संचालक पुणे जिल्हा दूध संघ, कात्रज दूध A National Level #Archer who wishes to make India proud. Shivchattrapati Award winner! A lawyer #milk#ncp#ajitdadapawar
आज पुणे जिल्हा ग्रामीण तालुका निहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, त्यावर उपाययोजना करू, असं आश्वासन दिलं. तसंच लोकांमध्ये सक्रिय राहून पक्ष अधिक बळकट करण्याच्या व विकासकामांमध्ये तत्परतेनं सहभागी होण्याच्या सूचना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या.
यावेळी दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या वाढीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. यावेळी डिस्ट्रीब्यूटर्सच्या अडचणी जाणून घेत मार्गदर्शन केले आणि दूध वाढीचे ठोस आश्वासन दिले.
या बैठकीस माझ्यासह श्री. पांडुरंग गुरव, अमोल बागमार, सुलोचना धुमाळ, अमित गांधी, भरत सोनवणे व संजय हांडे उपस्थित होते.
🌟फ्रेश डिस्ट्रीब्यूटर्स व मार्केटिंग टीमची बैठक संपन्न..
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे सन्माननीय संचालक श्री. निखिल तांबे व व्यवस्थापकीय संचालक मा. मनोज लिमये साहेब यांच्या उपस्थितीत फ्रेश डिस्ट्रीब्यूटर्स व मार्केटिंग टीमची बैठक संपन्न झाली.
🇮🇳 भारताची महिला Grandmaster!
♟️ जॉर्जिया येथे झालेल्या महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत नागपूरच्या दिव्या देशमुखने केवळ १९व्या वर्षी विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे.
भारताचीच कोनेरु हंपी या स्पर्धेची उपविजेता ठरली आहे..
दोघींचेही या अतुलनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !! 💐
#FIDE
World University Games मध्ये भारताची अभिमानास्पद कामगिरी –
🥇 2 Gold
🥈 5 Silver
🥉 5 Bronze
🇮🇳 भारताचं नाव उज्वल करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला सलाम!
#WorldUniversityGames#SportsInIndia#GlobalStage
२०३६ ऑलिम्पिकसाठी भारत होतो आहे सज्ज !!
मा. केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी २०३६ ऑलिम्पिकच्या तयारीसाठी देशातील ३००० खेळाडूंना शासनाकडून दरमहा ५०००० रुपये मानधन देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
#SwapnilDhamdhere#Maharashtra#Olympic2036#India#IndiaAtOlympics
📍 सैनिक भाऊ करंदी, शिरूर
मा. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सैनिक भाऊ करंदी, शिरूर येथे पशुवैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले.
ज्यात जंतमार औषधाच्या ११३ बाटल्या, गोचीडमारच्या १२ बाटल्या वाटप करण्यात आल्या.
तसेच ६३ जनावरांची मोफत तपासणी करण्यात आली.
आर्मी कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सुधीर कुमार, कमांड हॉस्पिटलचे कर्नल A. S. शेळके, सर्दन कमांड हेड कर्नल ज्योती गुप्ता, व कमांडिंग ऑफिसर कर्नल ईश्वर दास यांनी पुणे जिल्हा सहकारी दूध संघ, कात्रज येथे भेट दिली. त्यावेळी चेअरमन या नात्याने संपूर्ण टीमचे स्वागत केले.
#KatrajDairy
राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते मा. श्री. अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नानगाव, दौंड येथील पशुवैद्यकीय शिबिरामध्ये जंतनिर्मुलनाच्या ८२, गोचीड निर्मूलनाच्या ८ बाटल्या वाटप व जनावरांची मोफत तपासणी करण्यात आली.
या शिबिरांच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन !
मा. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या तसेच मा. माजी आमदार श्री. अतुल शेठ बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त पशुवैद्यकीय आरोग्य शिबिर व नळावणे येथे श्री कुलस्वामिनी सहकारी दूध उत्पादक संस्थेला कात्रज दूध संघाच्या वतीने देण्यात आलेल्या ५,००० लिटर क्षमतेच्या बल्ककुलरचे उद्घाटन..