BREAKING NEWS!!
PMC has abandoned HCMTR for BBPP Road! One less destructive project on #VetalTekdi!
Press Note:
पुणे महानगरपालिकेने HCMTR रद्द करून बालभारती-पौड फाटा रस्त्याला (BBPP) मान्यता दिली, सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरणीय अटी कायम ठेवल्या, BBPP प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी बंधनकारक.
काल सर्वोच्च न्यायालयाने बालभारती–पौड फाटा रस्ता प्रकरणातील फेब्रुवारी2025 मधील उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आमच्या अपीलवर आपला लेखी आदेश दिला आहे. पुणे महानगरपालिकेचे वकील श्री अभिजित कुलकर्णी आणि भारताचे सॉलिसिटर जनरल श्री तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले की HCMTR प्रकल्प आता रद्द करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयात HCMTR प्रकल्प रद्द झाल्याचे स्पष्टपणे सांगितल्यानंतर, पुणे महानगरपालिकेने आता MRTP कायद्यानुसार विकास आराखड्यातून HCMTR ची वगळणी करण्याची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे. (संलग्न आदेशातील मुद्दा क्र. 12 पहा).
आम्हाला अत्यंत आनंद आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेताळ टेकडीवरील लॉ कॉलेजच्या उताराच्या पर्यावरणीय महत्त्वाला मान्यता दिली आहे. या सुनावणीत पुणे महानगरपालिकेच्या वतीने भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी उपस्थित राहून असा युक्तिवाद केला की बालभारती रस्त्यासाठी पर्यावरणीय मंजुरीची आवश्यकता नाही.
मात्र त्यांच्या या युक्तिवादावर मात करत, सर्वोच्च न्यायालयाने State Environment Impact Assessment Authority (SEIAA) कडून नव्याने Environmental Impact Assessment (EIA) आणि पर्यावरणीय मंजुरी (Environmental Clearance) घेणे बंधनकारक असल्याचा आदेश दिला आहे. 2019 मध्ये पुणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या EIA मध्ये सुचविल्याप्रमाणे, चार ऋतूंचे पूर्ण पर्यावरणीय मूल्यांकन (Environmental Assessment) करणे अत्यावश्यक आहे. (संलग्न आदेशातील मुद्दा क्र. 5 पहा).
अलीकडे पुणे महानगरपालिकेच्या रस्ते विभागप्रमुखांनी माध्यमांमध्ये रस्ता बांधला जाणार असल्याची विधाने केली आहेत. हे वक्तव्य EIA प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच करण्यात आले आहे, ज्यामुळे असे दिसून येते की पर्यावरणीय मंजुरी केवळ औपचारिकता म्हणून घेतली जात आहे. आम्ही पुणे महानगरपालिकेला स्मरण करून देऊ इच्छितो की राज्यघटनेच्या कलम48(अ) आणि कलम21 नुसार जंगल, हिरवळ आणि भूजल पुनर्भरण क्षेत्रांचे संरक्षण करणे ही त्यांची संवैधानिक जबाबदारी आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावे लागले असले तरी, आम्ही वेताळ टेकडीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी जे काही करणे आवश्यक आहे ते करत राहू कारण ती पुण्याची नैसर्गिक वारसा संपत्ती आहे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी तिचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे.
-------------------------------------------
डायरी क्रमांक- 22109/2025 सुषमा दाते आणि सुमिता काळे विरुद्ध पुणे महानगरपालिका
याचिकाकर्त्यांचे वकील: सुश्री अनिता शेनॉय, सुश्री आयुष्मा अवस्थी, सुश्री सृष्टी अग्रिहोत्री
पीएमसीकडून प्रतिनिधित्व: श्री तुषार मेहता(भारताचे सॉलिसिटर जनरल), श्री अभिजित कुलकर्णी
Service Advisor told me, I have to wait as my waiting number is 5. Even on reaching on the time I have to wait. What is the use of taking appointment and coming on time?
This happens everytime.
@royalenfield@BrahmaMotors I took an online appointment for Servicing at Brahma Motors, Wakadewadi, Pune. I received a call from the service centre a day prior. The lady on the phone asked me to come at 9:15 as service advisors come at 9:15. I reached the service centre at 9:15
@sundarpichai@GoogleMyBiz@Google@googlemaps@google Can you please connect me with the GMB Support Team? My business has been suspended for 15days with no update on my appeal causing me tremendous monetary loss. Please connect me to a real person or email, not bots. Thank you
@GoogleMyBiz My business profile has been suspended for over a week. I've already submitted an appeal but haven't received any updates. Can you please assist me in resolving this issue urgently? Thank you! #GoogleMyBusiness#SmallBusiness#CustomerSupport
#serverdown
झुकेरबर्गचं आणि त्याच्या बायकोचे काहीतरी भांडण झाले असेल. चिडून तिनी घरातली कुठली तरी वायर ओढून काढली असेल. त्यामुळे सगळं बंद झाले असेल!😢
#परांजपेचष्मेवाले
Paranjpe Vision Care
#Unlock
From Monday, 9 Aug.
- 9:30 am to 8:00pm
- All Days of the Week
- Call for Appointment: +919890147825
#ParanjpeChashmewale
सोमवार ९ ऑगस्ट पासून
- सकाळी ९:३० ते रात्रौ ८:००
- आठवड्याचे सर्व दिवस
- अँपॉईंमेंट साठी संपर्क: +९१९८९०१४७८२५
#परांजपेचष्मेवाले
@KOLHAPUR_POLICE बेळगाववरून पुण्याला जाण्यासाठी खालील राष्ट्रीय महामार्ग (१६०) चालू आहे का कृपया कळवावे:
Gotur-Chikodi-Kagwad-Takli Phata-Tasgaon.
नंतर व्हाया २६६ पळूस - कऱ्हाड.
धन्यवाद
@PMOIndia@CMOMaharashtra@MoHFW_INDIA@HRDMinistry पुण्यासारख्या शहरात, भर मध्यवस्तीत ही अवस्था असेल तर अवघड आहे!🤦🏻♂️
दोषींवर फक्त कारवाई करून उपयोग नाही. अशी घटना परत घडणारच नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे.