स्वागत करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून रस्त्यावर ताटकळत ठेवणं, हे कॅबिनेट मंत्र्याला न शोभणारं आहे... राष्ट्रवादी काँग्रेसची तर ही विचारधारा असूच शकत नाही..
आणि संगतीचा परिणाम अवघ्या चार दिवसातच होत असेल तर हे जरा आश्चर्यकारकच आहे..
@NCPspeaks
महाविकास आघाडीत असताना अजित दादा काम करु देत नव्हते, असा आरोप त्यांच्यावर होता. पण आता अजित दादांच्या कार्यपद्धतीमध्ये बदल होऊन टीम मेंबरच्या रुपाने ते तुम्हाला साथ देणार आहेत, असा अनुभव तुम्हाला आजच्या कॅबिनेटमध्ये आला का? काही बदल झाला आहे का अजित दादांमध्ये?
घोरणे राबविले जात आहेत.यामुळे सरकारच्या शिफारशीवरून विधानपरिषद सदस्यत्व स्विकारणे मला नैतिकदृष्ट्या अयोग्य वाटते.ज्यावेळी आपला व राज्य सरकारचा समझोता होऊन बारा सदस्यांना नियुक्त करण्याचा निर्णय होईल त्यावेळेस त्या यादीतून माझे नाव वगळण्यात यावे
मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो,त्या सहकार आणि कृषी क्षेत्रातील अनेक धोरणाबद्दल माझ्यासहीत महाराष्ट्रातील शेतकर्यांचे आक्षेप आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून सरकार स्थापनेपासून घटक पक्षांना विश्वासात न घेता राज्यकर्त्यांच्या फायद्यासाठी जाणीवपुर्वक शेती,सहकार या क्षेत्रात चुकीचे
“मुंबई - गोवा” महामार्ग पुर्ण तयार झाला की ताबडतोप तो जगातील आठवे आश्चर्य म्हणून घोषित करण्यात यावा.
तसेच हाच दिवस “जागतिक / वैश्विक महामार्ग दिन” म्हणूनही साजरा केला जावू शकतो इथपर्यंत त्याची किर्ती पोहोचलीये.
लहाणपणी आजच्या दिवशी शाळेत मिळणाऱ्या जिलेबीची चव, आणि त्यातल्या आनंदाचा गोडवा आजच्या भारीत भारी मिठाईला पण नाही.
ते लेमनच्या गोळ्या आणि बिस्किटाची पाकिटं वाटणारी माणसं मला आजही जगातली लय भारी माणसं वाटतात….. अगदी मनापासून द्यायची हे सर्व, दरवर्षी - अगदी न चुकतां!
जोपर्यंत आपण स्वतः वाचून, विचार करून शहाणं होत नाही तोपर्यंत इतरांच्या मागे फरपटत जाण्याशिवाय गत्यंतर नसते.
वाचते व्हा मंडळी, आपला दुसरा कोणी वाली नाही!
प्रवाहासोबत जाणारे पालापाचोळ्यासारखे वाहत जातात…..
विरूद्ध दिशेने जायला प्रचंड इच्छाशक्ती लागते…..जगण्याची एक वेगळीच धडपड, कोण साथसोबत करेल की नाही खात्री नसते.
हवा तसा शेवट होईल की नाही याचीही हमी नसते…..फक्त लढायचं…..जीवाच्या आकांताने पण कधी “पालापाचोळा” नाही व्हायचं.…!
अविचार, तिरस्कार आणि द्वेष यांच्या सततच्या “वैचारिक प्रदुषणामुळे” आचरण आणि आकलन दोन्हींवर दुष्परिणाम होतो…..
तरी निदान समाजमाध्यमात बरंय - ब्लॅाक, म्युट आणि अकाऊंटच डिलीट करायचा ऑप्शन आहे….. खऱ्या आयुष्यात ते फार कठीण आहे.
‘ही महाराष्ट्राची (राजकीय)संस्कृती नाही’ हे असं आपण आता पुरेशी वर्ष बोलतोय. आता हीच संस्कृती झाल्ये हे मान्य करावं तरंच कदाचित ती बदलायचा खरा प्रयत्न सुरू करता येऊ शकेल.