तो काल संपल्यानंतर आज मालेगावात सम्यक विद्यार्थी आंदोलनाने आंदोलनाची भूमिका घेतली होती. मात्र, तत्पूर्वी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेत सकारात्मकता दर्शवली व १२ मागण्यांपैकी ८ मागण्या मान्य करत उर्वरित मागण्यांवर मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यावर योग्य कारवाई करण्याची भूमिका मांडली.
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी लेखी स्वरूपात उत्तर द���ले असून उर्वरित मागण्यांच्या संदर्भात मंत्रालयात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या प्रतिनिधींशी लवकरच बैठक होणार असल्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केले.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ता प्रशांत बोराडे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा सोशल मिडिया प्रमुख जितरत्न पटाईत, मोहीत दामोदर, संघर्षा संखद, अभय सोनकांबळे, भूषण पाईकराव, कमलेश उबाळे, मिहीर गजबे, किरण सैंदाने, दीपक पवार, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नाशिक पूर्व, शशी पवार, वंचित बहुजन युवा आघाडी नाशिक पूर्व, वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, रोहन मगर, प्रज्योत गायकवाड, रवी पगारे, संदी��� रामराजे, शंकर खरात, रोहित बागुल, अनिकेत काशीद, आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#TETExam #Exam #SVA
Jai Bhim! 💙
https://t.co/JYeilSR6km is a digital knowledge platform making ideas of Dr. B. R. Ambedkar accessible to everyone!!
📲 Download the Android App:
https://t.co/V1ZV6JC4Md
Read. Learn. Empower.
Jai Bhim! 🙏
एससीचा निधी आता वारकरी महामंडळाला !
महाराष्ट्र शासनाने २ जुलै २०२६ रोजी जी.आर. काढून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य ��िभागाच्या निधीतून तब्बल २ कोटी ८० लाख रुपये 'मुख्यमंत्री वारकरी महामंडळाला' वर्ग केले आहेत.१४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये देण्यासाठी हा निधी वापरला जात आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या हिशोब पत्रकातून स्पष्ट दिसतेय की, २२३५D९६३ या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या बजेटमधील २ कोटी ८० लाख रुपये मुख्यमंत्री वारकरी महामंडळाला वळवण्यात आले आहेत.यापूर्वी शेतकरी सन्मान योजनेत निधी ���र्ग केला.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत निधी वर्ग केला.आता ��ुख्यमंत्री वारकरी महामंडळाला वर्ग केला.निधी मुख्य बजेटमधून देण्याऐवजी तो दलित आणि वंचित घटकांच्या हक्काच्या बजेटमधून का वळवला जातोय? हा थेट आमच्या घटनात्मक हक्कांवर दरोडा आहे.मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना देखील अशीच अनुसुचित जाती फंड मधून राबविण्यात आली होती.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न, समाजातील आर्थिक आणि शैक्षणिक प्रश्न, विकास सर्व प्रलंबित आहेत.
आपल्या हक्काचा कोट्यवधींचा निधी सरकार सहजपणे इतरत्र वळवतंय!
ही आर्थिक आणीबाणी किती काळ सहन करणार आहोत?अनुसूचित जातीच्या बजेटचा स्वतंत्र कायदा नसल्याने ही मनमानी सुरू आहे.
या अन्यायाविरोधात एकदाचा उठाव झाला पाहिजे.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश
#SC_बजेटचा_कायदा_झालाच_पाहिजे #SaveSCFunds #VBA_Maharashtra #YouthAgainstInjustice #ConstitutionalRights #जयभीम
@CMOMaharashtra @maha_governor
२१व्या शतकात बेसिक शिक्षण घेणं हेच मुळी “लक्झरी” होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
ढासळती शिक्षण व्यवस्था, वाढते शैक्षणिक खर्च, शाळांची दुरावस्था यावरचा हा सुन्न करणारा रिपोर्ट नक्की पहा.
शाळा 😔
@shrikantbangale 🙏🏻@bbcnewsmarathi 🙏🏻
@abhijeetskamble 🙏🏻
TET पेपर फुटीवरून वंचित बहुजन आघाडीची विद्यार्थी संघटना 'सम्यक विद्यार्थी आंदोलनाने' अत्यंत आक्रमक भूमिका घेतली.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या शिष्टमंडळाने शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन 6 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडला नुसता मांडला नाही तर भर बैठकीत शिक्षण मंत्र्यांच्या तोंडावर या पेपर फुटीचे उत्तरदायित���व स्वीकारून राजीनाम्याची मागणी केली. हे धाडस फक्त आणि फक्त सम्यक विद्यार्थी आंदोलन करू शकते. जेव्हा राज्यातील इतर राजकीय पक्ष हे आमदार-खासदार फोडणे, विखारी विचारधारेशी स्वतःच्या कुटुंबाचे वैवाहिक संबंध जोडणे यात व्यस्त असताना आज लाखो विद्यार्थी अस्वस्थ आहेत.
राज्यात पेपर फुटी ही पहिल्यांदा झाली नाही. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड शिक्षणमंत्री असतांन��� सुद्धा TET पेपर फुटी झाली होती.
नीट पेपर फुटी नंतर राज्यात टीईटी पेपर फुटला याविषयी फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीची विद्यार्थी संघटना 'सम्यक विद्यार्थी आंदोलन'ने आक्रमकपणे लढा दिला आणि अजूनही हा लढा सुरूच आहे.
विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे की, आता त्यांनी त्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या 'सम्यक विद्यार्थी आंदोलना'च्या पाठीशी उभे राहिले पाहिजे तरच विद्यार्थ्यांचे प्रश्न हे सुटतील.
#सम्यक_विद्यार्थी_आंदोलन
TET पेपर फुटी प्रकरणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा भर बैठकीत त्यांच्या तोंडावर राजीनामा मागितला.
#SVA#VBAForIndia@dadajibhuse
आज वंचित बहुजन आघाडीच्या सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे #शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
#TET पेपरफुटी व #शिक्षकभरती त्वरित करा. तसेच #शिक्षणसेवक रद्द याप्रकारच्या मागण्या करण्यात आल्या.
@dadajibhuse आपण लवकरात लवकर कार्यवाही करावी.
@VBAforIndia#VBA
५५३ संवर्गांमधील थेट भरती बंद:
लाखो वंचित तरुणांच्या शासकीय नोकरीचे दरवाजे बंद करण्याचा डाव!
वंचित बहुजन युवा आघाडीचा तीव्र निषेध; न्यायालयात जाण्याचा इशारा
मुंबई, ०५ जून २०२५: महाराष्ट्र शासनाने 'विकसित महाराष्ट्र २०४७' या नावाने जारी केलेल्या एका शासन निर्णयाद्वारे तब्बल ५५३ शासकीय संवर्गांमधील थेट भरती बंद करण्याचा घाट घातला आहे. या निर्णयाविरुद्ध वंचित बहुजन युवा आघाडी, महाराष्ट्र प्रदेशने आज तीव्र निषेध नोंदवत राज्य सरकारला ३० दिवसांच्या आत हा निर्णय मागे घेण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण आणि उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.
सामान्य प्रशासन विभागाने एकाच श���सन निर्णयाद्वारे ५५३ संवर्गांच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल केले आहेत.यापूर्वी ५०% पदे थेट स्पर्धा परीक���षेद्वारे आणि ५०% पदे पदोन्नतीद्वारे भरली जात होती.आता अनेक राजपत्रित आणि अराजपत्रित पदांवरील थेट भरती पूर्णपणे बंद करून ती पदे केवळ विभागांतर्गत पदोन्नती किंवा प्रतिनियुक्तीद्वारे भरण्याची मुभा देण्यात आली आहे.त्याचा थेट आरक्षणावर परिणाम होणार आहे.थेट भरती बंद झाली की रोस्टर बंद होऊन अनुसूचित जाती जमाती यांचे आरक्षित पद शून्य होणार आहे.पदोन्नती व प्रतिनियुक्तीत विद्यमान कर्मचा��्यांनाच संधी दिल्याने बाहेरील गुणवान वंचित उमेदवारांना दरवाजे कायमचे बंद होतील.आधीच हजारो बॅकलॉग जागा रिक्त आहेत.आता नव्या रिक्त जागाही न भरण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यातून बिंदू नामावली नष्ट केली जाणार आहे.शिवाय वरिष्ठ पदांवर अनुसूचित जाती जमाती ओबीसी भटके विमुक्त ह्याचे प्रतिनिधित्व आधीच ५-१०% एवढे अल्प आहे.थेट भरती बंद झाल्यास हे प्रमाण आणखी चिंताजनक पातळी पर्यंत घसर��ार आहे. त्यामुळे लाखो स्पर्धा परीक्षार्थींचे स्वप्न उद्ध्वस्त होऊन वर्षानुवर्षे तयारी केलेल्या युवकांवर अन्याय होणार आहे.
हा निर्णय पूर्णतः बेकायदेशीर आहे.कारण
भारताचे सर्वोच्च न्यायालय इंदिरा साहनी 1992, एम नागराज 2006 आणि अलीकडील दवींदर सिंग 2024 या खटल्यांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की आरक्षण हक्क हा संविधानाच्या मूलभूत रचनेचा भाग आहे आणि थेट भरती बंद करणे म्हणजे अनुच्छेद १४, १५(४) आ��ि १६(४) चे उल्लंघन आहे. संविधानाने दिलेला हक्क केवळ प्रशासकीय सोयीसाठी काढून घेता येत नाही.
'विकसित महाराष्ट्र' म्हणजे फक्त उच्चवर्णीयांचा विकसित महाराष्ट्र का? ज्या समाजाने पिढ्यान्पिढ्या शिक्षण, संपत्ती आणि सत्तेपासून वंचित राहिला त्याला शासकीय नोकरीतही संधी नाकारणे म्हणजे संविधानिक अधिकार काढून घेणे होय.हा निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही न्यायालयापासून रस्त्यापर्यंत लढू, असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.
सदर शासन निर्णयाला तात्काळ स्थगिती द्यावी.५५३ संवर्गांमधील थेट भरती पूर्ववत करावी. अनुसूचित जाती जमाती ओबीसी एस बी सी, भटके विमुक्त प्रतिनिधित्वाचा ताजा डेटा सार्वजनिक करावा. एम पी एस सी मार्फत भरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी.हा निर्णय विधिमंडळात चर्चेसाठी ठेवावा आणि महाधिवक्त्या कडून कायदेशीर मत घेण्यात यावे, अश्या मागणी युवा आघाडीचे वतीने राज्यपाल मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव ह्यांना पाठविलेल्या मेलद्वारे करण्यात आल्या आहेत.
३० दिवसांत समाधानकारक निर्णय न मिळाल्यास वंचित बहुजन युवा आघाडी मॅट तसेच मुंबई उच्च न्यायालय याचिका दाखल करेल. तसेच राज्यभर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र
9422160101
@CMOMaharashtra
@maha_governor
बौद्ध समाज इतका पुढे का गेला ??
सध्या सोशल मीडियावर सर्वात हॉट टॉपिक हाच आहे. उप वर्गीकरण इशू नंतर तर ह्या टॉप���क वर सगळेच आपले मत व्यक्त करत आहेत.
आज एका गावकरी मंडळीचे रील बघितले, त्यात तो म्हणतो की बौद्धांनी अंधश्रद्धा सोडली आहे त्या कारणाने ते पुढे गेले आहेत.