मा. आयुक्त, ठाणे महानगरपालिका,
सविनय नमूद करतो की, ₹२,८०० कोटींच्या टीडीआरशी संबंधित या प्रकरणावर “हे प्रकरण न्यायप्रविष्ट (Sub Judice) आहे” या कारणास्तव चर्चा करता येणार नाही, असे आपण सांगत आहात. या भूमिकेबाबत योग्य स्पष्टीकरण अपेक्षित आहे.
₹२,८०० कोटी मूल्याच्या टीडीआरला मान्यता देणारे प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करण्यापूर्वी आपण महासभेची (General Body) परवानगी, संमती किंवा मान्यता घेतली होती काय?
माझ्या मर्यादित माहितीनुसार, अशा महत्त्वपूर्ण आर्थिक परिणाम असलेल्या प्रकरणातील प्रतिज्ञापत्राची माहिती महासभेच्या निदर्शनास आणणे आवश्यक होते. महासभा ही ठाणेकर जनतेचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च लोकशाही संस्था आहे.
सार्वजनिकरीत्या उपलब्ध नोंदींनुसार, संबंधित विशेष अनुमती याचिका (SLP) माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक २९ मे २०२६ रोजी पक्षकारांमधील समझोता नोंदवून निकाली काढली आहे. समझोता न्यायालयाच्या नोंदीवर घेतल्यानंतर कोणतीही कार्यवाही प्रलंबित राहिलेली नाही आणि यापूर्वी निश्चित करण्यात आलेली सुनावणीची तारीखही अप्रासंगिक ठरली आहे.
जर ही माहिती चुकीची असेल, तर कृपया प्रलंबित प्रकरणाचा क्रमांक, ते कोणत्या न्यायालयात प्रलंबित आहे आणि पुढील सुनावणीची तारीख काय आहे, याची माहिती सार्वजनिकरित्या जाहीर करावी.
जर कोणतीही कार्यवाही प्रलंबित नसेल, तर हा विषय “न्यायालयात प्रलंबित आहे” असे सांगून चर्चा टाळण्यामागील कारण स्पष्ट करण्यात यावे.
याशिवाय, माननीय सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या समझोता करार व प्रतिज्ञापत्रांबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात:
• संबंधित प्रतिज्ञापत्र कोणत्या कायदेशीर अधिकाराखाली सादर करण्यात आले?
• महानगरपालिकेच्या वतीने न्यायालयात कोणत्या अधिकाऱ्याने प्रतिनिधित्व केले?
• त्या प्रतिनिधित्वासाठी आवश्यक अधिकृत मंजुरी प्राप्त करण्यात आली होती काय?
• संबंधित सक्षम प्रशासकीय प्राधिकरणांना याबाबत माहिती देण्यात आली होती व त्यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली होती काय?
• महासभेला याची माहिती देण्यात आली होती काय अथवा तिची मान्यता/अनुमोदन घेण्यात आले होते काय?
हे प्रश्न राजकीय नाहीत. ते पारदर्शकता, उत्तरदायित्व, कायदेशीर प्रक्रिया आणि जबाबदार सार्वजनिक प्रशासन या मूलभूत तत्त्वांशी संबंधित आहेत.
नागरिकांना त्यांच्या घरे, उपजीविका, मालमत्ता हक्क आणि सार्वजनिक हितावर परिणाम करणारे निर्णय कसे व कोणत्या प्रक्रियेद्वारे घेतले गेले, हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. निकाली निघालेल्या न्यायालयीन प्रकरणाचा आधार घेऊन वैध सार्वजनिक प्रश्नांना उत्तरे देणे टाळणे योग्य ठरणार नाही.
पारदर्शकता लोकांचा विश्वास दृढ करते. उत्तरदायित्व लोकशाही बळकट करते. ठाणेकर नागरिकांना वस्तुस्थिती, संबंधित कागदपत्रे, जबाबदारी निश्चिती आणि कायद्याची समान अंमलबजावणी यांची अपेक्षा आहे.
ठाणेकरांना स्पष्ट, तर्कसंगत आणि कारणमीमांसासह उत्तरे मिळाली पाहिजेत.
सार्वजनिक हिताशी संबंधित कोणताही निर्णय कायदेशीर प्रक्रिया, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांच्या चौकटीत घेतला गेला पाहिजे आणि तो कोणत्याही व्यक्ती, दबावगट किंवा स्वार्थी हितसंबंधांच्या प्रभावापासून मुक्त असला पाहिजे.
ठाणेकरांना स्पष्ट आणि न्याय्य उत्तरे हवी आहेत.
@CMOMaharashtra@TMCaTweetAway@RahulGandhi@uddhavthackeray@supriya_sule@CJP_for_India
कायदा आणि कुव्यवस्था.....
कुठे आहेत रेल्वे पोलिस....
थोड्याशा बाचाबाचीवरून खून मुडदे पडायला लागलेत
मानसिकता बिघडत चाललीये की संपूर्ण समाजात असंतोष वाढतोय की सहनशीलता अजिबात राहिली नाहीये....
प्रश्न हा आहे ह्या भडव्याच्या हातात चाकू आलाच कसा....
निश्चितपणे याचे बॅकग्राऊंड क्रिमिनल असेल
एका 22 वर्षाच्या तरुणाचा खून करणाऱ्याचा शेवट लोकांसमोर त्याच पद्धतीने करा..
इंदिरा गांधी यांना आणीबाणी वरून लक्ष्य करणे,हे सत्ताधारी नेत्यांचा आजकालचा नवा छंद आहे.पण 1942 च्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात,"भारताला स्वातंत्र्य मिळता कामा नये,ब्रिटिशांचा अमल राहिला पाहिजे," अशी मागणी करणाऱ्या देशविरोधी लोकांच्या बाबतीत या सत्ताधाऱ्यांच काय मत आहे..?
ठाणे जिल्ह्यात असणाऱ्या अनधिकृत बिल्डिंग कडून मुद्रांक शुल्क घेतले गेल्याची धक्कादायक बातमी समोर येते आहे.ही एक प्रकारे अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणारी गंभीर बाब आहे.अश्या प्रकारे मुद्रांक शुल्क घेतले जात असल्यास,यावर शासन काय कारवाई करणार..?हा प्रश्न आज सभागृहात विचारला.
#पावसाळीअधिवेशन
राजर्षी शाहू महाराज..!
छत्रपती राजर्षी शाहु महाराजांनी इथल्या, स्पृश्य, अस्पृश्य समाजासाठी केलेले कार्य म्हणजे त्यावेळी समाजातील पसरलेल्या चातुरवर्णव्यवस्थेवर केलेले प्रहारच होते...!
जातीयव्यवस्था हि इथल्या अभिजन वर्गाची सर्वात मोठी ताकत आहे आणि बहुजनांची सर्वात मोठी कमजोरी बनलेली होती. त्यांनी टाकलेल्या फासात आपण बरोबर अडकलेलो आहोत. अशावेळी हा भेद मिटविण्यासाठी राजश्री शाहू महाराजांनी एका अश्पृश्य असलेल्या "गंगाधर कांबळे" नावाच्या व्यक्तीकडून चहाची दुकान उघडवली आणि लोकांना संदेश देण्यासाठी ते स्वतः त्या चहाच्या दुकानात जाऊन चहा प्यायचे की जेंव्हा महाराज अस्पृश्य आणि जाती मानत नाही तर जनतेनेही मानायला नको. हा त्या मागचा राजर्षी शाहू महाराजांचा उद्देश होता. त्या काळात एका अस्पृश्याची चहाची दुकान उघडवणे हे चातुर्वर्णव्यवस्थे, जातिव्यस्थे विरूद्ध राजर्षी शाहू महाराज यांनी उचलेले सर्वात मोठे साहसी पाऊल होते..!
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर जेंव्हा शिष्यवृत्तीवर शिकण्यासाठी परदेशात गेले होते तेंव्हा त्यांना शिष्यवृत्ती संपल्यामुळे भारतात परत यावे लागले. हि गोष्ट जेंव्हा राजर्षी शाहू महाराज यांना समजली तेंव्हा ते स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पत्ता शोधत मुंबईच्या चाळीत त्यांना भेटायला गेले आणि पुढील अभ्यास पूर्ण करण्यासाठी मदत केली होती. त्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले.
आणि माणगाव येथील बहिष्कृत परिषदेत शोषित मागासवर्गीय लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात नवा नेता मिळाल्याची घोषणा स्वतः राजर्षी शाहू महाराजांनी केली..!
बहुजनांना मिळालेला आशीर्वाद, आरक्षणाचे जनक, लोककल्याणकारी राजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
बहुजनांनो राजर्षी शाहू महाराजांची जयंती एखाद्या सणासारखी साजरी करा.-डॉ. बाबासाहेब आंबेडकर..!
-डॉ. जितेंद्र आव्हाड..!
येऊरच्या मध्यभागी वनखात्याकडून एक भिंत बांधली जात आहे. सर्व अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, एकाही अधिकाऱ्याने व्यवस्थित माहिती देऊ शकला नाही. उजवीकडे, डावीकडे किंवा त्या भिंतीच्या शेवटी कोणाची जमीन आहे, याचे कोणतेही उत्तर त्यांच्याकडे नाही.
आमच्या नावावर जमीन आहे. पण, इतर हक्कांमध्ये इतरांची नावे आहेत. इतर हक्कांमध्ये इतरांची नावे असलेल्या जमिनींमध्ये इतरांची नावे सुरक्षित करण्यासाठी भिंत बांधण्यात येत आहे का?, असा प्रश्न उपस्थित होतो.
जंगलामध्ये सीसी बाऊंड्री... पूर्ण सिमेंटचे बांधकाम ही जरा धक्कादायक बाब आहे. येऊरमध्ये जमिनींचा वाटप कार्यक्रम वनखात्याने सुरू केला आहे की काय? सोबत एक व्हिडिओदेखील पाठवत आहे अन् एक मोठे झाड स्वतः वनखात्यानेच भिंत बांधताना तोडले आहे.
वाह रे... वा! मजेशीर आहे, सगळं! गणेश नाईक साहेब, काय चालू आहे हे.
माझे दुसरे गुरु कबीर होय. माझे वडील कबीरपंथी होते. त्यामुळे कबीराच्या जीवनाचा आणि तत्वांचाही माझ्यावर फार मोठा परिणाम झाला. माझ्या मताप्रमाणे कबीराला बुद्धाच्या तत्वज्ञानाचे खरे रहस्य कळाले होते."
-डॉ बाबासाहेब आंबेडकर..!
तत्कालीन समाजव्यवस्थेत धर्माच्या आवर्तात जी सर्वसामान्य जनता जगत होती ती अंधश्रद्धेच्या जाळ्यात गुरफटून गेली होती अशावेळी आपल्या दोह्यांच्या माध्यमातून जनजागरण करणारे, जातीभेद, उच-निचते विरोधात आवाज उठविणारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरू, संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
-डॉ. जितेंद्र आव्हाड..!
महाराष्ट्राच्या विकासाच्या अनेक पैलूंवर आणि विविध घटकांच्या प्रश्नांवर नेहमीच ठामपणे, तळमळीने आणि अभ्यासपूर्ण भूमिका मांडणाऱ्या, संसदेतील दमदार आणि आश्वासक नेत्या, माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा म्हणून त्यांचे नेतृत्व, संसदेतील प्रभावी वक्तृत्व आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांबद्दलची त्यांची संवेदनशीलता नेहमीच प्रेरणादायी आहे.त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो याच मनापासून सदिच्छा!
@supriya_sule
आपला मिष्किल स्वभाव, हजरजबाबीपणा, आणि अलंकारिक लेखनशैली यासाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या निधनाची बातमी ऐकून खिन्न झालो. मनोभावे श्रद्धांजली 🙏!
Mr. Commissioner, Thane Municipal Corporation,
With due respect, the assertion that this matter of 2800 crore TDR cannot be discussed on the ground that it is “sub judice” requires appropriate clarification.
Did u take permission or consent from general body before giving a affidavit granting sanction to TDR worth 2800 crore and as per my limited knowledge the matter of affidavit should have been brought to the notice of general body which is represented by Thanekar’s
As per publicly available records, the Special Leave Petition was disposed of by the Hon’ble Supreme Court on 29 May 2026 after recording the settlement arrived at between the parties. Upon the settlement being taken on record, no proceedings remained pending before the Hon’ble Court, and the previously scheduled hearing date no longer remained relevant.
If this understanding is incorrect, kindly provide details of the pending proceedings, including the case number, the court before which the matter is pending, and the next scheduled date of hearing. In the absence of such pending proceedings, continued reliance on the statement that the matter is “before the court” requires suitable clarification.
Furthermore, the settlement and the related affidavits submitted before the Hon’ble Supreme Court raise significant issues concerning public accountability and administrative procedure:
• Under what legal authority was the affidavit submitted?
• Which officer represented the Corporation in the proceedings?
• Was the necessary authorisation obtained prior to such representation?
• Were the competent municipal authorities duly informed and consulted?
• Was the General Body informed or was its approval/ratification sought?
These questions are not political in nature; rather, they relate to the principles of transparency, accountability, and responsible public administration.
Citizens have a legitimate right to understand the manner in which decisions affecting homes, livelihoods, and property rights have been taken. A concluded legal proceeding should not be cited as a basis to prevent legitimate public scrutiny.
Transparency strengthens public confidence, and the citizens of Thane seek clarity, access to relevant records, accountability, and the equal application of law.
Thane deserves clear and reasoned answers.
Decisions involving public interest must be undertaken in accordance with due process, transparency, and accountability, and must remain free from any undue influence or pressure from individuals or vested interests.
@CMOMaharashtra@TMCaTweetAway@RahulGandhi@uddhavthackeray@supriya_sule@CJP_for_India
Mr .Commissioner of Thane Municipal Corporation …
No. The matter is not in court.
Don’t mislead the country and Thanekars we look at u as a hope to fight these corrupt case manipulated for years by Kothari And Khetwani
Come out with the truth wat is legal in kothari compound it’s absolute illegal but people loose their houses which
Are older than kothari compound.. these is a straight fight against corruption
The Supreme Court disposed of the petition on 29 May 2026 on the basis of a mutual settlement between TMC and Dahyabhai. The apex court took formal note of the compromise agreement and officially disposed of the petition. There is no pending hearing. The July 20 date that was originally fixed became redundant once the settlement was recorded and the SLP was disposed of.
That is clean, accurate, and hard to deflect. The Commissioner either misspoke or is using a closed case as a shield. Either way, the record is clear.
The Commissioner says he can't discuss this matter because it's in court…. Plz cite a law
Why are elected representatives there in the body and then without the sanction of general body y did u allow a junior officer submit a affidavit in supreme court is he bigger than general body
And the General Body EXISTS to hold administration accountable.
You don’t get to hide behind a case that’s already been closed.
Thane deserves answers. We will make sure they are given.
Shaking hands with kotharis and power brokers is intolerable
राज्यात ड्रग्सची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.राज्यातील तरुण वर्ग या व्यसनाच्या आहारी जातो आहे.ही अत्यंत गंभीर बाब आहे.या संदर्भात आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात प्रश्न उपस्थित केला.
#पावसाळीअधिवेशन_2026
आदरणीय पवार साहेबांची नात,खासदार सुप्रियाताई सदानंद सुळे यांची कन्या रेवती आणि श्री.अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग यांचा विवाह बीकेसी मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी उपस्थित राहून नव वधू वराचे अभिनंदन करत त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
देशासमोर असणाऱ्या प्रश्नांची जाण असणार नेतृत्व, देशाचे लोकप्रिय विरोधी पक्षनेते,ल श्री.राहुलजी गांधी यांना उत्तम आरोग्य आणि सुखी आणि निरामय आयुष्य लाभो या सदिच्छेसहित वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!
@RahulGandhi
माझे ४५ वर्ष जुने मित्र अत्यंत प्रेमळ एकनिष्ठ शफी शेख ह्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आज त्यांचे चिरंजीव हैदर ही पक्षाचे काम अत्यंत प्रामाणिक पणे करता आहेत
हा फोटो १९९३ चा आहे