@VikramPachpute_@RRPSpeaks@vishwajeetkadam
महाराष्ट्राचे आणि MPSC विद्यार्थांचे हे २ दादा ….. यांच्या मुळेच हे शक्य झाल.
मनापासून धन्यवाद 🙏🏻 रोहित दादा आणि विश्वजीत दादा ✌🏻🚩
धन्यवाद…!
अखेर MPSC च्या विविध परीक्षांच्या पेपरफुटीसह आणि शिपाई ते अध्यक्ष यांची चौकशी करुन आयोगाच्या संपूर्ण शुद्धीकरणासाठी Commissions Of Enquiry Act-1952 अंतर्गत न्यायिक आयोग स्थापन झाला. आयोगाकडून औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेसह Group B, Group C तसंच इतर संशयित परीक्षांचीही चौकशी होणार आहे. आयोगाला असलेले अधिकार बघता खालपासून वरपर्यंत संपूर्ण शुद्धीकरण होईल तसंच ३१७ च्या पुढील कारवाईसाठी शिफारस होईलच, ही अपेक्षा!
विद्यमान सदस्य अभय वाघ हे मोठे ‘खिलाडी’ असून त्यांना देखील भीमनवार यांच्याप्रमाणे रजेवर पाठवावे, अशी विद्यार्थ्यांची तीव्र भावना आहे. याबाबत सरकारने लक्ष घालावं, ही विनंती! Group B संदर्भात पुढच्या आठवड्यात न्यायिक आयोगाला भेटणार असून शक्य असतील तेवढे सर्व पुरावे आपल्याला द्यायचे आहेत, त्यामुळं विद्यार्थ्यांनी सर्व पुरावे विद्यार्थी प्रतिनिधी किंवा आमच्याकडे जमा करावेत, एकही दोषी सुटणार नाही याची आपण काळजी घेऊ!
जब तक घर भेजेंगे नहीं... तब तक छोड़ेंगे नहीं...!
#MPSC #MPSCPaperLeak #MPSCStudents #न्यायिक_आयोग #पेपरफुटी #विद्यार्थी_एकजूट
@RahulTarange6@CMOMaharashtra@Gad@CMOMaharashtra@mpsc_office
फक्त काही विद्यार्थांची आणि क्लास चालकांची मागणी आहे म्हणून Objective Pattern सरकार ने लाऊ नये!
देशातील सगळ्याच राज्यात Descriptive Pattern आहे आणि महाराष्ट्रामध्ये चांगले अधिकारी घडवायचे असतील तर Despriptive Pattern हाच असला पाहिजे.
@Nikhil_A_Patil @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office @Nikhil_A_Patil अरे ओ….. तू नको Credit घेऊ 😡
हे काम काल रोहित दादा यांनी विरोध केल्यामुळे झाल …. BJ पार्टी तर या सगळ्या चोरांच्या पाठी मागे उभी आहे 💯
@RRPSpeaks@mpsc_office जर कोणी जास्त हुशारी करून आरोपींना मदत करत असेल तर असे सगळेच सहआरोपी करण्यात येतील!
आंदोलन फक्त स्थगित आहे इतकं लक्षात असू द्या. जर काही गैरप्रकार घडला तर या वेळेस आंदोलन अत्यंत तीव्र राहील व सरकार ला ते झेपणार नाही 😡😡😡😡
#MPSC आयोगातील महाभागांनी जास्त हुशारी करण्याचा प्रयत्नच करू नये! आंदोलन स्थगित झालं म्हणजे सर्व ��ांत झालं आणि आमचं लक्ष नाही, असं कुणीही समजू नये. पेपर फोडून विद्यार्थ्यांच्या भविष्याची होळी करणाऱ्या कुणालाच आम्ही सोडणार नाही.
चौकशी होऊद्या, पेपर फोडणारे सगळे घरी जातीलच..!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#MPSCProtest #MPSCStudents #MPSCUpdates
MPSC ला जुनी कागदपत्रे रद्दी काढून नष्ट करण्याची एवढी घाई का झाली आहे? एवढा ‘चक्रम’पणा का? न्यायिक चौकशी आयोगाचा आणि मा. तुकाराम मुंडे साहेबांच्या धाकाचा हा परिणाम आहे का? आयोगाचं संपूर्ण शुद्धीकरण करायचं असेल तर सर्व जुनी कागदपत्रं देखील तपासणं गरजेचं आहे, तरच सत्य बाहेर येईल. त्यामुळं आयोगाच्या सचिवांनी किंवा सरकारने तत्काळ दखल घेऊन चौकशी पूर्ण होईपर्यंत रद्दी नष्ट करण्याच्या या निर्णयाला स्थगिती देण्याच्या सूचना द्याव्यात...!
@Dev_Fadnavis@mpsc_office@Tukaram_IndIAS
#MPSC #MPSC_आयोग
@Ni3KumarSpeaks@Ni3KumarSpeaks लाखो विद्यार्थी ?? अरे तुझ्या बाजूला १० विद्यार्थी तरी बसले का 😂😂🤡
फक्त BJP ने उभा केलेला आंदोलन होता तुमच… काहीही होणार नाही
@Nikhil_A_Patil कितीही भुंकला तरी काही फायदा नाही …. @Nikhil_A_Patil 😂
आम्ही सगळे विद्यार्थी रोहित दादा आणि विश्वजीत दादा याच्या नेतृत्वाखाली जिंकलो आहे 🤩🥳🔥
Great victory for MPSC students who protest in Pune last fews monthes
MSPC chairman Vivek Bhimanwar resign untill the investigation compete
Govt formed committe under Tukaram Mundhe as secretary in paper leak.
Protest end now.
कुठे गेला तो प्रवक्ता आज पार्ट 2, उद्या पार्ट 3 असलं काहीतरी प्रेस घेऊन रोज बोंब मारत होता अशा लोकांन��� फाट्यावर मारत विवेक ने लढाई जिंकून दाखवली🔥💪
शेवटी अभ्यास, मुद्दा आणि सत्य जिंकत, रोज उठून निरर्थक बडबड करण्यांना जागा त्यांच्याच सरकारने दाखवून दिली😂
#आता_कसं_वाटतय doremon
@RRPSpeaks@RRPSpeaks मनापासून खूप खूप धन्यवाद दादा ♥️
गेले ११ दिवस असा वाटल की आमचा सख्खा मोठा भाऊच आमच्या बाजूला आहे.
आम्ही विद्यार्थी नेहमी तुमचे आभारी असू 🙏🏻🙏🏻
विजय विद्यार्थी एकजुटीचा…
विजय विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा…
विजय विद्यार्थ्यांच्या चिकाटीचा…
महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाच्या मार्गाने गेल्या अकरा दिवसांपासून पुण्यात सुरु असलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांच्या लढ्याला अखेर यश आलं. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सत्याग्रहाला भेट देऊन आंदोलकांशी यशस्वी चर्चा केली आणि २०२१ पासूनच्या सगळ्या पेपरफुटीच्या चौकशीसाठी न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली १९५२ च्या चौकशी कायद्यानुसार न्यायालयीन चौकशी आयोगाची स्थापना केली. विशेष म्हणजे आयोगाच्या सचिवपदी स्वच्छ प्रतिमेचे आणि धडाडीचे सनदी अधिकारी मा. तुकाराम मुंडे साहेब यांची नेमणूक करण्यात आली. यामध्ये न्या. पी. डी. नाईक, पोलीस अधिकारी लखमी गौतम, सेवानिवृत्त अधिकारी गणेश पाटील यांचाही समावेश आहे. ही चौकशी पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी विद्यार्थ्यांच्या दबावामुळं MPSC अध्यक्ष भिमनवार यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. ���्यामुळं येत्या दोन महिन्यात चौकशीच्या माध्यमातून ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ होऊन आयोगातील सर्वच आजी-माजी भ्रष्ट अध्यक्ष, सदस्य आणि अधिकारी या सर्वांचाच खरा चेहरा पुढं येईल.
महत्त्वाचं म्हणजे यापुढील सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचा, राजस्थानच्या धर्तीवर १०० रुपयांच्या कार्डवर वर्षभरातील सर्व परीक्षा घेण्याचा, वेळेत निकाल, प्रतिक्षा यादी लावणं, रिक्त जागा भरणं, जागांमध्ये वाढ यासह विद्यार्थ्यांच्या इतर १४ मागण्याही सरकारने मान्य केल्या. तसंच विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचं आणि विद्यार्थी, क्लासचालक व टेलिग्राम चॅनल चालक यांना दिलेल्या नोटीसाही मागे घेण्याचं सरकारने मान्य केलं. हा विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक एकजुटीचा विजय आहे. याबाबत सत्याग्रह सुरु असताना उपोषणाला बसलेले आणि गेली अकरा दिवस रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन! विद्यार्थी सत्याग्रहाची सांगता अशा प्रकारे गोड होताच पुण्यातील एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनस्थळी असलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला… हा जल्लोष आणि हा आनंद शब्दांच्या पलिकडे होता, यातूनच विद्यार्थी या भ्रष्ट व्यवस्थेला किती वैतागले आहेत, हेच स्पष्ट होतं.
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेले सर्वपक्षीय नेते मंडळी, आदरणीय पवार साहेब, खा. ���ुप्रियाताई, सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी, सोशल मिडिया इन्फ्ल्युएन्सर, माध्यमांचे प्रतिनिधी, सोशल मिडियात व्यक्त होणारी मंडळी यांच्यासह या आंदोलनातील सर्व संयोजक, त्यांचे सर्व सहकारी, क्लास चालक या सर्वांनी दिलेल्या पाठबळाचं हे यश आहे. याबाबत या सर्वांचे आभार! सरकारचा दबाव असतानाही सहकार्याची भूमिका घेतलेले पोलिस प्रशासन तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनातून यशस्वी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणारे मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब यांचेही आभार! आंदोलनादरम्यान, सामाजिक दायित्त्वाच्या भावनेतून विद्यार्थ्यांच्या जेवणाची काळजी घेणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात मंडळींचेही मनापासून आभार..!
आता सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे चौकशी आयोगाकडून वेळेत निष्पक्ष पद्धतीने चौकशी होईल आणि MPSC सारख्या महत्त्वाच्या संस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड मुळासकट काढून या संस्थेला पुन्हा पुनर्वेभव प्राप्त होईल आणि या संस्थेच्या माध्यमातून राज्याला गुणवत्ता असलेले प्रामाणिक अधिकारी मिळतील, असा विश्वास आहे.
या आंदोलनाचा एक भाग होण्याची संधी विद्यार्थ्यांनी विश्वासाने दिली याबाबत त्यांचे मनापासून आभार..!
#MPSCविद्यार्थी_सत्याग्रह #MPSCProtest
#विद्यार्थी_एकजूट #सत्याग्रहाचा_विजय
#विद्यार्थ्यांचा_विजय