खा. संजय राऊत : लेखणी ��े राजकारण..
राजकारणात अनेक नेते निवडणुका जिंकून मोठे झाले, काही सत्तेच्या जोरावर पुढे आले. परंतु काही व्यक्तिमत्त्वांनी आपल्या लेखणीच्या बळावर, वक्तृत्वाच्या जोरावर आणि राजकीय आक्रमकतेच्या माध्यमातून स्वतंत्र ओळख निर्��ाण केली. खासदार संजय राऊत हे त्यापैकी एक महत्त्वाचे नाव आहे.
संजय राऊत यांचा प्रवास पारंपरिक राजकारण्याचा नाही. ते प्रथम पत्रकार, नंतर संपादक आणि त्यानंतर राजकारणी झाले. त्यामुळे त्यांचे राजकारण हे निवडणूक प्रचारातून नव्हे, तर विचार, लेखन आणि सार्वजनिक संवादातून घडले. महाराष्ट्रात पत्रकारितेतून राष्ट्रीय पातळीवर प्रभाव निर्माण करणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
१९८९-९० च्या दशकात त्यांनी पत्रकार म्हणून अत्यंत संवेदनशील विषय हाताळले. त्या काळात मुंबई अंडरवर्ल्ड, बिहारमधील बाहुबली राजकारण, जातीय संघर्ष, संघटित गुन्हेगारी आणि सत्तेचे गुन्हेगारीशी असलेले संबंध या विषयांवर वार्तांकन करणे धोकादायक मानले जात होते. अशा वातावरणात काम केल्यामुळे त्यांच्यात परिस्थितीला थेट सामोरे जाण्याची वृत्ती निर्माण झाली. आज त्यांच्या भाषणांमध्ये दिसणारी निर्भीडता ही केवळ राजकीय शैली नसून त्यांच्या पत्रकारितेच्या अनुभवातून घडलेले व्यक्तिमत्त्व आहे.
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी लोकांशी संवाद साधण्यासाठी ‘सामना’ हे मुखपत्र सुरू केले. पुढे या वृत्तपत्राचे संपादकीय नेतृत्व करताना संजय राऊत यांनी केवळ बातम्या लिहिल्या नाहीत, तर शिवसेनेची राजकीय विचारधारा, भूमिका आणि शैली शब्दांत मांडली. अनेक दशकांपर्यंत ‘सामना’चा अग्रलेख हा महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेचा विषय ठरत राहिला. यामुळे ते केवळ संपादक राहिले नाहीत, तर पक्षाचे वैचारिक प्रतिनिधी बनले.
राजकारणात त्यांनी कोणतीही थेट निवडणूक लढवलेली नाही. २००४ पासून ते राज्यसभेचे सदस्य आहेत. संसदेत त्यांनी राष्ट्रीय राजकारण, संघराज्य व्यव��्था, महाराष्ट्राचे प्रश्न आणि पक्षाच�� भूमिका ठामपणे मांडली. ते जनतेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसले तरी माध्यमांमधील त्यांची उपस्थिती अनेक निवडून आलेल्या नेत्यांपेक्षा अधिक प्रभावी राहिली आहे.
२०१९ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या मोठ्या सत्ताबदलानंतर संजय राऊत सर्वाधिक चर्चेत आले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या काळात ते सातत्याने माध्यमांसमोर दिसत होते. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते, त्या काळातील संवाद प्रक्रियेतील ते महत्त्वाचे सार्वजनिक चेहरे होते. त्यानंतर २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडली तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे सातत्याने समर्थन करणारे ते प्रमुख नेते ठरले.
संजय राऊत यांच्या राजकारणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची संवादक म्हणून असलेली क्षमता. पत्रकार परिषद, मुलाखती, अग्रलेख किंवा संसदीय भाषण अशा कोणत्याही माध्यमातून ते आपली भूमिका स्पष्टपणे मांडतात. त्यामुळे त्यांचे समर्थक त्यांना पक्षाचा प्रभावी आवाज मानतात, तर विरोधक त्यांच्या भाषेला वादग्र��्त म्हणतात. या दोन टोकांच्या मतांमध्येच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये दडलेली आहेत.
त्यांच्या कारकिर्दीत अनेक वादही झाले. विविध वक्तव्ये, चौकशा, न्यायालयीन प्रक्रिया आणि राजकीय संघर्ष यांमुळे ते सातत्याने चर्चेत राहिले. मात्र या सर्व घडामोडींमध्ये त्यांनी सार्वजनिक संवादापासून कधीही अंतर ठेवले नाही. उलट प्रत्येक आव्हानाला उत्तर देताना त्यांनी अधिक ठामपणे आपली भूमिका मांडली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवसेनेत अनेक बदल झाले. नेतृत्व बदलले, पक्षात फूट पडली, निवडणूक चिन्ह बदलले. या सर्व घडामोडींमध्ये संजय राऊत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचे सार्वजनिक समर्थन करणारे प्रमुख नेते राहिले. त्यामुळे त्यांची ओळख केवळ राज्यसभेचे खासदार म्हणून नसून पक्षाचे प्रमुख प्रवक्ते आणि रणनीतीकार म्हणूनही आहे.
संजय राऊत यांचे व्यक्तिमत्त्व एका चौकटीत मावणारे नाही. काहींसाठी ते निर्भीड पत्रकार आणि प्रभावी राजकीय विश्लेषक आहेत, तर काहींसाठी संघर्षात्मक राजकारणाचे प्रतिनिधी. मात्र गेल्या तीन दशकांत त्यांनी पत्रकारिता, लेखन, वक्तृत्व आणि राजकीय हस्तक्षेप यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या लेखणीने आणि सार्वजनिक संवादशैलीने सम��ालीन महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितच ठसा उमटवला आहे.
@rautsanjay61
#Maharashtra #SanjayRaut
हा टोमणा नाही, ही अतिशयोक्ती नाही , किंवा आपल्या IT सेल प्रमाणे कुठलेही फेक नरेटीव नाही. आपणच 2022 साली केलेल्या ट्विट चा आरसा आहे.
आता सांगा बरं फडणवीस साहेब तुमची "अच्छे दिन" ची संकल्पना हीच होती का.. मराठवाडा विदर्भात डिझेल पेट्रोल साठी पंपांवर रांगा लागल्या आहेत. माळशिरस अकलूज मध्ये शेतीसाठी वापरली जाणारी वीज आठ तासावरून पाच तासावर आणली आहे. पुण्यातली मेट्रो पहिल्याच पावसात पाण्याने डबडबून गेली आहे. महागाईच्या विरोधात पुण्यामध्ये आंदोलन होऊ नये म्हणून घाबरून जाऊन पंधरा दिवसाची संचारबंदी लागू केली आहे. पुण्याचे नवे शिल्पकार म्हणून तुमच्याकडे याची काय उत्तर आहेत... ?
@Dev_Fadnavis
पूर्ण भरलेल्या बसचा ड्रॉयव्हर
जीवघेण्या घाटातून बस चालवतांना शीळ घालत , गाणे म्हणत, प्रवाशांशी हसत खेळत बस चालवतो का तंबाखूची गुळणी तोंडात ठेवून, गंभीर चेहऱ्याने य���ने मला काहीही फरक पडत नाही.
त्याने घाट धोकादायक असण्याचे कारण न देता, साऱ्या प्रवाशांना सुखरूप मुक्कामाला पोचवणे हे त्याचे प्राथमिक ��णि नॉन निगोशिएबल काम आहे ; त्याचे दिसणे, हसणे सारे दुय्यम ;
______________________
हृदयाच्या वा मेंदूच्या शस्त्रक्रिया करणारा शल्यविशारद
प्रत्यक्ष ऑपरेशनच्या वेळी चेहऱ्यावर काय भाव ठेवतो याने मला काहीही फरक पडत नाही
त्याने शस्त्रक्रिया अवघड आहे असे कारण न देता, शस्त्रक्रियेनंतर मी लवकरात लवकर खडखडीत बरा होणे हे प्राथमिक आणि नॉन निगोशिएबल ; बाकी सारे दुय्यम
_______________________
ज्या दाईकडे मी माझे बाळ दिवसभर सोपवून जाते
ती दाई सलवार कमीज घालते की साडी ; शाकाहारी आहे की मांसाहारी याने मला काहीही फरक पडत नाही
दाईने बाळ खूप रडते असे कारण न देता, बाळाच्या खाण्या / पिण्याच्या , सुरक्षतितेतच्या गोष्टी सांभाळणे हे प्राथमिक आणि नॉन निगोशिएबल ; बाकी साऱ्या दुय्यम गोष्टी
______________________
मी निवडून दिलेला राज्यकर्ता / नेता
कधी भावनिक होतो , कधी रडतो, कधी जोरजोरात बोलतो, किती चांगले भाषण करतो याने मला का��ीही फरक पडत नाही
त्याने कोणतीही आंतरराष्ट्रीय घडामोडींची कारणे न देता कोट्यवधी ग्रामी�� / शहरी नागरिकांचे दैनंदिन आयुष्य अधिक सुखावह करण्यासाठी ; त्यांच्या मुलाबाळांचे भविष्य घडवण्यासाठी , सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करावे हे प्राथमिक आणि नॉन निगोशिएबल , बाकी साऱ्या गोष्टी दुय्यम
संजीव चांदोरकर ( २७ मे २०२६)
महाराष्ट्रात 32 खासदार हे विरोधकांचे आहेत
तुम्हाला हे कुठे नीट घोटाळा च्या विरोधात प्रोटेस्ट करताना दिसतात??
आणि नंतर म्हणतील की सीजेपी ही
भाजप किवा आप ने बनवली आहे
तुम्ही काय करताय ??
या रोडवर पोरांसाठी …
नसरापूर प्रकरण-विरोधी पक्ष शांत
नीट पेपर घोटाळा - विरोधी पक्ष शांत
अशोक खरात अत्याचार प्रकरण - विरोधी पक्ष शांत
राज्यातील प्रचंड वृक्षतोड - विरोधी पक्ष शांत
महाराष्ट्रातील विरोधी पक्षांना शांततेचे नोबेल पारितोषक दिले पाहिजे.
दिलेच पाहिजे.
Journalism is sometimes confrontational. We seek answers. If any interview subject, especially with power, do not answer what I asked, I will try to interrupt and get a more focused response. That is my job & duty. I want answers and not just talking points.