Primeminister of India, Narendra Modi, would not take my question, I was not expecting him to.
Norway has the number one spot on the World Press Freedom Index, India is at 157th, competing with Palestine, Emirates & Cuba.
It is our job to question the powers we cooperate with.
What exactly is going on in the Maharashtra govt run Yerwada Mental Hospital? Why is the rector’s official residence used as a church to proselytise people? Cc @CMOMaharashtra
@gajabhauX आता एकूण मतदान ५ लाख ३ हजार ५३९ झाले आहे. लोकसभेनंतर ४५ हजार नवमतदार कुणाच्या पथ्यावर पडतात यावर गणित अवलंबून आहे. तरी बापूसाहेब पठारेंची हवा जोरदार आहे.
संभाजी ब्रिगेड राज्यस्तरीय अधिवेशन
आज वाशी येथे संभाजी ब्रिगेड राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित राहून मनोगत व्यक्त करत सं��ोधित केले.
महाराष्ट्र पुरोगामी म्हणून ओळखला जातो. या महाराष्ट्रात अनेक क्रांतिकारक, समाजसुधारक, विचारवंत, संत होऊन गेले. त्या महापुरुषांचे विचार व कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी संभाजी ब्रिगेड सातत्याने प्रयत्न करत आहे. युवकांच्या हाती लाट्या काठ्या न देता युवकांच्या हातात पुस्तक देणारी संघटना म्हणून संभाजी ब्रिगेडचं नाव घेतलं जातं. त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
#संभाजी_बिग्रेड #SambhajiBrigade #वाशी #Washi #नवी_मुंबई #पुरोगामी_महाराष्ट्र #Maharashtra #शुभेच्छा
संभाजी ब्रिगेड राज्यस्तरीय अधिवेशन वाशी, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आले. या अधिवेशनात सहभागी झालो व उपस्थितांशी संवाद साधला.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, भारताच्या लोकसभेचे सन्माननीय सभासद छत्रपती शाहू महाराज, ज्यांचा आपण विश्वभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला ते श्रीयुत राजेंद्र पवार, विनोद शिंदे, सतीश मगर. हा सन्मान सोहळा आयोजित करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले आणि संभाजी ब्रिगेड या संस्थेची स्थापना करून गेली सत्तावीस वर्ष इतिहास, सांस्कृतिक, सामाजिक या सगळ्या क्षेत्राच्या बरोबर अर्थकारणाचा विचार हा जनमानसामध्ये रुजवण्याबद्दलची क���ळजी ज्यांनी घेतली ते प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले निरंजन टकले, चंद्रकांत झटाले अन्य सगळे मान्यवर निमंत्रित आणि सहकारी बंधू भगिनींनो.
आज दिवसभर राज्यस्तरीय अधिवेशन आपण या ठिकाणी आयोजित केलं. विविध प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत त्यातून मार्ग काढून आत्मविश्वासा��े उभी झालेली ही पिढी तयार करणं यासंबंधी अत्यंत मोलाची कामगिरी संभाजी ब्रिगेडच्यावतीने गेली अनेक वर्षे केली जाते. आज याठिकाणी अनेकांची भाषणं आपण सकाळपासून ऐकली. ज्ञानेश महाराव या ठिकाणी बसलेत त्यांचं भाषण आपण या ठिकाणी ऐकलं. अनेक प्रकारची आव्हानं आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. नेहमीच्या चौकटीच्या बाहेर जाऊन त्या आव्हानांवर मात करण्याच्या संबंधीची हिंमत ही दाखवण्याची आज अत्यंत गर�� आहे.
आपण काही क्षेत्रामध्ये काम करतो, शेतीच्या क्षेत्रामध्ये काम करतो, आपल्यातले काही सहकारी व्यवसायामध्ये गुंतलेत आणि त्याशिवाय अनेक क्षेत्रांमध्ये जाण्याची आवश्यकता तुम्हा लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न संभाजी ब्रिगेडच्या वतीने सतत केला जातो. हा देश शेतीप्रधान आहे. आपण याठिकाणी सन्मान करत असताना शिंदेंचा सत्कार केला. त्यांनी कंपनी काढली जिचं नाव सह्याद्री आणि आज सह्याद���री कंपनी, माझी अगदी आग्रहाची सूचना तुम्हाला आहे. कधी नाशिकला गेलात तर सह्याद्रीवर चक्कर जरूर टाका. काही शेतकरी एकत्र येतात आणि शून्यातून एक कंपनी तयार करतात. शेती उत्पादन वाढवतात त्या उत्पादनावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था करतात आणि देशातील नव्हे तर जगाच्या बाजारपेठेमध्ये आपण काही करू शकतो या प्रकारचा इतिहास घडवतात. हा इतिहास घडवल्यानंतर, कर्तुत्वदृष्टी ज्यांनी दाखवली ते तुम्हा सगळ्यांच्यापैकीच एक होते. त्यांची पार्श्वभूमी काही टाटा बिर्लाच्या घरातली नव्हती. पण शेतीच्या क्षेत्रामध्ये आधुनिक विज्ञानाचा आधार घेऊन आपण काही वेगळं करू शकतो या प्रकारचा दृष्टिकोन त्यांनी स्वीकारला आणि तो अंमलात आणला. आपण नेहमी सांगतो की भारत हा शेतीप्रधान देश आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतेय आणि देशातील शेती कमी व्हायला लागली. आपण विकासाचे अनेक प्रकल्प हातामध्ये घेतो,धरणं बांधतो, औद्योगिक वसाहती करतो, नागरीकरण वाढतं आणि या सगळ्याला शेतीची जमीन जात असते.
अलीकडच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये महामार्ग तयार करण���याची भूमिका सरकारने स्वीकारली आणि त्या महामार्गात सुद्धा शेवटी जमीन जाते ती शेतीची जमीन जाते. याचा अर्थ शेतीची जमीन कमी होते आणि दुसऱ्या बाजूनं शेतीवरचा बोजा हा वाढत चाललेला आहे. ज्यावेळेला 15 ऑगस्ट 1947 ला आपण स्वातंत्र्य झालो त्यावेळेला देशाची लोकसंख्या 30 ते 32 कोटी होती. आज ती तिप्पट चौपट वाढलीये. ऐवढा प्रचंड बोजा शेतीवरती पडला. हे क्षेत्र कमी झालं आणि मर्यादित क्षेत्रावर शेती करण्याच��� भूमिका ही करण्याची स्थिती आपल्या सगळ्यांवरती आली. यात यश मिळवायचं असेल तर आधुनिकत्येला दुर्लक्षित करून चालणार नाही. शेतीच्या क्षेत्रामध्ये बी बियाणं असेल आणि या पद्धती असतील याच्यात प्रचंड बदल होतायत, संशोधन होतंय आणि त्या संशोधनाचा आधार घेऊन आपण शेतीची उत्पादकता वाढवणं आणि शेती करत असताना त्याला जोडधंद्याची जोड देणं या गोष्टी केल्याशिवाय शेतीचं अर्थकारण हे खऱ्या अर्थाने व्यव��ारी होणार नाही.
आत्महत्या हा शेती आणि शेती व्यवसायाला लागलेला एक गंभीर रोग आहे. ही आत्महत्येची स्थिती बदलायची अस���ल तर उत्पादकता वाढवली पाहिजे, विज्ञानाचा आधार घेतला पाहिजे, तयार झालेल्या मालावर प्रक्रिया करण्याचा विचार हा करायला पाहिजे आणि हे सगळं करत असताना जगाची बाजारपेठ कशी प्राप्त करायची याच्यामध्ये सुद्धा लक्ष केंद्रित करावं लागेल. त्यादृष्टीने एक प्रकारची विचारी नवी पिढी ही तयार कशी करता येईल आणि ती तुम्ही केली तर तुमच्यापासून तिचा बोध घेऊन तुमचा शेजारी, तुमचा मित्र तोही त्या रस्त्या��े कसा जाईल याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तरच हे चित्र बदलणार आहे.
आज या ठिकाणी ज्यांचा ज्यांचा तुम्ही सन्मान केला शेतीच्या क्षेत्राच्या योगदानाच्याबद्दल माझ्या मते ही फार चांगली गोष्ट तुम्ही केली. सह्याद्रीचा उल्लेख मी केला. सतीश मगर याठिकाणी आहेत. त्यांनी पूर्ण माहिती सांगितली नाही. आज मगरपट्टा हा देशाच्या समोर एक उदाहरण झालंय. आज मगरपट्टा, एकेकाळी उसाची शेती करणारा हा सगळा परिसर. मला आठवतंय की आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जेव्हा पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला आम्हा लोकांच्यापुढे राजकारणाचे धडे देण्याच्या��ाठी आणि साथ देण्याच्यासाठी जे अनेक वरिष्ठ आणि वडीलधारी आमचे सहकारी होते त्याच्यामध्ये आज सतीश मगर आहेत त्यांचे कुटुंबीय सुद्धा अण्णासाहेब मगर हे आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक होते. पण उत्तम शेती करून नंतरच्या काळामध्ये पुणे शहर वाढायला लागलं. शहर वाढतंय तशी शेती करण अवघड होतय. काम करण्यासाठी लोक मिळत नाहीत, उत्पादन खर्च वाढतो, आणि शेती ही दिवसेंदिवस संकटात नेण्याचं काम करतेय. आता हे न���गरिकरण आहे याची नोंद घेऊन आपण बदल केला पाहिजे हा विचार त्या ठिकाणी सतीश मगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्यात आला. स्वतः बाहेरून शिक्षण घेऊन आले आणि आल्यानंतर जमिनीचे तुकडे करायचे आणि ती जमीन विकायची आणि त्यातून आलेल्या पैशाने आयुष्य जगायचं या प्रकारची सरंजामी पद्धती शहरांच्या जवळच्या अनेक शेतकऱ्यांच्या मध्ये असते पण सतीश मगरांनी वेगळा दृष्टिकोन ठेवला. त्यांनी एक नवीन शहर निर्माण कर��� शकतो का? या दृष्टिकोनातून पावले टाकली आणि जेवढे शेतकरी त्या भागातले होते त्या सगळ्यांच�� एक संस्था स्थापन केली. त्या संस्थेच्या मार्फत आधुनिकतेचा आधार घेऊन त्या जमिनीचं नियोजन योग्य करून एक नवीन औद्योगिक नगरी ही उभी केली. ती औद्योगिक नगरी ही वेगळी नगरी आहे. आताच जग हे आयटीचे जग आहे आणि त्या आयटीसाठी उत्तम प्रकारची सुविधा देणारं एक काम या नगरीच्या मार्फत करू शकतो हा दृष्टिकोन त्यांनी घेतला आणि त्याची उभारणी केली. आज हजारो लोकांना त्या ठिकाणी काम मिळतं. मला आनंद आहे की महार���ष्ट्राचे आणि महाराष्ट्राच्याबाहेरचे सुद्धा तरुण आज त्याठिकाणी येतात, कष्ट करतात आणि देशाच्या संपत्तीत भर टाकतात. आणि ते जे शेतकरी जमीन विकून थोडेबहुत पैसे मिळाले असते त्याऐवजी त्या संस्थेचे ते संचालक सभासद झाल्यामुळे आज दरवर्षाला त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न आज त्या शेतीच्या या संस्थेच्या पद्धतीतून मिळत.
हे इथेच थांबलेलं नाही. शेतकऱ्यांच्या घरातील मुली त्या दुसरा काही व्यवसाय करू शकतील का? हजार लोकांना काम मिळाल्याच्यानंतर त्या हजारो लोकांचा चहापान अन्न हा खर्च हा दिवसेंदिवस वाढतच असतो मग त्याच्यासाठी कोणीतरी बाहेरून येण���याच्याऐवजी आपल्याच कुटुंबाच्या मुली या क्षेत्रामध्ये उतरल्या आणि काही व्यवसाय करू शकल्या तर त्यावर प्रोत्साहन दिल. त्यात त्या यशस्वी झाल्या. नवीन पिढी ही आणखीन काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करत असते पण त्याच्यासाठी जिथं हजारो लोक काम करतात त्या हजारो लोकांना वाहनाची व्यवस्था लागते आणि म्हणून गाड्या एकत्र करून व्हेईकलची किंवा प्रवासाची सुविधा ही देण्याच्यासाठी काही करता येईल क�� त्या दृष्टिकोनातून ट्रान्सपोर्टची व्यवस्था त्यांनी केली आणि आज मगरपट्टा हे अतिशय उत्तम प्रकारचं काम त्या ठिकाणी करतंय आणि नव्या पिढीला एक प्रकारचं आत्मविश्वासानं आपण हे करू शकतो हे चित्र त्यांनी निर्माण केलं.
राजेंद्र पवारांनी आज कृषीच्या क्षेत्रामध्ये काम केलंय. बारामती ॲग्रो नावाची कंपनी काढली गेली आणि त्या कंपनीच्या मार्फत अनेक गोष्टी हातामध्ये घेतल्या. त्यामधून शेती आणि शेतीवर आधारित अन्य काही व्यवसाय असतील. आज दुधाचा धंदा वाढत असल्याच्यानंतर त्या जनावरांच्या साठी खाद्याच्या साठी निर्मितीची गरज असेल अशा अनेक गोष्टी आहेत त्या गोष्टीची निर्मिती करून आपण कारखानदारी काढू शकतो या प्रकारचा आदर्श त्यांनी केला. यातून नव्या पिढीला एक प्रकारचं प्रोत्साहित करण्याचं काम त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी झालेलं आ��े आणि म्हणून मी हे सांगितलं एवढ्यासाठी की आपण थोडीशी चाकोरी बदलली पाहिजे. नेहमीचा आपला जो व्यवसाय आहे तो करूया पण सगळ्यांना तिथे गुंतवायचं का? सगळ्यांची शक्ती त्या ठिकाणी लावायची का? याबद्दल फेरविचार करण्याची वेळ आली आहे.
आज जगातील अनेक देशांमध्ये भारतीय बघायला मिळतात. प्रामुख्याने शीख समाज बघा, तमिळनाडू मधील मद्रासी घटक बघा, गुजरात मधील गुजराती बघा. अमेरिकेमध्ये तुम्ही गेलात तर रस्त्याने जात असताना जेवढे पेट्रोलचे पंप असतील आणि छोटे रेस्टॉरंट असतील त्याच्यात जास्तीत जास्त मालकी ही भारतातून आलेल्या लोकांची आहे. हे सगळे लोक प्रामुख्याने गुजरात या राज्यातून त्या ठिकाणी गेले आहेत. ब्राझीलमध्ये आपण गेलात तर उत्तम शेती करणारे शेतकरी भारतीय त्या ठिकाणी मिळतात. विशेषतः तामिळनाडू आणि पंजाब, हरियाणा या भागातून ते आलेले असतात. याचा अर्थ एकच आहे की कुठल्याही क्षेत्रा���ध्ये जायचं असेल तर जगात कुठेही जाण्याची तयारी ठेवणे आणि कसलाही प्रकारचा उद्योग आम्ही कष्टाने करू शकतो, यशस्वी होऊ शकतो त्यासाठी मेहनत करण्याची तयारी ही जर तुम्ही ठेवली तर शंभर टक्के यशस्वी होता, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
संभाजी ब्रिगेड यांचे प्रामुख्याने अलीकडचे काम त्यांच्या पुण्याच्या एका बैठकीमध्ये मी गेलो होतो. अर्थकारण या विषयावर त्यांचे आता लक्ष जास्त आहे. नव्या पिढीने अर्थकारणाला महत्त्व द्यायला हवे. उद्योग किंवा व्यवसाय काही ना काहीतरी करणे आणि त्यातून प��ढे जाणे व ते करत असताना आपल्यासारखे जे अनेक नवे तरुण जे येऊ इच्छितात त्यांना प्रोत्साहन करणं वेळेप्रसंगी मदत करणं हा दृष्टिकोन जर आपण ठेवला तर ही सगळी तरुण पिढी जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. अधिक हातांना काम देण्याची त्यांची तयारी राहिली पाहिजे. आम्हाला काम देणारे तयार करायचे आहेत आणि ते काम देणाऱ्यांची पिढी तयार करण्यासाठी एक दृष्टिकोन, विचारधारा ही बदल्याची आवश्यकता आहे. मला समाधान एका गोष्टीचे आहे की, प्रवीण दादा आणि त्यांचे सहकारी गेले काही वर्ष या कामात अधिक लक्ष द्यायला लागले आहेत. काम देणारा तरुण कसा तयार होईल? यामध्ये त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. ही भूमिका घेत असताना तुमच�� आणि माझी सगळ्यांची जबाबदारी आहे की त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करणं. ते काम करतात तसेच काम आपापल्या भागामध्ये वाढेल कसं व इतरांना आपण प्रोत्साहित कसे करू? त्यांचा आत्मविश्वास कसा वाढवू? या दृष्टिकोनातून आपण काळजी घेतली पाहिजे. ते काम तुम्ही करावं एवढीच माझी अपेक्षा आहे.
आज शिवछत्रपतींच्या नावाने आपण अनेक गोष्टी सांगतो. शिवछत्रपतींनी समाजातील अठरापगड जातींना बरोबर घेतलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी हे राज्य उभे करताना दृष्टिकोन ठेवलं. मी अनेकदा सांगतो रयतेचे राज्य उभी करण्याची त्यांनी भूमिका घेतली. रयतेच्या हातामध्ये हे राज्य जर चालवायचे असेल तर अठरापगड जातींना बरोबर घेणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना दृष्टी देणे व त्यांच्यामार्फत राज्य उभे करणे हे काम शिवाजी महाराजांनी केले. हे सगळं करताना समाजातील ज्या दृष्ट प्रवृत्ती आहेत याचा किंचितही संबंध असता कामा नये. संभाजी ब्रिगेड यासाठी अत्यंत मोलाची कामगिरी करेल याचा मला विश्वास आहे, त्यासाठी मी त्यांना अंतःकरणापासून शुभेच्छा देतो व त्यांचे अभिनंदन करतो.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंतचा गेम आहे हा अण्णाजी पंत तसेच रंगा बिल्लाने पाण्यात टाकलेली गळ आहे ही, हुरळून जाऊ नका, मुंबई गळाला लागताच पुन्हा चेकमेट होणार
@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Dev_Fadnavis मुंबई महापालिकेच्या न��वडणुकीपर्यंतचा गेम आहे हा अण्णाजी पंत तसेच रंगा बिल्लाने पाण्यात टाकलेली गळ आहे ही, मुंबई गळाला लागताच पुन्हा चेकमेट होणार
@waglenikhil मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंतचा गेम आहे हा अण्णाजी पंत तसेच रंगा बिल्लाने पाण्यात टाकलेली गळ आहे ही, मुंबई गळाला लागताच पुन्हा चेकमेट होणार
@amolmitkari22 मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंतचा गेम आहे हा अण्णाजी पंत तसेच रंगा बिल्लाने पाण्यात टाकलेली गळ आहे ही, मुंबई गळाला लागताच पुन्हा चेकमेट होणार
@amolmitkari22 संघाच्या व्यवस्थेची मांडलिक न्यायव्यवस्था हा निर्णय देणे अपेक्षितच होते. शिंदे गट शिवसेनेतच असल्याची बतावणी करीत असताना ठाकरे सरकार अल्पमतात कसे ? आणी शिंदे गटाचे तसे पत्रही नसताना निवडा संघप्रणित भाजपच्याच बाजूने येणे हे संविधान संपवणारी घटना आहे.