MPSC च्या विद्यार्थ्यांचा अभ्यासापेक्षा अधिक वेळ आयोगाच्या मनमानीपणाशी लढण्यातच खर्च होतो अनेकदा
25 तारखेला परीक्षा आहे, आता अवघे तीन दिवस उरले असतानाही निर्णय घेतला जात नाही
आधीच आपल्याकडे सरकारी नोकऱ्यांची कमतरता त्यात परीक्षा संस्थांची अशी असंवेदनशीलता... विद्यार्थ्यांच्या बाजूने विचार करणारे लोक आयोगात नसतातच का?
आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत.
तसेच कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्या��ा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे.
आज दुपारी तीन वाजता एक बैठक घेऊन त्यात यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे त्यांनी मला आश्वस्त केले आहे.
#MPSC
MPSC कृषी व IBPS या विषयासंदर्भात उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची आज भेट घेतली. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीत कृषी सेवेच��या 258 पदांचा समावेश करावा व IBPS परीक्षा देखील 25 ऑगस्ट रोजी होणार असल्याने त्या परीक्षेला मुकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्येतून मार्ग काढावा अशी मागणी त्यांच्याकडे केली. मा देवेंद्रजी यांनी तात्काळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला याबाबतची विनंती केली आहे. आयोग विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार लवकरच मार्ग काढेल अशी अपेक्षा आहे. #MPSC
केंद्र आणि राज्य सरकार युवकांचा विचार अजिबात करत नाही, हे पुन्हा एकदा दिसून आलंय. MPSC आणि IBPS च्या परीक्षा पुन्हा एकदा एकाच दिवशी होणार आहेत, ज्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे. २५ ऑगस्टला IBPS ने दे��पातळीवरील परीक्षा आयोजित केलेल्या असताना त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही आपल्या दोन महत्त्वाच्या परीक्षा आयोजित केल्यात. दोन्ही परीक्षा देऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे.
राज्यातल्या राजवटीने विद्यार्थ्यांचा विचार करून राज्यसेवा आयोगाची परीक्षा तातडीने पुढे ढकलायला हवी.
मुळात वारंवार असं घडत असेल तर केंद्राशी योग्य संवाद आणि समन्वय हवा.
विद्यार्थ्यांब���बत असंवेदनशील राहून चालणार नाही, हे ह्या राजवटीला समजायला हवं!
#WATCH | Pune: "The exam on 25th August is overlapping with IBPS exam. Our first demand is that the MPSC exam should be postponed. Our second demand is that 258 posts in the Agriculture Department exam should also be added to this...," says an MPSC aspirant staging a protest.
सरकारने @mieknathshinde अजूनही वेळ हातातून गेली नाही याची नोंद घ्यावी
पोरांचा उद्रेक जर झाला तर सरकारला सहन होणार नाही, पोरांच्या मागण्या आहेत त्यावरती विचार करावा.
👉1500 जागांची जाहिरात
👉कंबाईनची जाहिरात आणि
👉कृषी ची परीक्षा याच जाहिरातीत घ्यावी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा येत्या २५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. परंतु त्याच दिवशी ‘आयबीपीएस’ची देखील परीक्षा ठेवली आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे अनेक उमेदवारांना कोणत्या तरी एका परीक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे. वर्षानुवर्षे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांवर हे अन्याय केल्यासारखे होईल. यासंदर्भात गेली काही दिवसांपासून हे सर्वजण विविध माध्यमांतून शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु शासनाने त्यांच्याकडे योग्य ते लक्ष दिलेले नाही. यामुळे हे सर्व विद्यार्थी काल रात्रीपासून पुण्यात आंदोलन करीत आहेत. त्यातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र कृषि सेवा गट अ, ब, आणि ब (कनिष्ठ) संवर्गासाठी दोन-तीन दिवसांत जाहिरात प्रकाशित करण्यात येऊन सदर पदांसाठी ऑक्टोबरमध्ये परिक्षा घेण्यासंदर्भातील ट्विट केले आहे. जर हि परिक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार असेल तर कृषी विभागाची पदे राज्यसेवा परीक्षे��ध्ये समाविष्ट करून ऑक्टोबर मध्ये एकत्रित सर्वसामवेशक राज्यसेवा परिक्षा घेता येणे शक्य आहे, व तेच तांत्रिकदृष्ट्या योग्य राहील असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. असे केल्यास विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देता येतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा योजनेचा संदर्भ घेतला तर त्यांचे हे म्हणणे बरोबर देखील आहे. तरी मुख्यमंत्���ी महोदयांना माझी विनंती आहे की, या विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून कृपया त्यांची दखल घ्यावी आणि त्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला योग्य ते निर्देश देऊन तातडीने त्यासंदर्भातील परिपत्रक जाहिर करावे.
@CMOMaharashtra @mpsc_office
#स्पर्धा_परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून सकाळीच आयोगाच्या सचिवांशी बोललो आहे.#कृषीच्या 258 ��ागांचा समावेश करून राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलावी,जागांमध्ये भरीव वाढ करून नव्याने सुधारित अधिकच्या जागांची दोन दिवसात जाहिरात काढावी तसेच भविष्यात #IBPS परीक्षा आणि आयोगाच्या परीक्षा एकच दिवशी येणार नाहीत यासाठी IBPS सोबत संपर्कात राहण्याची आयोगाला विनंती केली आहे.आचारसंहिता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार असल्याने त्यापूर्वी परीक्षा पार पडतील असे नियोजन केल्यास विद्यार्थ्या��चा प्रश्न निकाली निघू शकतो ही बाब देखील आयोगाच्या लक्षात आणून दिली.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नात राजकारण करत नाही, परंतु विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करून पुढील दोन तासात विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय न झाल्यास, मी मात्र ��िद्यार्थ्यांच्या सोबत आंदोलनाला बसेल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
@mieknathshinde
@mpsc_office
#mpsc
महाराष्ट्रात राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीत कृषी सेवेच्या 258 पदांचा समावेश करणे बाबत गेल्या अनेक महिन्यांपासून माझा पाठपुरावा सुरू आहे. EWS to SEBC विषयामध्ये माझ्या ट्विट मुळे विद्यार्थी अभ्यासातून विचलित होत असल्याची बाब मला जाणवली होती. त्यामुळे यावेळेस कटाक्षाने ट्विट करणे टाळले होते. परंतु काल आयोगाच्���ा नोटिफिकेशन नंतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर विचलित झाल्याने आपणास कळवू इच्छितो की, नुकताच मी मुंबईत पोहोचलो असून मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व लोकसेवा आयोग यांना समक्ष भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. Please Keep studying. #MPSC
MPSC आणि IBPS च्या परीक्षा परत एकदा एकाच दिवशी आल्याने लाखो विद्य���र्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे. दिनांक 25 ऑगस्ट रोजी IBPS ने देशपातळीवरील परीक्षा आयोजित केलेल्या असताना त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही आपल्या दोन महत्त्वाच्या परीक्षा आयोजित केल्या आहेत. याच्या निषेधार्थ पुण्यातील अहिल्यादेवी अभ्यासिके बाहेर हजारो विद्यार्थी आंदोलन करत आहेत. कर्नाटक आणि केरळ सरकारने IBPS परीक्षेमुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यां��ा न्याय दिलेला आहे. हीच भूमिका महाराष्ट्र सरकारची असायला हवी. २५ ऑगस्ट ला होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलून त्यात कृषीच्या जागा समाविष्ट करण्यात याव्या अशी विद्यार्थ्याची मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या परीक्षेच्या तारखा बदलाव्यात, ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे नम्र विनंती करण्यात येत आहे. अन्यथा राज्यभर आयोगाच्या ���िरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल..!
#MPSC #IBPS #Exams
It’s beyond imagination why MPSC is forcing students to choose between exams! With MPSC's State Service Prelims and IBPS Clerk Exam both set for August 25th, thousands of aspirants are left in a bind, risking their future by missing one crucial test. The State Service Exam, delayed twice, now unfairly clashes with IBPS. Is this deliberate? Students are rightfully demanding MPSC reschedule the exam to avoid this needless stress. #MPSC #IBPS #ExamClash #StudentRights #RescheduleMPSC