9 तास लोकांसोबतच्या भेटी��ाठीचे !
आज सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत विविध भागांतून आलेल्या आपल्या माणसांशी संवाद साधला. अनेकांनी आपल्या मनातल्या अपेक्षा, समस्या आणि काही वैयक्तिक विषयही मोकळेपणाने माझ्यासमोर मांडले.
लोकांशी संवाद साधणे ही लोकप्रतिनिधी म्हणून ��ाझी सर्वात मोठी जबाबदारी आहे, असं मी मानतो. याच भावनेतून नेहमी लोकांमध्ये राहण्याचा, त्यांचं ऐकण्याचा प्रयत्न करतो आणि यातूनच आपुलकीचं आणि विश्वासाचं नातं अधिक घट्ट होत जातं. हा विश्वास जपणं, हेच सर्वात महत्त्वाचं आहे.
📍प्रभा निवास, संगमनेर
🗓️ 25 जुलै 2026
#PublicRepresentative #Accountability
हे पोलिस नाहीत..जनरल डायरच्या पुढे गेले तुम्ही!
मुलांच्या हातात शस्त्र नव्हती..घोषणा देत नव्हते...तरी तुम्ही क्रूरपणे मारले...
हा देश आंदोलन आणि उपोषण करून स्वतंत्र झाला आहे लक्षात ठेवा! आज सत्तेचा माज तुम्हाला ही आला ���हे...पण सत्ता टिकत नाही! #माज
शिक्षण थांबलय, प्रशासन सांगूनही झोपलंय; आता आंदोलन होणारच...
महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्था आज कोलमडण्याच्या मार्गावर आहे. शिक्षकांना शिकवण्याऐवजी B.L.O. (Booth Level Officer), सर्वेक्षण, नोंदी आणि इतर कामांमध्ये अडकवले जात आहे. प्रशासनाकडून ना स्पष्ट धोरण, ना ठोस निर्णय आणि याची किंमत थेट विद्यार्थ्यांना मोजावी लागते आहे.
या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण आयुक्तांना पत्राद्वारे शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी केली.
2007 पासून शिक्षणाच्या प्रश्नांवर माझा सातत्याने लढा सुरू आहे. अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून आणि लेखी स्वरूपात प्रश्न मांडले, पण अजूनही दीर्घकालीन उपाययोजना झालेल्या नाहीत. हे केवळ दुर्लक्ष नाही, तर शिक्षण व्यवस्थेशी खेळ आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर येथील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी सर्व संबंधित ��धिकारी, शिक्षक संघटना, संस्थाचालक, विद्यार्थी व पालक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत तात्काळ संयुक्त बैठक घेऊन ठोस निर्णय घ्यावेत, ही स्पष्ट मागणी आहे.
अन्यथा, 25 मे 2026 पासून मी स्वतः बेमुदत आंदोलनास बसणार आहे. प्रश्न सुटेपर्यंत मागे हटणार नाही. आंदोलन, गुन्हे आणि दबाव; हे माझ्यासाठी नवीन नाही. दिल्लीपासून मुंबईपर्यंत अशा अनेक लढ्यांना सामोरे गेलो आहे.
शिक्षण हा प्रयोगाचा विषय नाही. विद्या���्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्यांना आता उत्तर द्यावेच लागेल. निर्णय घ्या, नाहीतर आंदोलन अटळ आहे!
#Maharashtra #EducationSystem #EducationReform #TeachersIssues #Justice #Protests
@dadajibhuse @DRPANKAJBHOYAR
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त संगमनेर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित अभिवादन सभेस उपस्थित राहिलो.
बाबासाहेबांचे समता, न्याय आणि शिक्षणाचे विचार समाजात अधिक व्यापकपणे पोहोचावेत व नवीन पिढीपर्यंत प्रेरणा म्हणून रुजावेत, या उद्देशाने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. भास्करराव बागुल यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने, तर छात्रभारती, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अनिकेत घुले यांना ‘प्रेरणा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
#DrBabasahebAmbedkar #AmbedkarJayanti
माझे आजोबा व थोर स्वातंत्र्यसैनिक, सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब संतुजी थोरात यांचा आज स्मृतिदिन. या निमित्ताने त्यांच्या स्मृतीस्थळी जाऊन विनम्र अभिवादन केले.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तीर्थरूप दादांनी सहकार चळवळ, शिक्षण आणि शेती या क्षेत्रांतून संगमनेर परिसराच्या विकासासोबतच राष्ट्रउभारणीतही मोलाची भूमिका बजावली. त्यांनी उभ्या केलेल्या कार्याचा ठसा आजही समाजात ठळकपणे जाणवतो.
दादांनी दिलेली शिकवण, त्यांचे विचार आणि समाजसेवेची त��यांची निष्ठा माझ्या सामाजिक व राजकीय प्रवासात सतत मार्गदर्शक ठरते. त्यांच्या आठवणी मला लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी अधिक ��्रामाणिकपणे पार पाडण्याची प्रेरणा देतात. त्यांच्या विचारांच्या वाटेवर चालत नागरिकांची सेवा करण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील.
नाशिक - पुणे रेल्वे नाशिक - सिन्नर - संगमनेर - अकोले - नारायणगाव - राजगुरुनगर - चाकण या मार्गेच गेली पाहिजे अशी आपली ठाम मागणी आहे. यासाठी आपल्या ��नआंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याच्या उद्देशाने आज या मार्गात येणाऱ्या सर्व पक्षीय ��ोकप्रतिनिधींची बैठक पार पडली.
नाशिक - शिर्डी रेल्वे मार्ग, अहिल्यानगर - पुणे रेल्वे मार्ग या प्रकल्पांनाही आमचा पाठिंबा आहे. पण, नाशिक व पुणे या दोन औद्योगिक शहरांच्या विकासासाठी, या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्तम वाहतुकीच्या व्यवस्थेसाठी, या भागातील विद्यार्थी व नोकरदार वर्गाच्या हितासाठी नाशिक - पुणे रेल्वे पूर्वीच्या आराखड्याप्रमाणे सरळ मार्गे होणे अत्यंत गरजेचे आहे. य��� दिशेने काम सुरू होऊन जवळपास 1000 कोटी रुपये खर्च करून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहणही झालेले आहेत. आता इथून माघार न घेता रेल्वे प्रकल्प सरळमार्गे व्हावा यासाठी या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधी, विविध तालुक्यातील रेल्वे कृती समितीचे प्रतिनिधी यांची आज विचार मंथन बैठक संपन्न झाली. या बैठकीत जन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली.
आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आम्ही सर्व प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन आमची भूमिका मांडणार आहोत. यासाठी आजच्या बैठकीतूनच मी माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत फोनवरून चर्चा केली, त्यांनी आमच्या शिष्टमंडळाला जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटीसाठी वेळ देण्याबाबत आश्वस्त केले आहे.
या बैठकीत ऑनलाईन माध्यमातून .डॉ. अमोल कोल्हे त्याचप्रमाणे खा. राजाभाऊ वाजे, खा. भाऊसाहेब वाकचौरे, मा.खा. शिवाजीराव आढळराव पाटील, मा.खा. सदाशिवराव लोखंडे, आ. श���द सोनवणे, आ. किरण लहामटे, आ. बाबाजी काळे, मा.आ. अतुल बेनके, श्री. देवदत्त निकम, श्री. सत्यशील शेरकर, सौ. नीलम अमोल खताळ, मा. उत्कर्षा रूपवते, मा. उदय सांगळे, कॉ. अजित नवले, कॉ. कारभारी नवले, मा. बाजीराव दराडे, मा. कपिल पवार, मा. दत्ता ढगे यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते.
#Pune #Nashik #HighSpeedRail #Sinnar #Sangamner #Narayangaon #Manchar #Rajgurunagar
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @CMOMaharashtra @kolhe_amol @bhausaheb_w904 @RajabhauW @ShivajiAdhalrao @SLokhandeMp @mlasharadsonwne @DrKiranLahamate @amolkhatalpatil @atulbenkeNCP @satyashilsherkr @mibabajikale @URupwate