आपल्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील अत्यंत संवेदनशील चिमुकलीच्या बलात्कार व हत्येच्या प्रकरणात न्यायालयाने दिलेला निर्णय हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे. अशा अमानुष कृत्यांना समाजात कोणतीही जागा नाही. प्रत्येक महिला व मुलीची सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून, अशा गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाईचा निर्धार कायम राहील. न्याय मिळाला, पण अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी समाज आणि प्रशासनाने एकत्रितपणे अधिक सजग राहण्याची गरज आहे.बलात्कार आणि हत्येसारख्या अमानुष गुन्ह्यांना कोणतीही माफी नाही. न्यायालयाने दिलेला निर्णय हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास बळकट करणारा आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपले सरकार कटिबद्ध असून, अशा नरधमीवृत्तीच्या गुन्हेगारांविरोधात कठोरात कठोर कारवाई सुरूच राहील.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा!
@supriya_sule
'दैनिक नवभारत-नवराष्ट्र' यांच्या स्थापना दिनानिमित्त नुकताच एक विशेष अंक प्रकाशित करण्यात आला होता. विशेष बाब म्हणजे, 'दैनिक नवभारत-नवराष्ट्र'चा स्थापना दिवस आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी असण्याचा एक योग या निमित्ताने जुळून आला!
या विशेष अंकाची एक सुंदर फ्रेम माझे वडील, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार मा.श्री. सुनीलजी तटकरे साहेब आणि राज्याचे महसूल मंत्री मा.श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मला भेट म्हणून देण्यात आली. ही आपुलकीची भेट विनम्रपणे स्वीकारून 'नवभारत' समूहाचे उपमहाव्यवस्थापक श्री. सचिन फुलपगार, 'नवराष्ट्र'चे विशेष प्रतिनिधी श्री. मंदार पारकर आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
@SunilTatkare@cbawankule@navarashtra
#AditiTatkare #navabharat #navarashtra #maharashtra #NavabharatGroup
नेम अचूक,लक्ष्य सुवर्ण आणि इतिहास भारताच्या नावावर ..! 🇮🇳🥇
जर्मनीतील म्युनिच येथे पार पडलेल्या ISSF World Cup स्पर्धेत भारताची युवा नेमबाज ईशा सिंग हिने भारतासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला आहे.
महिला 25 मीटर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत तब्बल 43 गुणांची अप्रतिम कामगिरी करत ईशाने केवळ सुवर्णपदकच पटकावले नाही, तर नवा विश्वविक्रमही आपल्या नावावर केला.तिच्या आत्मविश्वासपूर्ण खेळीने, अचूक निशाणेबाजीने आणि जिद्दीने संपूर्ण देशाचा अभिमान उंचावला आहे.
ईशा सिंग हिचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आगामी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
@singhesha10
#issfworldcup
#indianshooting
U23 आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी..! 🇮🇳
व्हिएतनाममधील दा नांग येथे पार पडलेल्या U23 आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी आपल्या शानदार कामगिरीने संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. विविध गटांमध्ये विक्रमी पदकांची कमाई करत भारतीय संघाने जागतिक स्तरावर आपली ताकद सिद्ध केली.
पुरुष फ्रीस्टाईल संघाने ४ सुवर्णपदकांसह एकूण ९ पदकांची कमाई केली, तर महिला कुस्ती संघाने ६ सुवर्णपदकांसह तब्बल १० पदके पटकावत ऐतिहासिक यश मिळवले. ग्रीको-रोमन संघानेही ८ पदके जिंकत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.
या उल्लेखनीय यशासाठी सर्व खेळाडू, प्रशिक्षक यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
देशासाठी अशीच गौरवास्पद कामगिरी करत राहण्यासाठी सर्व कुस्तीपटूंना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#TeamIndia #U23AsianChampionship
📍गीताबाग, सुतारवाडी, ता. रोहा,
सुतारवाडी येथील गीताबाग कार्यालयात 'जनता संवाद' उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांसोबत संवाद साधला. नागरिकांच्या विविध समस्या, अडीअडचणी प्रत्यक्ष संवादातून जाणून घेतल्या. स्थानिक पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, गावांच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर नागरिकांसोबत चर्चा केली. यातील बहुतांश प्रश्न तातडीने मार्गी लावले असून, उर्वरित विषयांचा आवश्यक पाठपुरावा करून तातडीने नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे निर्देश माझ्या कार्यालयास दिले आहेत.
#adititatkare #maharashtra #raigad #Roha #जनतासंवाद
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांनी २०१४ मध्ये सुरू केलेल्या 'स्वच्छ भारत अभियाना'ने आज एका भव्य लोकचळवळीचे रूप घेतले आहे. याच अभियानाचा मुख्य धागा पकडून, 'नॅशनल एज्युकेशन अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट संस्था, मुंबई' यांच्या वतीने गेल्या २०१४ पासून देशभरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जाणीव-जागृती निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.
मुंबईत आयोजित या राष्ट्रीय पातळीवरील उपक्रमाच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला. यावेळी राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढाजी, प्रसिद्ध नेत्रशल्यचिकित्सक पद्मश्री मा. श्री. डॉ. तात्याराव लहाने देखील उपस्थित होते. या सोहळ्याला देशभरातून आलेल्या विजेत्या शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित केलं व त्यांच्याशी संवाद साधला.
शालेय वयापासूनच मुलांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण झाली, तर देशाचे भविष्य अधिक सुंदर, निरोगी आणि समृद्ध होईल यात शंका नाही. पारितोषिक विजेत्या सर्व संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक आणि लाडक्या विद्यार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देते!
@MPLodha
#SwachhBharatAbhiyan #CleanIndia #NationalAwards #AditiTatkare #Mumbai #Education
लोकहिताच्या प्रश्नांना संसदेत प्रभावी आवाज देणाऱ्या महाराष्ट्रातील जनप्रतिनिधींना ‘संसद रत्न’ सन्मान!
‘संसद रत्न’ पुरस्कारासाठी भाजपा खासदार डॉ. हेमंत सवरा, खासदार मेधाताई कुलकर्णी, खासदार स्मिताताई वाघ, महायुतीतील शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांची झालेली निवड अत्यंत अभिमानास्पद आहे. सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन!
संसदीय कामकाजात सक्रिय सहभाग, लोकहिताच्या प्रश्नांवरील अभ्यासपूर्ण मांडणी आणि जनसेवेप्रती असलेली बांधिलकी याचीच ही योग्य दखल आहे. भविष्यातही आपल्या कार्यातून जनतेचा विश्वास अधिक दृढ कराल, अशी अपेक्षा आहे. सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
@drhemantsavara@Medha_kulkarni@DrSEShinde@nareshmhaske@SmitaWagh_
#SansadRatnaAward
@Rohini_khadse ताई आरोप सिद्ध झाल्यास योग्य ती कारवाई होईलच...पण त्यात अदितीताईंच नाव जोडण्याचा काय संबंध....हे रडीचे डाव बंद करा...जरा त्यांच्या कामा कडे लक्ष्य द्या आणि आपल्या घरच्यांकडे पण धन्यवाद 🙏🙏
अंधेरी, मुंबई येथे 'माविम' अंतर्गत निर्माण होत असलेल्या 'सावली' वर्किंग वूमन वसतिगृहाच्या बांधकाम व इतर कामांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला व काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी, माविमच्या व्यवस्थापकीय संचालिका राजलक्ष्मी शाह तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
#मावीम #adititatkare #maharashtra #WCDDepartment #womenempowerment
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक आज संपन्न झाली. बैठकीत कारखान्याच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच विविध समस्या व अडचणी जाणून घेत त्यावर सकारात्मक चर्चा करत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. कारखान्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
📍बारामती
I had the pleasure of welcoming the Hon’ble President of Republic of Cyprus, Mr. Nikos Christoudoulides, at the Mumbai airport.
During our interaction, we discussed Maharashtra’s rich cultural heritage, the state’s important role in the economic landscape of India and the world, Maharashtra’s continued progress towards the holistic development of women and children and the longstanding cultural ties between Cyprus and India.
We hope to continue strengthening the relationship between the two countries in the years ahead.
#India #Cyprus
@narendramodi@Christodulides@CYpresidency@CMOMaharashtra@SunetraA_Pawar@mieknathshinde@MahaDGIPR
जिद्द आणि चिकाटी असेल तर परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते, हे महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या विविध बालगृहातील ७१५ विद्यार्थ्यांनी १०वीच्या निकालातून सिद्ध करून दाखवले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करते.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सकारात्मक जीवनाचा मार्ग स्वीकारत या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश खरोखरच प्रेरणादायी आहे. यंदा पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक ११८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यापाठोपाठ मुंबई उपनगर येथील ८८, अहिल्यानगर येथील ८०, बीड येथील ४७, ठाणे जिल्ह्यातील ४२, सोलापूर येथील ३९ आणि कोल्हापूर येथील ३४ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष कौतुक म्हणजे कोल्हापूरमधील एका विद्यार्थ्याने ९५.२०% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला असून बीडच्या विद्यार्थ्याने ९४% गुणांची नोंद केली आहे. यासोबतच पुणे, सोलापूर, मुंबई आणि धाराशिव येथील अनेक विद्यार्थ्यांनी ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवत गुणवत्तेचा झेंडा फडकवला आहे.
बालगृहातील या मुलांसाठी आमचा विभाग सातत्याने प्रयत्नशील असून, ऑनलाईन सेशन्स, शिक्षकांचे विशेष वर्ग आणि समुपदेशन अशा सुविधा पुरवल्या गेल्या, ज्याचा मोठा फायदा या निकालात दिसून आला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या पुढील उच्च शिक्षणासाठी शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास कटिबद्ध असून, त्यांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव पाठीशी उभे राहू. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
#AditiTatkare #SSCResults #MaharashtraGovernment #WCD #SuccessStory #EducationForAll #MaharashtraEducation
बलात्कार व लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेले गुन्हेगार पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याच स्वरूपाचे गुन्हे करत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. अशा गंभीर व अमानवी स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये दोषी असलेल्या नराधमांना कोणत्याही परिस्थितीत पॅरोल देऊ नये, पुन्हा समाजात वापरण्याची संधी देऊ नये अशी स्पष्ट व कठोर भूमिका शासनाने घ्यावी अशी मागणी राज्याची महिला व बालविकास मंत्री या नात्याने मी माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सूनेत्राकाकी पवार यांच्याकडे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत केली आहे.
महायुती सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत अत्यंत संवेदनशील आहे. म्हणूनच या मागणीची माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने दखल घेतली असून, आवश्यक ते कायदेशीर बदल करून त्याची कठोर अंमलबजावणी करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना विधी व न्याय विभागाच्या सचिवांना दिल्या आहेत.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar
Baseless reports and speculative narratives targeting Praful Patel ji and Sunil Tatkare ji are nothing but fiction.
Their decades of unwavering commitment and leadership continue to guide us all.
Dragging such senior leaders into manufactured controversies is deeply unfortunate and must be called out.
शरद पवार साहेबांच्या पक्षातील मंडळी अजितदादांच्या पक्षावर एवढ का लक्ष ठेवत आहेत? तुमच्या पक्षाची राजकीय भूमिका काय आहे ?
- विजय चोरमारे ( राजकीय विश्लेषक)
@RRPSpeaks@VikasLawande1
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आणि देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या 'भारतीय रिझर्व्ह बँक' चा आज स्थापना दिन!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'द प्रॉब्लेम ऑफ द रुपी' या ग्रंथातील संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून १ एप्रिल १९३५ रोजी या बँकेची स्थापना झाली. देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्थापना दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
अशोक खरात याच्यासोबत वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो आहे. कुठल्याही पक्षाच्या नेत्याने खरातचे समर्थन केलेले नाही. सार्वजनिक कार्यक्रमात भेट झाली याचा अर्थ संबंधित नेता त्याचे समर्थन करतो, असा होत नाही. सध्या कोणीही कोणावरही आरोप करत आहे. कोणी रश्मी वहिनींचे नाव घेते, कोणी नीलम गोऱ्हे यांचे नाव घेते. कोणी मी याप्रकरणात भूमिका घेत नाही, असे बोलून माझे नाव घेते. - आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री
#AditiTatkare #AshokKharat #LatestNews #MaharashtraPolitics #MarathiNews
(Aditi Tatkare, Ashok Kharat, Maharashtra Politics, Nashik)